Saturday, 15 October 2022

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून गत गळीत हंगामातील एफ.आर.पी.ची रक्कम बँक खाती वर्ग. शेतकऱ्यांच्या बँक खाती अंतिम बिल वर्ग करत शेतकऱ्यांना चेअरमन यशराज देसाई यांचेकडून दिपावलीच्या शुभेच्छा.


दौलतनगर दि.15 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यांस सन 2021-22 च्या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसबिलापोटी लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी नुसार उर्वरित अंतिम रु. 215/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.572.95 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने गत सन 2021-22 च्या गळीत हंगामातील एफ.आर.पी.प्रमाणे होणारी ऊसबिलाची संपूर्ण रक्कम अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे  चेअरमन मा.यशराज शंभूराज देसाई (दादा) यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2021-22 चे गळीत हंगामामध्ये 02 लाख 66 हजार 488 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.82% सरासरी साखर उताऱ्यांने 03 लाख 14 हजार 850 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. सन 2021-22 च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसबिलाची एफआरपीच्याप्रमाणे  एकूण रक्कम रु.7101.91  लाख इतकी होत असून कारखान्याने यापूर्वी रु. 6528.96  लक्ष रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. दरम्यान लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी दिवाळीपूर्वी गत गळीत हंगामातील उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे जाहिर केले होते. त्यानुसार आज रोजी गत गळीत हंगामातील उर्वरित अंतिम रु. 215/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.572.95 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करत लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्यातील तमाम ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे  मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापन चांगल्या पध्दतीने नियोजन करत दैनंदिन खर्चांमध्ये काटकसर करण्याचे धोरण राबविले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे हित डोळयांसमोर ठेऊन नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने सन 2021-22 च्या गळीत हंगामात कारखान्याला गळीतास आलेल्या ऊसाला एफआरपीच्या उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खाती वर्ग केली असल्याचे सांगत सन 2021-22 च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याला गळीतास पुरविलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा असे सांगत ते पुढे म्हणाले की,ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांना भासणारी आर्थिक निकड लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत गत गळीत हंगामातील उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम दिवाळीपूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. सन 2022-23 च्या गळीत हंगामाची संपूर्ण तयारी करण्यात आली असून तोडणी वाहतूक यंत्रणा कारखान्यावर दाखल होण्यास सुरुवातही झाली आहे.तसेच कारखान्याचे आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष ऊस गळीत हंगामास लवकरच सुरुवात होणार आहे.त्यामुळे चालू गळीत हंगाम यशस्वी करण्याच्या उद्देशाने कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस हा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन  चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

Monday, 10 October 2022

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेबरोबर युवकांची मांदीयाळी.

             

दौलतनगर दि.10:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून पाटण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच युवकांची मांदीयाळी होती.तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने पारंपारीक वाद्यांचे नियोजनही करण्यात आले होते.दरम्यान मुंबई येथील नियोजित बैठकांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी कालच मा.यशराज देसाई (दादा) यांना कोयना दौलत निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच आज श्रीमती विजयादेवी देसाई(मॉसाहेब),सौ.स्मितादेवी देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा), सौ.अस्मितादेवी देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई,ईश्वरी दिदी यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस  प्रतिवर्षी  मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी मा.यशराज देसाई (दादा) यांना साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा प्रशासनाचेवतीने सातारा येथील कोयना दौलत निवासस्थानी  प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.त्यानंतर वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा येथील एहसास मतीमंद मुलांचे शाळेमध्ये खाऊवाटप करण्यात आले. त्यांनतर त्यांनी दौलतनगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर मा. यशराज देसाई दादा यांचे औक्षण केले.तद्नंतर मरळी गावचे ग्रामदैवत श्री निनाईदेवी मंदिर येथे निनाईदेवीचे दर्शन घेतले. श्री. निनाईदेवी मंदीरामध्ये मरळी ग्रामस्थांच्या मा. यशराज देसाई यांनी शुभेच्छा स्विकारल्या. त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब), स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयाचे दर्शन घेऊन त्यांनी कारखाना परिसरातील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे  पुर्णाकृती  पुतळयाचे दर्शन घेतल्यानंतर शिवविजय हॉल येथे मा.यशराज देसाई (दादा)  यांचे पारंपारीक वाद्यांच्या गजरात आगमण झाले. शिवविजय हॉल येथे वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचेकडून शुभेच्छा स्विकारल्या.वाढदिवसानिमित्त तारळे विभागातील वजरोशी येथील पारंपारिक लेझीम पथक, आदमापूर येथील गजी नृत्य तसेच हालगी वादक अशा पारंपारिक कला या वेळी उपस्थितांना बघायला मिळाल्या.

