Saturday, 11 April 2020

पाणी टंचाईचे प्रस्ताव दोन दिवसात मंजुरीला पाठवा. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सुचना.


दौलतनगर दि.11 :- पाटण मतदारसंघातील डोंगरपठारावरील वाडयांना टंचाई काळात टँकरने पाणी पुरविण्याची संख्या आता पाच ते सहा एवढीच राहिली आहे परंतू डोंगरपठारावरील गावामध्ये तसेच वाडयावस्त्यांवर विंधन विहीरी काढून देण्याची मोठया प्रमाणात मागणी आहे.सुमारे ४५ गांवे व वाडयावस्त्यांमध्ये  विधंन विहीरीची आवश्यकता असून २७ नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्ती करणे गरजेचे आहे. आता एप्रिल महिना सुरु झाला आहे. तात्काळ विधंन विहीर, नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती व टँकरचे प्रस्ताव येत्या दोन दिवसात प्राधान्यक्रमाने मंजुरीकरीता जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवा अशा सूचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी अधिकाऱ्यांना केल्या असून तुमचे प्रस्ताव सादर झाले की लगेच मी जिल्हाधिकारी, सातारा यांचेशी बोलतो असेही ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.
          गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली माहे एप्रिल,मे महिन्यामध्ये जाणवणाऱ्या पाणी टंचाई काळातील उपाययोजना करणेकरीता व पाणी टंचाई मुक्तीकरीता लागणारा निधी आणण्याकरीता प्रस्ताव तयार करुन सादर करणेकरीता बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता खाबडे सर्व शाखा अभियंता यांची प्रमुख उपस्थिती होती.
           याप्रसंगी ना.शंभूराज देसाईंनी  प्रथमत: माहे एप्रिल,मे महिन्यापर्यंत मतदारसंघातील डोंगरी आणि दुर्गम भागात डोंगरपठारावर पाणी टंचाई जाणवणाऱ्या गांवाना व वाडयावस्त्यांना पाणी टंचाई जाणवू नये याकरीता जानेवारी महिन्यामध्ये सादर केलेल्या आराखडयातील किती गांवाचा सर्व्हे पाणी पुरवठा विभागाने पुर्ण केला आहे? किती कामांचे अंदाजपत्रक तयार झाले आहेत याची सविस्तर माहिती घेतली त्यानंतर प्राधान्याने पाच ते सहा गांवाना टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे त्या गांवाची सद्यस्थिती काय आहे? पाच ते सहा गांवातील किती प्रस्ताव मंजुर झाले व किती प्रस्ताव मंजुरीला पाठविले आहेत. तसेच विधंन विहीरी काढायच्या आहेत त्याचा सर्व्हे पुर्ण झाला का?  नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्तीच्या एकूण २७ गावातील मागण्या आल्या आहेत त्याचाही सर्व्हे करुन याची अंदाजपत्रके तयार केली आहेत का ? असे प्रश्न गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा उपविभागाच्या सर्व शाखा अभियंताना करुन पाच ते सहा गांवाना टँकर पुरविणे,४५ गांवामध्ये विधंन विहीरी काढणे व २७ गांवाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्त्या करणे याचे प्राधान्यक्रमाने प्रस्ताव अंदाजपत्रकासह तयार करा आणि येत्या दोन दिवसात ते जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडे मंजुरीकरीता सादर करा. अशा सुचना करीत पाणी पुरवठा विभाग हा अत्यावश्यक सेवेमध्ये येतो त्यामुळे कोरोनाचे संकटाचे कारण सांगून पाणी टंचाई काळात पाणी पुरवठा विभागाकडून कोणतीही हयगय नको. मी दोन दिवसानंतर स्वत: पाणी टंचाईकामांना मंजुरी मिळणेबाबत जिल्हाधिकारी सातारा यांचेशी बोलणार आहे त्यामुळे पाणी पुरवठा विभागाची कोणतीही कारणे एैकून घेतली जाणार नाहीत गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा विभागाच्या सर्व शाखा अभियंत्यांनी पाणी टंचाई ही बाब गांभीर्याने घ्यावी असेही ते शेवठी म्हणाले.
            चौकट: कोरोनाच्या सद्यस्थितीचाही ना.शंभूराज देसाईंनी घेतला आढावा.
            पाणी टंचाईंची बैठक संपलेनंतर उपस्थित प्रांताधिकारी,तहसिलदार,गटविकास अधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक यांचेकडून पाटण मतदारसंघात कोरोनाची सद्यपरिस्थिती काय आहे? याचा आढावा ना.शंभूराज देसाईंनी घेत कोरोनाच्या पार्श्वभूमिवर विविध विषयांवर चर्चा करीत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात सुचित करुन माहे एप्रिल महिन्याचे धान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोच झाले का? लवकरात लवकर पोहोच करा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Thursday, 9 April 2020

