दौलतनगर दि.०९ :- संकटकाळात
जनतेला कणखर आणि प्रगल्भ नेतृत्वच उपयोगी पडते संकटसमयी वेळप्रसंगी आपला जीव
धोक्यात घालून सद्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी असे नेतृत्व मागेपुढे पहात नाहीत.
त्यांचे नियोजनबध्द उपक्रम, जागेवर धाडसी निर्णय घेवून संकटावर मात करण्याकरीता
ठोस कृती करणाऱ्या नेत्यांच्या कार्याचे,प्रगल्भतेचे दर्शन याकाळात जनतेला
घडते.असेच कणखर आणि प्रगल्भ व कार्यतत्पर असणारे नेतृत्व राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंच्या रुपाने पाटण विधानसभा मतदारसंघाला लाभले असून कोरोना विषाणूचे सर्वात
मोठे आरिष्ठ सर्वत्र आले असताना या संकटात आपला जीव धोक्यात घालून आपल्या
मतदारसंघातील जनतेची तसेच राज्यातील जनतेची काळजी घेणेकरीता गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई हे स्वत: २४ बाय ७ अलर्ट राहून संकटाशी सामना करीत आहेत.आमदार
असताना गतवर्षी मोठया प्रमाणात आलेल्या महापुरात तर आता मंत्री असताना कोरोना
संकटाच्या प्रसंगी न डगमगता सुरु असलेल्या त्यांच्या जनहितार्थ कार्याचे व प्रगल्भतेचे
दर्शन पाटण मतदारसंघासह महाराष्ट्र राज्यातील जनतेला होत आहे.
कोरोना
विषाणूने गत महिनाभरापेक्षा जास्त सर्वत्र मोठया प्रमाणात हाहाकार माजविला आहे. कोरोना
विषाणूच्या सर्वात मोठया आरिष्ठाचा सामना करण्याकरीता देशभरात सर्वत्र
सर्वोत्तोपरी प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.हे संकट आपल्यापर्यंत आपल्या
मतदारसंघातील जनतेपर्यंत येवू नये याकरीता राज्यातील सर्वच विभागातील
लोकप्रतिनिधींनी आपली कंबर कसली असून या संकटाचा सामना करण्याकरीता प्रत्येक
लोकप्रतिनिधींचे अहोरात्र प्रयत्न सुरु आहेत.पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि
राज्याचे गृहराज्य मंत्री ना.शंभूराज देसाई हे तर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर २४ बाय
७ सतर्क असून कोरोनाच्या सद्यपरिस्थितीवर मात करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे
दिसत आहेत.
जनकल्याण
करणेकरीता लोकप्रतिनिधी हा एक कणा असतो याच भूमिकेतून आपल्या मतदारसंघातील
जनतेच्या कल्याणाकरीता त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट येवू नये याकरीता
ना.शंभूराज देसाई हे नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर ते तालुका
प्रशासनाच्या सातत्याने बैठका घेवून यामध्ये धाडसी निर्णय घेत नियोजनबध्द उपक्रम मतदारसंघात
राबवित आहेत.कोरोनाचे संकट आले आहे तर या संकटाचा सामना करण्याकरीता त्यांनी
मतदारसंघातील जनतेला सुमारे १० हजार मास्कचे वाटप प्राथमिक स्वरुपात केले.तसेच या
पार्श्वभूमिवर मुंबई, पुणे व इतर राज्यातून पाटण या मुळ मतदारसंघात परत आलेल्या नागरिकांच्या
आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात,ग्रामीण
रुग्णालयात त्यांनी या नागरिकांच्या आरोग्य तपासण्या करण्याकरीता पुढाकार घेतला
तसेच बाहेरगावच्या या नागरिकांना व लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद असल्यामुळे
मतदारसंघातील जनतेला सवलतीच्या दरात धान्य मिळवून देणेकरीता शासनदरबारी प्रयत्न
केले त्यांच्या विनंतीवरुन राज्य शासनाने तीन महिन्यांचे आगाऊ धान्य राज्यातील
जनतेला देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.लॉकडाऊनच्या काळात जनतेला जीवनावश्यक
वस्तूंचा पुरवठा नीट झाला पाहिजे याकरीताही त्यांनी सातारा जिल्हयातील व राज्यातील
सर्व शासकीय यंत्रणांना सुचित केले आहे.
