Friday, 18 November 2022

पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56 वा वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री,मंत्रीमंडळातील मान्यवर मंत्री व लोकप्रतिनिधींसह जिल्हयातील मान्यवरांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. वाढदिनी दौलतनगर येथे कार्यकर्ते,हितचिंतक यांची मोठी गर्दी.

 


दौलतनगर दि.18:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56 वाढदिवस कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर ता. पाटण येथे सामाजीक विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कार्यस्थळावर सकाळपासून रात्री उशीरापर्यंत शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते,पदाधिकारी व हितचिंतक यांची मोठी गर्दी झाली  होती.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56 वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी व मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात उत्साहात साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांचे औक्षण सौ. स्मितादेवी देसाई, सौ. अस्मितादेवी देसाई यांनी केले.यावेळी त्यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई यांचे त्यांनी आशिर्वाद घेतले. त्यावेळी त्यांचे बंधू रविराज देसाई, चिरंजीव यशराज देसाई, कन्या कु. ईश्वरी देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

          त्यानंतर पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेशाचे अभिषेक करुन तसेच मरळी गावची ग्रामदैवत श्री निनाई देवीचे दर्शन घेतले.यावेळी मरळी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचेवतीने नामदार शंभूराज देसाई यांचा सत्कार व अभिष्टचिंतन करणेत आले. त्यानंतर त्यांनी कै. सौ. वत्सलादेवी देसाई,स्व. शिवाजीराव देसाई समाधी व पुर्णाकृती पुतळा,लोकनेते बाळासाहेब देसाई पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सन 2022-23 या गळीत हंगामामधील उत्पादित साखर पोत्यांचे पोती पूजन करुन शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट कै.बाळासाहेब ठाकरेसाहेब यांचे 10 वे पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे हस्ते तालुक्यातील गोर-गरीब महिलांना ब्लँकेट व चटईंचे वाटप व शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येऊन शिवदौलत सहकारी बँकेच्या दौलतनगर येथील शाखेच्या 19 व्या वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तसेच शिवदौलत बँकेमार्फत कर्ज दिलेल्या नविन वाहनांचे वितरण करण्यात आले. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन व नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन केल्यानंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग पाटण अंतर्गत लहान मुलांचे शालेय साहित्याचे प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला.सकाळी 11 ते 04 वा.पर्यंत ते दौलतनगर,ता.पाटण येथील शिव-विजय सभागृहामध्ये शुभेच्छा स्विकारण्यासाठी उपस्थित होते. नामदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते दुपारी 04 वा. मा.यशराज देसाई (दादा) युवा मंच पाटण तालुका यांचेवतीने आयोजित नामदार चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाना पारितोषिक देण्यात आले.सायंकाळी 06 ते 10 वा.पर्यंत शंभू दौलत जल्लोष 2022 हा मराठी सिनेकलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्पुर्वी पाटण विधानसभा मतदारसंघातील शंभूराज युवा संघटना व ग्रामस्थ मरळी,पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ,मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी,शिवदौलत सहकारी बँक,कोयना परिसर कामगार संघटना व पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई सातारा मित्र मंडळ यांचेवतीने  वहीतुला करण्यात आली.तसेच ग्रामपंचायत आबदारवाडी यांचेवतीने शिवशंभू दूध उत्पादक व प्रक्रिया संघ लि.दौलतनगर यांनी उत्पादित केलेल्या पेढयांची वहितूला करण्यात आली.