जीव धोक्यात घालून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा संकटांशी सामना. आमदार म्हणून महापुरात तर मंत्री म्हणून कोरोना संकटात त्यांच्या प्रगल्भतेचे दर्शन.



               
              दौलतनगर दि.०९ :- संकटकाळात जनतेला कणखर आणि प्रगल्भ नेतृत्वच उपयोगी पडते संकटसमयी वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून सद्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी असे नेतृत्व मागेपुढे पहात नाहीत. त्यांचे नियोजनबध्द उपक्रम, जागेवर धाडसी निर्णय घेवून संकटावर मात करण्याकरीता ठोस कृती करणाऱ्या नेत्यांच्या कार्याचे,प्रगल्भतेचे दर्शन याकाळात जनतेला घडते.असेच कणखर आणि प्रगल्भ व कार्यतत्पर असणारे नेतृत्व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या रुपाने पाटण विधानसभा मतदारसंघाला लाभले असून कोरोना विषाणूचे सर्वात मोठे आरिष्ठ सर्वत्र आले असताना या संकटात आपला जीव धोक्यात घालून आपल्या मतदारसंघातील जनतेची तसेच राज्यातील जनतेची काळजी घेणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे स्वत: २४ बाय ७ अलर्ट राहून संकटाशी सामना करीत आहेत.आमदार असताना गतवर्षी मोठया प्रमाणात आलेल्या महापुरात तर आता मंत्री असताना कोरोना संकटाच्या प्रसंगी न डगमगता सुरु असलेल्या त्यांच्या जनहितार्थ कार्याचे व प्रगल्भतेचे दर्शन पाटण मतदारसंघासह महाराष्ट्र राज्यातील जनतेला होत आहे.
                 कोरोना विषाणूने गत महिनाभरापेक्षा जास्त सर्वत्र मोठया प्रमाणात हाहाकार माजविला आहे. कोरोना विषाणूच्या सर्वात मोठया आरिष्ठाचा सामना करण्याकरीता देशभरात सर्वत्र सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.हे संकट आपल्यापर्यंत आपल्या मतदारसंघातील जनतेपर्यंत येवू नये याकरीता राज्यातील सर्वच विभागातील लोकप्रतिनिधींनी आपली कंबर कसली असून या संकटाचा सामना करण्याकरीता प्रत्येक लोकप्रतिनिधींचे अहोरात्र प्रयत्न सुरु आहेत.पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्य मंत्री ना.शंभूराज देसाई हे तर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर २४ बाय ७ सतर्क असून कोरोनाच्या सद्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत.
               जनकल्याण करणेकरीता लोकप्रतिनिधी हा एक कणा असतो याच भूमिकेतून आपल्या मतदारसंघातील जनतेच्या कल्याणाकरीता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येवू नये याकरीता ना.शंभूराज देसाई हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ते तालुका प्रशासनाच्या सातत्याने बैठका घेवून यामध्ये धाडसी निर्णय घेत नियोजनबध्द उपक्रम मतदारसंघात राबवित आहेत.कोरोनाचे संकट आले आहे तर या संकटाचा सामना करण्याकरीता त्यांनी मतदारसंघातील जनतेला सुमारे १० हजार मास्कचे वाटप प्राथमिक स्वरुपात केले.तसेच या पार्श्वभूमिवर मुंबई, पुणे व इतर राज्यातून पाटण या मुळ मतदारसंघात परत आलेल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात,ग्रामीण रुग्णालयात त्यांनी या नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याकरीता पुढाकार घेतला तसेच बाहेरगावच्या या नागरिकांना व लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद असल्यामुळे मतदारसंघातील जनतेला सवलतीच्या दरात धान्य मिळवून देणेकरीता शासनदरबारी प्रयत्न केले त्यांच्या विनंतीवरुन राज्य शासनाने तीन महिन्यांचे आगाऊ धान्य राज्यातील जनतेला देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.लॉकडाऊनच्या काळात जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नीट झाला पाहिजे याकरीताही त्यांनी सातारा जिल्हयातील व राज्यातील सर्व शासकीय यंत्रणांना सुचित केले आहे.