            मा.यशराज देसाई यांना  शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. मा.यशराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे,खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, प्रकाश तवटे, सारंग पाटील,कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले(बाबा),विनायक भासले(बाबा) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनावणे,परिक्षित थोरात, राजेंद्र देसाई, परेश शेठ, राजेंद्र देसाई कोल्हापूर, कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील शिवदौलत बँकेचे माजी चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, संचालक शशिकांत निकम, बळीराम साळुंखे, शंकर पाटील, सोमनाथ खामकर,गजानन जाधव,विकास गिरी-गोसावी,विजयराव जंबुरे, प्रकाशराव जाधव,प्रकाश पवार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,बशीर खोंदु,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई सुरेश पानस्कर,संतोष गिरी, पांडूरंग शिरवाडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, विजयराव मोरे, टी.डी. जाधव, शिवाजीराव शेवाळे, गणेश काजारी, शिवसेना पदाधिकारी राजेश चव्हाण,सागर नलवडे, रत्नदिप जाधव, राजकुमार कदम, हणमंत जाधव, आनंदाराव काळे, अमोल पाटील, शिवाजी देसाई, गोरख देसाई, माणिक पवार, विजय पवार फौजी, अमोल घाडगे, कांता सोनवले, शिवाजी बोंगाणे, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोकराव पाटील, सावळाराम लाड,भागोजी शेळके,दिपक सुतार, मिलींद पाटील, सलीम इनामदार, गणीभाई चाफेरकर, सुरेश जाधव विठ्ठल पवार, विलास कु-हाडे, वाय. के. जाधव,संजय शिर्के विनायक शिर्के,अरविंद पवार, विष्णू पवार, गणेश भिसे,किसन गालवे,संजय देशमुख, उत्तम मोळावडे,प्रविण पाटील, जालंदर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य ॲङ डी.पी.जाधव,नथूराम कुंभार, बबनराव शिंदे,अमोल चव्हाण, अभिजित चव्हाण,धनाजी केंडे, राजेंद्र पाटील, विष्णू पवार,अरविंद पवार, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,नाना साबळे,संजय शिर्के,हेमंत पवार, प्रकाश टोपले,महिपती गायकवाड,नथूराम सावंत,निवृत्ती कदम,दादा जाधव,संतोष पवार,शंकर पाटील,किसन पवार,माणिक पवार, विठ्ठलराव जाधव, बाळासो सुर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, विश्वास निकम,रविंद्र सपकाळ,रामभाऊ कदम, रविंद्र जाधव,नाना पवार,मनोज मोहिते, शिवाजी घार्गे, राजाराम मोहिते, मधुकर पाटील,नेताजी मोरे, ॲङ बाबूराव नांगरे, प्रकाश पाटील, हणमंतराव चव्हाण, सचिन पवार, मोहन चव्हाण, अविनाश पाटील, सचिन पाटील, नारायण कारंडे, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे, तहसिलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी गोरख शेलार, उपअभियंता विद्याधर शिंदे,घंटे, शाखा अभियंता संदीप पाटील, नरबट, हराळे भोसले, शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळूंखे,अभिजित पाटील, धनाजी शेवाळे, जय मल्हार मातंग संघटनेचे अध्यक्ष बबनराव भिसे, उत्तम मगरे, कारखान्याचे व्हा. चेअरमन राजाराम पाटील, माजी संचालक मधूकर भिसे,बबनराव पाटील, दै.पुढारीचे तुषार देशमुख, दै.तरुण भारतचे संपादक दिपक प्रभावळकर, संभाजी भिसे, दैनिक सकाळचे अरुण गुरव यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका, जयमल्हार मातंग संघटना पाटण तालुका, कोयना परिसर साखर कामगार संघटना,शिवसेना,युवासेना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना तसेच तालुक्यातील देसाई कुटूंबावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

 

Friday, 7 October 2022

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा दि.10 ऑक्टोंबर रोजी वाढदिवस. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,हार न आणता शालेय वस्तू आणण्याचे आवाहन.


