Wednesday 8 April 2020

व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईचा मंत्रीमंडळ बैठकीत सहभाग. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांना दिला कोरोनाचा आढावा.




               

              दौलतनगर दि.०8 :-  राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली काल दि.०७ एप्रिल रोजी मंत्रीमंडळाची बैठक आयोजीत करण्यात आली होती.राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज्य मंत्रीमंडळाची बैठक ही व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आयोजीत करण्यात आली होती.राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभाग घेवून त्यांनी वाशिम व सातारा जिल्हयातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री यांना दिला.
             काल दि.०७ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रीमंडळाची बैठकीकरीता मुख्यमंत्री महोदय यांचेबरोबर काही ठराविक मंत्री हे वर्षा निवासस्थान येथे उपस्थित होते तर राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार हे मंत्रालयातील मंत्रीमंडळ कक्षात उपस्थित होते. मुंबई येथे उपस्थित नसणारे राज्याचे अनेक मंत्री यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणाहून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभाग नोंदविला व सदरचे मंत्री यांनी ते ज्या ज्या जिल्हयाचे पालकमंत्री आहेत त्या त्या जिल्हयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमिवर असणाऱ्या अडीअडचणींचा आढावा मुख्यमंत्री महोदय यांना दिला. राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनीही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्रीमंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला व त्यांनी वाशिम व सातारा जिल्हयात कोरोनाच्या पाश्वभूमिवर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बाहेरुन आलेल्या नागरिकांची तपासणी करुन घेणेसंदर्भात रॅपिड टेस्ट कीट पुरविणेबाबत तसेच बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना तीन महिन्यांचे रेशनिगंचे धान्य वेळेवर देणेसंदर्भात मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे लक्ष वेधले व त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे वाशिम व सातारा जिल्हयातील कोरोनाचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री यांना दिला.

No comments:

Post a Comment