                कोरोना विषाणूचे एकढे मोठे संकट असताना एक दिवसाआड ते स्वत: पाटण मतदारसंघातील शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठका घेवून त्यांना सतर्क राहण्याच्या सुचना करीत आहेत केवळ सुचना करुन न थांबता ते मतदार संघातील प्रत्येक विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण रुग्णालयात जावून बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांच्या याठिकाणी प्रत्यक्ष आरोग्य तपासण्या केल्या जात आहेत का? आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या रुग्णांची योग्य प्रकारे आरोग्य यंत्रणेकडून काळजी घेतली जात आहे का? याची न भिता किंवा न डगमगता प्रत्यक्ष थेट पहाणी करीत आहेत. पाटण हा ग्रामीण आणि दुर्गम मतदारसंघ आहे या मतदारसंघात दिवस दिवसभर ते मंत्रीपदाचा कोणताही लवाजमा न घेता ग्रामीण भागात एकटेच सर्वत्र भेटी देत आहेत.साताऱ्यामध्ये एकदिवशी सकाळी सकाळी त्यांनी लॉकडाऊनमुळे बंदोबस्तात असणाऱ्या पोलीसांचे मनोबल वाढविण्याकरीता दुचाकीवरुन सातारा शहरात फेरफटका मारत पोलीसांच्या भेटी घेत त्यांना सतर्क राहण्याबरोबर स्वत:ची काळजी घेणेच्या सुचना केल्या.यामुळे सातारा जिल्हयातील पोलीस यंत्रणेचे मनोबल तर वाढलेच परंतू यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणेला एकप्रकारे ऊर्जा प्राप्त झाली.
              पाटण मतदारसंघात असून राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष ठेवून राज्यातील कायदा व सुव्यवस्था कशी नीट राहील याकडेही ते बारकाईने लक्ष देत आहेत. जमावबंदीच्या काळात जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या पोलीसांकडून विनाकारण बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आले यावेळी  पोलीसांना तुम्हाला मारण्याची हौस नाही ते तुमच्या आरोग्यासाठीच हे पाऊल उचलत आहेत असे स्पष्ट करुन विभागाची बाजू सावरण्यासही ते विसरले नाहीत. दोनच दिवसापुर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे त्यांनी सहभाग घेत कोरोनासंदर्भात वाशिम आणि सातारा जिल्हयातील सद्यपरिस्थितीचा आढावा देत त्यांनी कोरोनाच्या पाश्वभूमिवर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बाहेरुन आलेल्या नागरिकांची तात्काळ तपासणी करुन घेणेसंदर्भात रॅपिड टेस्ट कीट पुरविणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे लक्ष वेधले.
               संकटकाळात जनतेचे आणि जनहितार्थ काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेचे मनोबल वाढविणारी सकारात्मकता त्यांच्या अंगी आहे.संकटसमयी जनतेला अडचणीतून बाहेर काढण्याकरीता कृती कार्यक्रम कसा राबवावा याचे योग्य नियोजन ते करीत असल्यामुळे कोणत्याही संकटाची परिस्थिती त्यांना चोखंदळपणे हाताळणे सहज शक्य होत आहे.मागील वर्षी अतिवृष्टी व महापुरामुळे हाहाकार माजविला होता तेव्हा आमदार या नात्याने त्यांनी अतिवृष्टी व महापुराच्या संकटाचा सामना करीत स्वत: जेसीबीमधून जावून महापुरात अडकलेल्यांना पुरातून बाहेर काढले होते तर नुकसानग्रस्तांना सर्व प्रकारची मदत देवून या संकटात मोठा दिलासा देण्याचे कार्य केले होते. वरवरची कृतज्ञता न दाखविता जे काही करायचे ते रोखठोखच हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांची लोकप्रियता पाटण मतदारसंघातील जनतेच्या मनात अधोरेखित झाली आहे. आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक संकटाचा सामना करणारा नेता म्हणून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची प्रतिमा नावारुपास येत आहे.


Wednesday, 8 April 2020

कोरोनांच्या पार्श्वभूमिवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केली दुर्गम भागांची पाहणी. दुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून घेतला प्रत्यक्ष आढावा.