दौलतनगर दि.07:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांचा सोमवार दि.१0ऑक्टोंबर,२०२२ रोजीचा वाढदिवस पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान वाढदिनी मा.यशराज देसाई (दादा) हे सकाळी 10 ते दुपारी 03.00 वा. पर्यंत दौलतनगर,ता.पाटण येथे उपस्थित राहणार असून शिवविजय हॉल दौलतनगर येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत. त्यानंतर ते कुटुंबियांसमवेत परगावी जाणार असून वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,हार न आणता शालेय वस्तू आणण्याचे आवाहन मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समिती यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस  प्रतिवर्षी  मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाच्याही वर्षी मा.यशराज देसाई (दादा) यांचे सोमवार दि. १0 ऑक्टोंबर,२०२2 रोजीचे वाढदिवसा निमित्त पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. मा. यशराज देसाई यांचे हस्ते सकाळी 9.30 वा एहसास मतीमंद मुलांची शाळा येथे खाऊ वाटप  करण्यात येणार असून, सकाळी 10.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथील निवासस्थानी आगमन होणार आहे. प्रथम दौलतनगर येथील श्री गणेश मंदिरात गणरायांचे दर्शन घेऊन,  मरळी गावचे ग्रामदैवत श्री निनाईदेवी मंदिर येथे निनाईदेवीचे दर्शन घेणार असून श्री. निनाईदेवी मंदीरामध्ये मरळी ग्रामस्थ मा. यशराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करणार आहेत.त्यानंतर ते कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब), स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयाचे दर्शन घेतल्यानंतर  ते कारखाना परिसरातील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे  पुर्णाकृती  पुतळयाचे दर्शन घेणार असून ते शिवविजय हॉल येथे वाढदिवसानिमित्त उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचेकडून दुपारी 03 वाजेपर्यंत शुभेच्छा स्विकारणार आहेत. दुपारी 03.00 नंतर मा यशराज देसाई (दाद) हे कुटुंबियांसमवेत परगावी जाणार आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरीता येणा-या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ,हार न आणता पाटण विधानसभा मतदार संघातील गोर-गरीब कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा शालेय वस्तू भेट म्हणून आणण्याचे आवाहनही शेवटी मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समितीचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे. 

Thursday, 6 October 2022

दिवाळीपूर्वी गत गळीत हंगामातील उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार- चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम संपन्न.

 


 दौलतनगर दि.06:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा जिल्हयातील इतर कारखान्यांपेक्षा कमी  क्षमतेचा कारखाना असला तरी आपण प्रत्येक गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी गाळपास  दिलेल्या ऊसापोटी  एफ.आर.पी.प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करत आलो आहोत.लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई(आबा) यांचे विचारांचा वारसा जोपासत लोकनेते बाळासाहेब उद्योग समुहाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने नेहमीच ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांचे हिताला प्राधान्य देण्याचे धोरण राबविले आहे.त्यानुसार गत वर्षीच्या गळीत हंगामाध्ये कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसाची एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी केले.

            ते दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे विजया दशमी दसऱ्याचे शुभमुहुर्तावर आयोजित बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),अशोकराव पाटील, डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालिका सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर,ॲङमिलिंद पाटील,डी.पी.जाधव,प्रकाशराव जाधव,बबनराव भिसे, विजयराव मोरे, शंकरराव पाटील,जालंदर पाटील, टी.डी.जाधव,कार्यकारी संचालक सुहास देसाई,फायनान्स मॅनेजर विनायक देसाई यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते,अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.तत्पुर्वी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक सुनिल पानस्कर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंगल सुनिल पानस्कर यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयेाजित  केली होती.