कोरोना
विषाणूचे एकढे मोठे संकट असताना एक दिवसाआड ते स्वत: पाटण मतदारसंघातील शासकीय
यंत्रणांच्या आढावा बैठका घेवून त्यांना सतर्क राहण्याच्या सुचना करीत आहेत केवळ
सुचना करुन न थांबता ते मतदार संघातील प्रत्येक विभागातील प्राथमिक आरोग्य
केंद्रात तसेच ग्रामीण रुग्णालयात जावून बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांच्या
याठिकाणी प्रत्यक्ष आरोग्य तपासण्या केल्या जात आहेत का? आरोग्य केंद्रामध्ये दाखल
झालेल्या रुग्णांची योग्य प्रकारे आरोग्य यंत्रणेकडून काळजी घेतली जात आहे का?
याची न भिता किंवा न डगमगता प्रत्यक्ष थेट पहाणी करीत आहेत. पाटण हा ग्रामीण आणि
दुर्गम मतदारसंघ आहे या मतदारसंघात दिवस दिवसभर ते मंत्रीपदाचा कोणताही लवाजमा न
घेता ग्रामीण भागात एकटेच सर्वत्र भेटी देत आहेत.साताऱ्यामध्ये एकदिवशी सकाळी
सकाळी त्यांनी लॉकडाऊनमुळे बंदोबस्तात असणाऱ्या पोलीसांचे मनोबल वाढविण्याकरीता
दुचाकीवरुन सातारा शहरात फेरफटका मारत पोलीसांच्या भेटी घेत त्यांना सतर्क
राहण्याबरोबर स्वत:ची काळजी घेणेच्या सुचना केल्या.यामुळे सातारा जिल्हयातील पोलीस
यंत्रणेचे मनोबल तर वाढलेच परंतू यामुळे राज्यातील पोलीस यंत्रणेला एकप्रकारे
ऊर्जा प्राप्त झाली.
पाटण
मतदारसंघात असून राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर
लक्ष ठेवून राज्यातील कायदा व सुव्यवस्था कशी नीट राहील याकडेही ते बारकाईने लक्ष
देत आहेत. जमावबंदीच्या काळात जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या पोलीसांकडून विनाकारण
बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना मारहाण केली जात असल्याचा आरोप करण्यात आले यावेळी पोलीसांना तुम्हाला मारण्याची हौस नाही ते
तुमच्या आरोग्यासाठीच हे पाऊल उचलत आहेत असे स्पष्ट करुन विभागाची बाजू
सावरण्यासही ते विसरले नाहीत. दोनच दिवसापुर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी
घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे त्यांनी सहभाग घेत
कोरोनासंदर्भात वाशिम आणि सातारा जिल्हयातील सद्यपरिस्थितीचा आढावा देत त्यांनी कोरोनाच्या
पाश्वभूमिवर लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये बाहेरुन आलेल्या नागरिकांची तात्काळ
तपासणी करुन घेणेसंदर्भात रॅपिड टेस्ट कीट पुरविणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री
ना.उध्दवजी ठाकरे यांचे लक्ष वेधले.
संकटकाळात
जनतेचे आणि जनहितार्थ काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेचे मनोबल वाढविणारी सकारात्मकता
त्यांच्या अंगी आहे.संकटसमयी जनतेला अडचणीतून बाहेर काढण्याकरीता कृती कार्यक्रम
कसा राबवावा याचे योग्य नियोजन ते करीत असल्यामुळे कोणत्याही संकटाची परिस्थिती
त्यांना चोखंदळपणे हाताळणे सहज शक्य होत आहे.मागील वर्षी अतिवृष्टी व महापुरामुळे
हाहाकार माजविला होता तेव्हा आमदार या नात्याने त्यांनी अतिवृष्टी व महापुराच्या
संकटाचा सामना करीत स्वत: जेसीबीमधून जावून महापुरात अडकलेल्यांना पुरातून बाहेर
काढले होते तर नुकसानग्रस्तांना सर्व प्रकारची मदत देवून या संकटात मोठा दिलासा
देण्याचे कार्य केले होते. वरवरची कृतज्ञता न दाखविता जे काही करायचे ते रोखठोखच
हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांची लोकप्रियता पाटण मतदारसंघातील जनतेच्या मनात
अधोरेखित झाली आहे. आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक संकटाचा सामना करणारा नेता
म्हणून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची प्रतिमा नावारुपास येत आहे.
No comments:
Post a Comment