               
              दौलतनगर दि.०८ :- कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेद्रांमधील सोईसुविधा,रुग्णांना देण्यात येणारी सेवा,औषधांचा साठा इत्यादीबरोबर आरोग्य यंत्रणा सतर्क आहे का?  कोणकोणत्या विभागात किती नागरिक हे बाहेरगांवाहून आले आहेत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे का? हे पाहण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मतदारसंघात सरफ्राईज भेट देत आहेत. आज त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून कोरोनाच्या संदर्भातील प्रत्यक्ष आढावा घेतला. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उपकेंद्रात त्यांना काही त्रुटी आढळल्या त्याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दक्षता घेण्याच्या व सतर्क राहण्याच्या सुचना केल्या.
             आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्रापासून भेट देण्यास सुरुवात करीत काळगांव प्राथमिक आरोग्य केंद्र, कुठरे उपकेंद्र,ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालय, सळवे प्राथमिक आरोग्य केंद्र व मोरगिरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. या प्राथमिक आरोग्य केंद्रातील तसेच ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा ही सतर्क  असून बाहेरगांवाहून येणाऱ्या नागरिकांच्या तपासणी करण्याचे तसेच कोरोना संदर्भात जनजागृती करुन उपाययोजना करण्याचे काम आरोग्य यंत्रणेमार्फत चोखंदळपणे राबविले जात आहे. ही चांगली बाब आहे. असे सांगत त्यांनी अनेक वैद्यकीय अधिकाऱ्याचे कौतुक केले तर काही ठिकाणी थोडयाफार त्रुटी आहेत त्यात सुधारणा करा अशा सुचनाही त्यांनी या भेटीमध्ये दिल्या. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या प्रत्येक रुग्णांची त्यांनी भेट घेतली रुग्णांना काय झाले आहे, काही त्रास होत नाही ना ? अशी विचारणा करुन त्यांची चौकशी करीत त्यांना उपचार व्यवस्थित मिळत आहेत का? काळजी घ्या असे सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांना येणाऱ्या रुग्णांकडे स्वत: लक्ष घेवून त्यांची काळजी घेण्याच्या सुचना केल्या.
            कोरोना आजाराचा वाढता पाद्रुर्भाव लक्षात घेता पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच आरोग्य विभागाची यंत्रणा अलर्ट राहणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई सातत्याने पाटण मतदारसंघातील शासकीय यंत्रणेवर नजर ठेवून आहेत.या सर्व पार्श्वभूमिवर गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे स्वत:च अलर्ट असल्यामुळे मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणाही चांगलीच अलर्ट असल्याचे दिसून येत असून त्यांच्या सरफ्राईज भेटीमुळे ही सर्व यंत्रणा आणखीनच अलर्ट असल्याचे पाटण मतदारसंघातील सर्व विभागामध्ये दिसून येत आहे.कोणताही लवाजमा बरोबर न घेता ते एक दिवसाआड मतदारसंघातील प्रत्येक भागात जावून कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मतदारसंघातील जनतेची काळजी घेत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन असले तरी ना.शंभूराज देसाई आज आमच्या भागात येवून गेले त्यांनी इथे इथे भेट दिली अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या याच्या चर्चा पाटण विधानसभा मतदारसंघात सर्वत्र एैकावयास मिळत आहेत.
                चौकट :- येतोय नाही, आलोच सांगतायत स्वत: गृहराज्यमंत्री.
               कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ठिकठिकाणी जनतेची काळजी घेणेकरीता सरफ्राईज भेट देत असलेले गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे मतदारसंघातील एका विभागात कुठे प्राथमिक आरोग्य केंद्राला किंवा ग्रामीण रुग्णालयाला भेट देणेकरीता आले आहेत असे शेजारील भागात कोणा कार्यकर्त्यांला समजले की, सदरचा कार्यकर्ता लगेच ना.शंभूराज देसाईंनाच दुरध्वनीवरुन संपर्क करुन आमच्याकडे येताय ना असे विचारत आहे तेव्हा स्वत: गृहराज्यमंत्री हे तुमच्या भागात येतोय नाही आलोच असेच कार्यकर्त्यांना सांगत १५ व्या मिनीटांला तिथे पोहचत आहेत.

व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईचा मंत्रीमंडळ बैठकीत सहभाग. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांना दिला कोरोनाचा आढावा.