                  याप्रसंगी बोलताना चेअरमन यशराज देसाई पुढे म्हणाले की, यंदाच्या गळीत हंगामामध्ये ऊसाची उपलब्धता जास्त आहे. त्यामुळे गळीत हंगाम लवकर सुरु करावा लागणार आहे.सध्या कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून गळीत हंगाम सुरु करण्याची  तयारी पूर्ण झाली आहे.आपल्या जिल्हयातील इतर साखर कारखान्यांचा विचार करता जिल्हयामध्ये जास्त क्षमतेचे कारखाने असून सध्या स्पर्धेच्या युगात टिकणे गरजेचे आहे. सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी साखरेसह इथेनॉलचे उत्पादन करण्याबाबत केंद्र सरकारने धोरण आणले आहे. त्यामुळे आगामी दोन तीन वर्षामध्ये सहप्रकल्प उभारणे गरजेचे असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, गत गळीत हंगामातील एफ.आर.पी.ची 90 टक्के रक्कम ही यापूर्वीच शेतकऱ्यांना दिली आहे.उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम देण्याची तयारी केली असून दिवाळीपूर्वी  शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली जाणार आहे. गत गळीत हंगामामध्ये जिल्हयातील सर्वच कारखान्यांना ऊस तोडणी मजूरांची कमतरता भासली परंतु यंदा ऊस तोडणी  मजूर यंत्रणा कमी पडणार नाही याची काळजी कारखाना व्यवस्थापनाने घेतली आहे.आगामी काळात कारखाना कार्यक्षेत्रामध्ये यंत्राणे ऊस तोडणीचे नियोजनाबरोबर स्थानिक ऊस तोडणी  यंत्रणा सुरु होण्याची गरज  असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने साखर निर्यातीचे धोरणांमध्ये काही बदल करण्याची गरज असून गत तीन वर्षामध्ये गळीत हंगाम सुरु असताना केंद्र सरकारने एफ.आर.पी.च्या रक्कमेत वाढ केली परंतु  सन 2019 साली साखरेचा जो किमान विक्री दर आहे तो आजही  तसाच असून साखरेचा  किमान विक्री दर 36 रुपये होणे गरजेचे आहे. ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने अडचणीचा काळ असूनही विस्तारीकरणा शिवाय पर्याय नसल्याने कारखान्याच्या विस्तारीकरणाचा धाडसी निर्णय घेतला.तसेच सध्या विस्तारीकरणाच्या पहिल्याचे काम अंतिम टप्प्यात येण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे.यंदाचा गळीत हंगाम हा महत्त्वाचा असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्यामध्ये काम करता असताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काटेकोरपणाने पार पाडावी.तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस हा कारखान्यास गळीतास घालून हा गळीत हंगाम यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.दिलीपराव चव्हाण तर आभार अशोकराव पाटील यांनी मानले.

चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना 11 टक्के बोनस जाहिर.

           गत दोन वर्षामध्ये कोविडचे संकट असतानाही ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने आर्थिक धोरणा चांगले राबविले. सध्या कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून गळीत हंगामाची संपूर्ण तयारी झाली असताना लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे परंपरेप्रमाणे कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीसाठी यंदा 11 टक्के बोनस देत असल्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांनी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी जाहिर करताच फटाक्यांची आतिष बाजी केली.तसेच कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांचेवतीने चेअमन मा.यशराज देसाई (दादा) यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

 

Monday, 3 October 2022

बुधवार दि.05 ऑक्टोंबर रोजी विजया दशमी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम.

 

 

 दौलतनगर दि.03:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन २०22-23 च्या ४9 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ बुधवार दि.05ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी १0.30 वाजता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे उपस्थितीत कारखाना कार्यस्थळ दौलतनगर (मरळी) येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक सुनिल शिवराम पानस्कर व त्यांच्या पत्नी सौ. मंगल सुनिल पानस्कर यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयेाजित केली असून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्योच बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमास कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद,शेतकरी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

Friday, 30 September 2022

सत्यजितसिंह कोण ? तर तालुक्यातील निष्क्रिय नेतृत्व म्हणून जनतेने दोन वेळा नाकारलेल्यांना राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार आहे का?मंत्री ना.शंभूराज देसाई यांचा प्रतिसवाल.