               

              दौलतनगर दि.०8 :-  राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल दि.०७ एप्रिल रोजी मंत्रीमंडळाची बैठक आयोजीत करण्यात आली होती.राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य मंत्रीमंडळाची बैठक ही व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आयोजीत करण्यात आली होती.राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभाग घेवून त्यांनी वाशिम व सातारा जिल्हयातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री यांना दिला.
             काल दि.०७ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रीमंडळाची बैठकीकरीता मुख्यमंत्री महोदय यांचेबरोबर काही ठराविक मंत्री हे वर्षा निवासस्थान येथे उपस्थित होते तर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे मंत्रालयातील मंत्रीमंडळ कक्षात उपस्थित होते. मुंबई येथे उपस्थित नसणारे राज्याचे अनेक मंत्री यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणाहून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभाग नोंदविला व सदरचे मंत्री यांनी ते ज्या ज्या जिल्हयाचे पालकमंत्री आहेत त्या त्या जिल्हयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमिवर असणाऱ्या अडीअडचणींचा आढावा मुख्यमंत्री महोदय यांना दिला. राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनीही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला व त्यांनी वाशिम व सातारा जिल्हयात कोरोनाच्या पाश्वभूमिवर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बाहेरुन आलेल्या नागरिकांची तपासणी करुन घेणेसंदर्भात रॅपिड टेस्ट कीट पुरविणेबाबत तसेच बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना तीन महिन्यांचे रेशनिगंचे धान्य वेळेवर देणेसंदर्भात मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे लक्ष वेधले व त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे वाशिम व सातारा जिल्हयातील कोरोनाचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री यांना दिला.

Sunday, 5 April 2020

सुदैव चांगले ५४ जण निगेटिव्ह आले, तरीही काळजी घ्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांना आदेश.




               
              दौलतनगर दि.०५ :- कराड तालुक्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात असणारे तांबवे गांवामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली असून कराड शहरासह संपुर्ण तालुक्यावर तसेच पाटण मतदारसंघातील सुपने विभागात यामुळे भितीची छाया पसरली आहे. आपले सुदैव चांगले म्हणून ५४ संशयित रुग्णांच्या तपासण्या या निगेटिव्ह आल्या आहेत. तरीही तालुका प्रशासनाने सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे.जनतेमध्ये भितीचे कोणतेही वातावरण राहणार नाही याचीही काळजी प्रशासनाने घ्यावी असे आदेश राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांना दिले व कराड तालुक्यातील व सुपने विभागातील नागरिकांनी घाबरु नका,सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
                 तांबवे ता.कराड येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमिवर या विभागाची व कराड तालुक्याची परिस्थिती जाणून घेणेकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कराड तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणांची कराड विश्रामगृह याठिकाणी आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे अधिकाऱ्यांना आदेश व तालुक्यातील नागरिकांना काळजी घेण्याची विनंती केली यावेळी बैठकीस कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे,तहसिलदार अमरदीप वाकडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव,गटविकास अधिकारी आबासाहेब पवार,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता देशमुख,पोलीस निरीक्षक बी.आर. पाटील, किशोर धुमाळ, उब्रंज सपोनि अजय गोरड,तळबीड सपोनि श्रीमती पाटील,सुपने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहा हुंदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
              कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने कराड तालुक्यात काय काय उपाययोजना तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत याची सविस्तर माहिती ना.शंभूराज देसाईंनी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे व उपविभागीय पोलीस अधिकारी गुरव यांच्याकडून प्रथमत: घेतली. यावेळी कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत याबाबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी समाधान व्यक्त करुन ते म्हणाले, तांबवे गावातील मुंबई रहिवाशी रुग्णाचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे या गावांबरोबर आसपासच्या गांवामध्ये भितीचे वातावरण निर्माण होवून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.बाधित व्यक्तीच्या त्याच्या कुटुंबियासह संपर्कात आलेल्या अन्य काहीजणांची आरोग्य विभागाने तपासणी केल्यानंतर संपर्कातील व्यक्ती या निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे.तालुका प्रशासनाने यासंदर्भातील विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत पोहचविणे गरजेचे असून त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण राहणार नाही.अचानक तांबवे गावातील बाधित व्यक्तीची बातमी बाहेर आल्यामुळे हे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने नाकाबंदी,जमावबंदी तसेच स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळला जात असल्याचे दिसून येत आहे.ही चांगलीच बाब आहे. 
                संचारबंदीच्या काळात विनाकारण कोणी फिरताना दिसले किंवा संचारबंदीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना पुर्वीच दिल्या आहेत परंतू कामानिमित्ताने बाहेर पडणाऱ्यांमध्येही संचारबंदीचे नियम पाळले जात आहेत का? याची तपासणी पोलीस यंत्रणेने करावी यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कायदेशीर करावी यात हयगय करु नये. कोरोनाचा संसर्ग होवू नये याकरीता जसे प्रशासन सज्ज आहे तसेच नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन स्वत:ची व त्यांच्या कुटुंबिंयांची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. संचारबंदीमध्ये तालुक्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असली तरी अत्यावश्यक सेवा सुरुच ठेवून नागरिकांना सहकार्य करण्याची भूमिका प्रशासनानेही ठेवावी. अडचणीच्या काळात जशी जनतेकडून आपण सहकार्याची अपेक्षा ठेवतो तशी जनतेचीही आपल्या प्रशासनाकडून अपेक्षा असते.सर्वांच्या सहकार्यातुन कोरोनाविरुध्दचा सुरु असलेला लढा यशस्वी होणार आहे त्यामुळे प्रशासनाने जशी या महामारीच्या संकटात जनतेची काळजी घेण्याची गरज आहे तशीच जनतेनेही स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची काळजी घेण्याची गरज आहे. ती काळजी जनतेने घ्यावी अशी विनंती ना.शंभूराज देसाईंनी करुन कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कराड तालुक्यातील तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना तसेच जनतेला काही अडचणी असतील तर त्या त्यांनी जरुर सांगाव्यात शासनाच्या माध्यमातून त्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ना.शंभूराज देसाईंनी सांगून अधिकारीवर्ग खरोखरच चांगले काम करीत आहे या कामांबरोबर त्यांनी अजुनही सतर्क राहून काळजी  घ्यावी असे ते शेवठी बोलताना म्हणाले.