 


दौलतनगर दि.30: स्वकर्तृत्व असल्याने राज्यात मला चांगलेच ओळखले जाते पण दुसऱ्याच्या ओळखीची काळजी करणाऱ्यांनी आपली ओळख नेमकी कुठे आहे हे अगोदर तपासून घ्या.आमच्यात हिम्मत असल्यानेच मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेच्या पाठबळावर तुम्हाला विधानसभा निवडणूकीमध्ये सलग दोन वेळा मोठया फरकाने आस्मान दाखवले आहे, याचे भान सत्यतिसिंह यांनी ठेवावे. गेल्या दोन विधानसभा निवडणूकीमध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने ज्या निष्क्रिय नेतृत्वाला मोठया फरकाने घरी बसविले आहे, असा प्रतिसवाल करत ज्या गद्दारीची भाषा आपल्या तोंडून आता येत आहे मग ज्यावेळी आपले नेते यांनी काँग्रेसमधून बंडाळी करत बाहेर पडून वेगळया पक्षाची स्थापना केली,त्यावेळी पहिल्यांदा तुमच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे आपले पिताश्रीं यांनी नेमके काय केले होते याचेही उत्तर तुम्ही अगोदर जनतेला द्यावे, तसेच उठाव आणि बंडळी यातला फरकच ज्यांना कळत नसेल अशा बालिश निष्क्रीय तसेच जनतेने दोन वेळा नाकारलेल्या नेतृत्वाला राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारी आहे का,असा प्रतिसवाल राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिले आहे.

                प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, काहीच काम शिल्लक नसलेल्या मंडळी हया केवळ प्रसिध्दीसाठी मोठया आवेषात बेताल वक्तव्य करत असून त्यांचे कार्यकर्ते टिकून रहावे म्हणून त्यांची करमणूक करण्याचा हा प्रकार असल्याने मतदारसंघातील सर्व सामान्य जनता याकडे गांभीर्याने नक्कीच बघणार नाही. कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये या निष्क्रिय नेतृत्वाने तालुक्यातील जनतेला माझे प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांची खोटी पत्रके काढून निव्वळ करमणूकीचा खेळ केला. त्यामुळे आपण केलल्या करमणूकीमुळे आपल्या सोबत किती जनता आहे हे येणाऱ्या काळातच कळेल. केवळ मोठया नेत्यांची नावे घ्यायची आणि त्यांचे नावे पत्रक काढून लोकांची दिशाभूल करायची हा प्रकार तालुक्यासाठी नविन नाही.अशा प्रकारे केलेला प्रयत्न तालुक्यातील सुज्ञ जनतेने त्यावेळी हाणून पाडला आहे हे ही चांगलेच ज्ञात आहे. निवडणूक आली की वाडयाच्या बाहेर पडायच आणि जनतेमध्ये दिशाभूल करणे हा तुमचा एककल्ली कार्यक्रम आता तालुक्यातील जनतेला चांगलाच माहिती झाला आहे,मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. पाटण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून नेहमीच तालुक्यातील डोंगरी  व दुर्गम भागातील गावे व वाडया वस्त्यांच्या प्रलंबित विकास करण्याचा नेहमीच प्रयत्नशील असून गावां-गावांमध्ये विकासाची कामे सध्या सुरु आहेत. विधानसभेच्या निवडणूकीमध्ये मतदारसंघातील आम जनतेने नेहमीच विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला पाठबळ दिले आहे. निष्क्रीय असणाऱ्या नेतृत्वाला बाजूला करत सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादानेच आपला दोनदा मोठया फरकाने पराभव केला आहे. दुसऱ्यांनी मंजूर केलेल्या व ग्रामपंचायतीच्या फंडातून पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजनासाठी जाण्याची आजपर्यत वेळ आली नसून मतदारसंघामध्ये मंजूर असलेल्या विकास कामांची भूमिपूजने ही विभागा-विभागातील गावा-गावातील माझे सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी करत आहेत.त्यामुळे मतदारसंघामध्ये विकासाची कामे सुरु आहेत की नाही हे झोपेच्या सोंगत असलेल्या व काविळ झालेल्यांना दिसणारच नाहीत. परंतु सर्व सामान्य जनता मताच्या रुपाने नक्कीच याचे उत्तर येणाऱ्या काळात देईल.समोरा-समोर येण्याचे आव्हान देताना आपण ज्या आवेशात बोलत आहात किमान आपण आपली राजकीय उंची तपासून अशा प्रकारची व्यक्तव्य करावीत. आणि समोरा समोर येण्याचे आपण जे आव्हान करत आहात ते आम्ही यापूर्वीच आपल्याला केले आहे.आपणच ठिकाण तारीख व वेळ सांगा जरुर समोरा समोर येऊन दूध का दूध  व पाणी का पाणी केले जाईल.ज्या धनशक्तीचा उल्लेख केला ती कोणाकडे आहे व तालुक्यात निवडणुका आल्या की त्याचा वापर तुमच्याकडून कसा होतो हे तालुक्यातील जनतेला माहित आहे.त्यामुळे धनशक्ती  कोणाकडे आहे व जनतशक्ती कोणाकडे आहे वेगळे सांगण्याची गरजच नाही. गेली दोन अडीच वर्ष जे अज्ञात वासात होते ते आता निवडणुका डोळयासमोर ठेऊन कार्यक्रम कोणता आहे आणि आपण काय बोलतो योचही भान विसरलेल्या मंडळींना जनताच धडा शिकवेल असा टोला शेवटी त्यांनी प्रसिध्दीपत्रकांत लगावला आहे.