Saturday, 4 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे २४ तास अलर्ट राज्यातील मंत्री,राज्यमंत्री,आमदार यांचेशी प्रतिरोज साधतायत संवाद



                  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे हे पुर्ण क्षमतेने कोरोनाच्या संकटाचा सामना करताना दिसत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे.त्याहीपेक्षा त्यांचेकडे येणाऱ्या प्रत्येक छोटया-मोठया सुचनांची अंमलबजावणी करण्याचे काम त्यांचेकडून करण्यात येत आहे.कोरोनाचा सामना करण्या करीता ते २४ तास अलर्ट असून या पार्श्वभूमिवर ते प्रतिरोज राज्यातील मंत्री,राज्यमंत्री व आमदार यांचेशी दिवसभरात दुरध्वनी वरुन संपर्क साधून संवाद साधत आहेत.कोरोना संकटाचा सामाना करण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे तुम्ही तुमची,तुमच्या मतदारसंघातील जनतेची खबरदारी घ्या असे वारंवार ते दुरध्वनी वरुन आम्हा लोकप्रतिनिधींना सांगत असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
          कोरोना विषाणूचे देशात आणि राज्यात पाय पसरायला सुरवात झाल्यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी वेळीच सावधगिरी बाळगून या महामारीचा सामना करण्याकरीता व या विषाणूचा नायनाट करण्याकरीता योग्य त्या उपाययोजना करण्यावर भर दिला आहे.कोरोना या माहामारीच्या रोगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी राज्यामध्ये संचारबंदी,जमावबंदी,राज्यबंदी,जिल्हाबंदी,करण्याच्या घोषणा वेळीच करुन राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना तसेच कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉर्म होम करण्याच्या सुचना केल्या आहेत. राज्यामध्ये दिवसेंदिवस या कोरोना महामारीचे प्रमाण वाढत असल्याचे पाहून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकप्रतिनिधींशी, जनतेशी संवाद साधणे,त्यांना या आजाराचे गांभीर्य पटवून देत काळजी घेण्याची विनंती करणे. डॉक्टरांच्या संपर्कात राहणे या बाबींना त्यांनी प्राधान्य देत नागरिकांनी घाबरु नका,सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका असे आवाहनही सातत्याने ते राज्यातील जनतेला करीत आहेत.कोरोनाचा सामना करण्याकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पुर्तता करण्याकरीता त्यांनी कंबर कसली असून राज्यातील रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य तपासण्या करण्याकरीता लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा देणेसाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.कोरोनाच्या संदर्भात त्यांचेकडे राज्यभरातून येणाऱ्या वारंवार सुचना, त्यावर करावयाच्या कार्यवाही अशा सर्व बाबी मुख्यमंत्री वेळोवेळी चोखंदळपणे करीत असल्याचे यातून निदर्शनास येते आहे.
            या सर्व घाईगडबडीतून न चुकता गत १५ दिवसापासून ते दिवसभरात राज्यातील मंत्री,राज्यमंत्री व आमदार यांना स्वत: मातोश्रीमधून,मुख्यमंत्री कार्यालयातून दुरध्वनी करीत आहेत व तुमच्या मतदारसंघात, तुमच्या जिल्हयात कोरोनाची काय परिस्थिती आहे,कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती घेत आहेत.कोरोना संकटावर उपाययोजना करताना निधी कसा उपलब्ध करुन देता येईल याचीही माहिती ते राज्यातील मंत्री,राज्यमंत्री व आमदारांना देत आहेत. त्यांच्या बोलण्याची सुरुवात होते ती प्रथमत: कुठे आहात,काळजी घेताय ना? स्वत:ची, परिवाराची, मतदारसंघातील जनतेची काळजी घ्या,जास्त फिरत नाही ना? वर्क फॉर्म होम करा घरात बसूनच मतदारसंघातील समस्यांची माहिती घ्या,जिथे गरज आहे तिथेच जा आणि याच सुचना मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला दया असे ते वारंवार सांगत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ज्या काही आवश्यक घोषणा करायच्या आहेत त्या मी वेळोवेळी करीत आहेच. संचारबंदीचा त्रास जनतेला होणार नाही याची काळजी शासन घेत आहे. असे ते सांगत आहेत.
            राज्यातील जनतेला संकटात काळजी घेणारे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या रुपाने लाभले असून कोरोनाच्या संकटाचा सामना करतानाची त्यांची रोजची धडपड महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे हे 'कोरोना' व्हायरसच्या संकटाच्या काळात चांगले काम करीत आहेत. आम्ही त्यांचे जाहीर आभार मानतो,' अशा शब्दांत मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांचेवर महाराष्ट्रातील जनता स्तुतीसुमनं उधळत आहे हे पाहून समाधान होत आहे.कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याकरीता कार्यरत असणाऱ्या राज्यातील सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक केले जात असून सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,असा दिलासाही मुख्यमंत्र्याकडून दिला जात असून मुख्यमंत्र्यांच्या या संवादामुळे आपल्या कामाची दखल घेतली जात आहे,कोणीतरी आपलीही काळजी घेत आहे याचे समाधान कर्मचाऱ्यांना व जनतेला त्यांच्या संवादातून मिळत आहे.पक्षाचे प्रमुख या नात्याने पक्षाची भूमिका बजावणारे मा.उध्दवजी ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भूमिका बजाविताना अत्यंत नम्रपणे व प्रामाणिकपणे राज्याच्या हिताचे निर्णय घेत एक कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून बजावित असलेली भूमिका महाराष्ट्रातील जनतेच्या कायम स्मरणात राहणारी असल्याचेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले.

Thursday, 2 April 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून पाटण मतदारसंघातील आरोग्य विभागाची पाहणी. मतदारसंघात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वैद्यकीय सुविधा देणारी यंत्रणा अलर्ट.


दौलतनगर दि.०२ :- कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेद्रांमधील सोईसुविधा,रुग्णांना देण्यात येणारी सेवा,औषधांचा साठा इत्यादीबरोबर आरोग्य यंत्रणा तसेच कोरोना संदर्भात पाटणमधील विलगीकरण कक्ष हे व्यवस्थित आहे का ? याची पहाणी करणेकरीता आज राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी तारळे,मुरुड,केरळ या प्राथमिक आरोग्य केंद्राना व पाटणमधील विलगीकरण कक्षाला अचानक भेटी देवून आरोग्य विभागाचीच तपासणी केली. मतदारसंघात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वैद्यकीय सुविधा देणारी सर्व यंत्रणा अलर्ट असल्यामुळे ना.शंभूराज देसाईंनी समाधान व्यक्त करुन आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व तालुका प्रशासनाचे कौतुक केले.
            कोरोना आजाराचा वाढता पाद्रुर्भाव लक्षात घेता पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणा तसेच आरोग्य विभागाची यंत्रणा अलर्ट राहणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी एकदा नव्हे तर चारवेळा तहसिल कार्यालयामध्ये आढावा बैठका घेतल्या होत्या या पार्श्वभूमिवर मतदारसंघातील शासकीय यंत्रणा व आरोग्य यंत्रणा ही अलर्ट आहे का? हे पाहण्याकरीता त्यांनी आज प्रत्यक्ष पहाणी दौऱ्याचेच आयोजन करुन प्राथमिक आरोग्य केंद्राना अचानक भेटी देण्याचा कार्यक्रम राबविला.यामध्ये त्यांनी तारळे,मुरुड,केरळ या प्राथमिक आरोग्य केंद्राना व पाटणमधील विलगीकरण कक्षाला अचानक भेटी दिल्या.त्यावेळी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर सर्व यंत्रणा ही अलर्ट असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आलेनंतर त्यांनी यासंदर्भात समाधानही व्यक्त करीत असेच सर्वांनी अलर्ट राहण्याच्या सुचना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.
               सुरवातीस त्यांनी तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रास तसेच मुरुड व केरळ प्राथमिक आरोग्य केंद्राना भेटी दिल्या यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेद्रांमधील सोईसुविधा,रुग्णांना देण्यात येणारी सेवा,औषधांचा साठा याची त्यांनी प्रत्यक्ष पहाणी केली तसेच रुग्णालयांमध्ये पहिल्यापासून दाखल असणाऱ्या रुग्णांची वयोवृध्दांची जागेवर जावून त्यांनी विचारपुस केली तसेच त्यांना कसला त्रास होतोय,औषधे वेळेवर मिळतायतात का ? उपचार नीट होत आहेत का?  अशी रुग्णांना विचारणा करुन त्यांना दिलासा देण्याचे काम ना.शंभूराज देसाईंनी केले.तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मुंबई, पुणे तसेच बाहेर गांवाहून आलेल्या नागरिकांच्या तपासण्या केल्या का? त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे तर आढळून आली नाहीत ना? बाहेरगावच्या नागरिकांना घरामध्ये त्यांचे विलगीकरण कुठे केले आहे का? केले असेल तर त्यांची तपासणी करण्यात येत आहे का? अशी विचारणा करुन याचीही माहिती ना.देसाईंनी घेतली.
            त्यानंतर त्यांनी पाटण येथील विलगीकरण कक्षाला भेट देत याठिकाणी आपण किती रुग्णांची सोय करु शकतो, त्यांना आरोग्य सुविधा देणेकरीता वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत का? नसतील तर किती वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करावी लागणार याची माहिती प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांचेकडून घेतली.यावर प्रातांधिकारी तांबे यांनी पाटण येथील मुलाच्या वसतीगृहाच्या नुतन इमारतीमध्ये आपण विलगीकरण कक्ष स्थापन केले आहे यामध्ये एकुण २७ खोल्या व दोन मोठे हॉल असून यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने एकूण १०० ते ११० तसेच ग्रामीण रुग्णालय पाटण व ढेबेवाडी येथे अनुक्रमे १० असे एकूण १०० ते १५० नागरिकांची सोय करु शकतो याकरीता आवश्यक असणारी आरोग्य यंत्रणा उपलब्ध असून तशाप्रकारे वैद्यकीय अधिकारी यांच्या नेमणूका देखील करण्यात आल्या आहेत असे सांगितले.यावेळी ना.देसाईंनी विलगीकरण कक्षातील सर्व खोल्यांची तसेच मोठया दोन हॉलचीही यावेळी प्रत्यक्ष पहाणी केली. व सर्वच यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सुचना करीत त्यांनी पाटण मतदारसंघात काल तारखेपर्यंत मुंबई,पुणे, व बाहेरील गांवाहून किती नागरिक पाटण मतदारसंघात आले आहेत याचीही माहिती घेतली.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वच स्तरावर सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असून रुग्णांना सेाईसुविधा देणारी आरोग्य व तालुका प्रशासनाची सर्व यंत्रणा अलर्ट असल्याचे पाहून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी यंत्रणेसंदर्भात समाधान व्यक्त केले व सर्वांनी इतरांच्या काळजीबरोबर स्वत:चीही काळजी घेण्याच्या सुचना सर्वांना केल्या. यावेळी त्यांचेसोबत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, सपोनि तृप्ती सोनवणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.