Monday, 26 September 2022

मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.26: पाटण या डोंगरी व दुर्गम तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तसेच काही गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना हया जीर्ण व कालबाह्य झाल्या आहेत.त्यामुळे या गावांमध्ये विशेषत: उन्हाळयात कमी दाबाने पाणी पुरवठा होऊन तीव्र पाणी पाणी टंचाई जाणवत असल्याने पाटण तालुक्यातील विविध नळ पाणी पुरवठा योजनांचा राज्य शासनाच्या जलजिवन मिशन योजनेअंतर्गत समावेश होणेकरीता राज्याचे पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार पाटण तालुक्यातील सुचविण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांचा जलजिवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश करण्यात येऊन यामधील आत्तापर्यंत 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सातारा जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

          पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्यातील विविध नळ पाणी पुरवठा योजनांचे कामांना राज्य शासनाचे जलजिवन मिशन योजनेच्या आराखडयामध्ये समावेश होण्यासाठी पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांचेकडे शिफारशी करत या योजनांना मंजूरी मिळण्याकरीता राज्य शासनाकडे सातत्याने त्यांचा पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण तालुक्यातील तब्बल 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी राज्य शासनाकडून आत्तापर्यंत मंजूर करण्यात आला आहे.या नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये नुने 115 लक्ष,पाळशी 14.94 लक्ष,कामरगाव 24.25 लक्ष,मानाईनगर 18.76 लक्ष,डोणीचावाडा वांझोळे 33 लक्ष,भारसाखळे 12.33 लक्ष,विठ्ठलवाडी शिरळ 9.90 लक्ष,जळव 24.96 लक्ष,सदुवर्पेवाडी 14.96 लक्ष,निगडे 24.05 लक्ष,चाळकेवाडी 18.64 लक्ष,पाडळोशी ,तावरेवाडी,मसुगडेवाडी 43.10 लक्ष,पांढरेपाणी आटोली 99.28 लक्ष,गव्हाणवाडी  67.39 लक्ष,रुवले 55.78 लक्ष,ऊरुल 51.40 लक्ष,गलमेवाडी 83.37 लक्ष,चाफळ 163.26 लक्ष,काहिर 50.31 लक्ष,चव्हाणवाडी धामणी 14.97 लक्ष,लोटलेवाडी काळगाव 22.01 लक्ष,शिद्रुकवाडी काढणे 27.46 लक्ष,करपेवाडी काळगाव 48.46 लक्ष,मसुगडेवाडी दाढोली 29.86 लक्ष,मरळोशी 30.18 लक्ष,आंबवडे खुर्द 80.11 लक्ष,कडवे खुर्द रेडेवाडी 80.04 लक्ष,वाटोळे 14.30 लक्ष,मरळी 24.97 लक्ष,आंबळे 24.95 लक्ष,आवर्डे 21.56 लक्ष,कळकेवाडी 15.92 लक्ष,काटेवाडी तारळे 24.49 लक्ष,कुठरे 24.67 लक्ष,घोटील वरचे 24.68 लक्ष,जमदाडवाडी 21.09 लक्ष,तामकडे 24.07 लक्ष,तामकणे 24.90 लक्ष,नवजा कामरगाव 22.27 लक्ष,भुडकेवाडी 24.95 लक्ष,मिरगाव कामरगाव 24.96 लक्ष,वर्पेवाडी सळवे 18.86 लक्ष,वाघणे तळोशी 24.77 लक्ष,शेडगेवाडी  24.10 लक्ष,निवडे पुनर्वसन 23.65 लक्ष,गोषटवाडी 40.82 लक्ष,मुरुड 42.41 लक्ष,सांगवड 40.43 लक्ष,आंबेघर तर्फ मरळी 27.17 लक्ष,जानुगडेवाडी 27.92 लक्ष,उधवणे 36.62 लक्ष,राहुडे 21.57 लक्ष,कोळेकरवाडी डेरवण 75.05 लक्ष,गवळीनगर (कोकीसरे) 20.58 लक्ष,बाचोली 39.96 लक्ष,बनपूरी 197.52 लक्ष,बोडकेवाडी 35.23 लक्ष,केमसे ढाणकल 5.90 लक्ष,चिटेघर 13.11 लक्ष,चौगुलेवाडी सांगवड  13.32 लक्ष,जरेवाडी 4.99 लक्ष,जाईचीवाडी बोंद्री 4.48 लक्ष,दिक्षी धावडे 11.19 लक्ष,मळा काढोली 14.47 लक्ष,मालदन 14.87 लक्ष,शेंडेवाडी 9.10 लक्ष,हावळेवाडी 7.56 लक्ष,आबदारवाडी 8.62 लक्ष,करपेवाडी तळमावले 8.74 लक्ष,सळवे 14.97 लक्ष,गोठणे 12.03 लक्ष,गोवारे 7.74 लक्ष,चोपदारवाडी 7.99 लक्ष,ढोकावळे नाव 8.21 लक्ष,पिंपळोशी 14.97 लक्ष,बनपेठवाडी 10.93 लक्ष,बोर्गेवाडी सळवे 13.01 लक्ष,सोनवडे 14.37 लक्ष,हुंबरवाडी 3.09 लक्ष,मुरुड गोरेवाडी  14.38 लक्ष,दुसाळे 13.56 लक्ष,पाबळवाडी 7.47 लक्ष,एकावडेवाडी सळवे 14.98 लक्ष,मराठवाडी दिवशी खुर्द 8 लक्ष,विठ्ठलवाडी सणबूर 14.89 लक्ष,दिवशी खुर्द 7.37 लक्ष,सिध्देश्वरनगर चोपदारवाडी 5.92 लक्ष,हुंबरणे 12.58 लक्ष,खिवशी 14.97 लक्ष,टेळेवाडी 14.92 लक्ष,नाव 4.24 लक्ष,मराठवाडी 9.60 लक्ष,घाणबी 13.97 लक्ष,तामिणे 12.74 लक्ष,साईकडे 197 लक्ष या योजनांचा समावेश आहे.तसेच धावडे,टोळेवाडी,वजरोशी,नहिंबे चिरंबे,फडतरवाडी घोट, ताईगडेवाडी, पाचगणी, काळोली,आवसरी काठी,कातवडी,मारुल तर्फ पाटण,मरड,किल्ले मोरगिरी,झाकडे बौध्दवस्ती,गोकूळ तर्फ पाटण,सडावाघापूर,जाळगेवाडी,कोकीसरे,मोरेवाडी कुठरे,माथणेवाडी महिंद व महिंद स्टॉप,रामेल,गणेवाडी ठोमसे,दिवशी बु.,गारवडे,जंगलवाडी जाधववाडी, बेंदवाडी, माळवाडी, सवारवाडी,धामणी, काळगाव,लोहारवाडी काळगाव,मस्करवाडी,सतिचीवाडी,धनगरवाडा कसणी,सलतेवाडी,डाकेवाडी वाझोली,ठोमसे या गावांतील योजनांचे अंदाज पत्रक तयार करण्यात येऊन तांत्रिक मान्यतेकरीता सादर करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच प्रशासकीय मान्यता झालेल्या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया करुन या कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी अशा सूचना मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना केल्या असल्याचे शेवटी पत्रकांत नमूद केले आहे.