                वाढदिनी नामदार शंभूराज देसाई यांना शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावरील त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. नामदार शंभूराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांनी दूरदृश्यप्रणालीव्दारे शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, विधानसेभेचे विरोधी पक्ष नेते ना.अजितदादा पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दुरध्वनीद्वारे,तर ना.उदय सामंत, ना.संदिपान भुमरे,ना.दादा भुसे,ना.संजय राठोड, ना.अब्दुल सत्तार, ना.गुलाबराव पाटील,माजी मंत्री राम शिंदे,माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार श्रीमंती छत्रपती उदयनराजे भोसले, माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,आमदार अनिल(भाऊ)बाबर,आमदार शहाजीबापू पाटील,आमदार प्रकाश आबीटकर,आमदार ज्ञानेश्वर चौगुले, महेश शिंदे, यांनी प्रत्यक्ष भेटून तर श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार हेमंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,आमदार दिपक चव्हाण,आमदार किशोर जोरगेवार,आमदार मकरंद पाटील,आमदार आमदार जयकुमार गोरे,आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार प्रविण दरेकर,आमदार गणपतराव गायकवाड,आमदार रविंद्र फाटक,आमदार प्रकाश सुर्वे,माजी आमदार दिलीप येळगावकर,धैर्यशिल कदम,खासदार रणजितसिहं मोहिते पाटील,प्रशांत परिचारक,मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी शशिकांत जाधव,नगरसेवक ठाणे संजय मोरे,राजेंद्रसिंह यादव कराड,ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी  मनोज जिंदाल,आयुक्त विजय सुर्यवंशी माजी आमदार आनंदराव पाटील,माजी आमदार सुनिल धांडे,खंडाळयाचे माजी सभापती नितीन भरगुडे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, जिल्हा परीषद सदस्य प्रदीप पाटील, परिक्षित थोरात,ॲङ इंद्रजित चव्हाण,प्रकाश तवटे,जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारे, जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख,जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण, सहा.आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे, सार्वजनिक बांधकाम विभाग संजय मुंगीलवार, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता मनोज खैरमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड,कराडचे रणजित पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार,परेश शेठ,उपविभागीय अधिकारी सुनील गाढे,तहसिलदार रमेश पाटील, गट विकास अधिकारी गोरख शेलार, गटशिक्षणाधिकारी दिपाली बोरकर,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील शिंदे,उपअभियंता  सुनील बसुगडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही.डी.शिंदे,अरुण जाधव,नरभट,सय्यद,अक्षय देसाई,जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे घंटे,संदिप पाटील,संग्रामसिंह भोसले,ए.जे.पाटील,आरोग्य विभागाचे प्रमोद खराडे,कुराडे,शिकलगार,कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील,माजी व्हा. चेअरमन राजाराम पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे, शशिकांत निकम,सोमनाथ खामकर,सर्जेराव जाधव, प्रशांत पाटील,सुनील पानस्कर,बळीराम साळूंखे,भागोजी शेळके,विजय सरगडे,शंकरराव पाटील,बबनराव शिंदे,लक्ष्मण बोर्गे,सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर, शिवदौलत बँकेच्या चेअरमन संजय देशमुख,व्हा.चेअरमन सौ.कुसुम मोहिते,माजी चेअरमनॲड.मिलिंद पाटील, संचालक चंद्रकांत पाटील, सुनील पवार,अशोकराव पाटील,धोंडीराम भोमकर,वाय.के.जाधव, मधुकर पाटील,नेताजी मोरे,पांडूरंग निकम,रणजित शिंदे,माणिक पवार,हेमंत पवार,चंद्रकांत कांबळे शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष इंदुताई मिसाळ,किरण सुर्यवंशी,अशोक झिमरे,महेश शिद्रुक,विजय बाबर,अनिता जाधव,विलास कुराडे, कुणाल चंदुगडे,दिपक गव्हाणे,विजय साळुंखे,माजी जि.प.सदस्य डी.वाय.पाटील,जालंदर पाटील, बशीर खेांदू, ॲङडी.पी.जाधव,प्रकाशराव जाधव,बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, सुग्रा खोंदु,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,संतोष गिरी, पंजाबराव देसाई, सीमा मोरे, सुभद्रा शिरवाडकर,पांडूरंग शिरवाडकर,पाटण नगरपंचायतीचे नगरसेविका शैलजा मिलिंद पाटील,आस्मा इनामदार, माजी नगरसेवक अब्दुलगणी चाफेरकर, माजी नगरसेविका मनिषा जंगम,नाना पवार,मनोज पाटील,मिलिंद पाटील,बबनराव माळी,अमोल पाटील,प्रकाश पवार, शैलेंद्र शेलार,सावळाराम लाड, सदानंद साळूंखे, दिलीप सपकाळ, गणेश भिसे,किसन गालवे,उत्तम मोळावडे,विजयराव मोरे,टी.डी.जाधव,शिवाजीराव शेवाळे,आप्पा मगरे,डी.एम.शेजवळ,नथूराम कुंभार,राजेंद्र चव्हाण,अमोल चव्हाण,अभिजित चव्हाण,धनाजी केंडे, विष्णू पवार,अरविंद पवार,नाना साबळे,संपत कोळेकर,संजय शिर्के,विलास गायकवाड, प्रकाश टोपले,महिपती गायकवाड,नथूराम सावंत,निवृत्ती कदम,दादा जाधव,संतोष पवार,शंकर पाटील,किसन कवर, बाळासो सुर्यवंशी, बाजीराव रांजणे,चंद्रकांत जगताप,राजेंद्र चव्हाण, विश्वास निकम,रविंद्र सपकाळ,रामभाऊ कदम,रविंद्र जाधव,नाना पवार,गोरख चव्हाण,प्रविण पाटील,शिवाजी जाधव,मनोहर कडव,राजेंद्र पाटील,प्रकाशराव नेवगे,जे.एम.पवार,मनोज मोहिते,राजाराम मोहिते,ॲङ बाबूराव नांगरे, शंभूराज युवा संघटनेचे अध्यक्ष भरत साळूंखे,अभिजित पाटील, कारखान्याचे माजी संचालक मधूकर भिसे, प्रकाश नेवगे, आनंदराव चव्हाण,गजानन जाधव,अशोकराव डिगे,शंकर शेजवळ,राजेंद्र गुरव,विकास गिरी-गोसावी, विजयराव जंबुरे,बबनराव भिसे, विश्वास पाटील,सौ.विश्रांती  जंबुरे देशमुख, वसंत कदम,जोतिराज काळे,दिपक साळूंखे, अमोल मोहिते,राजू सणस, रघुनाथ पानस्कर,शंकर पवार,राजेंद्र माळी,लक्ष्मण संकपाळ,पांडूरंग बेबले,प्रविण पाटील,संग्राम पाटील,संजय सणस,अभिजित पवार,राजेंद्र दशवंत,किरण दशवंत,वैभव देशमुख,सचिन पवार,राहूल पाटील, ,नवनाथ पाळेकर,प्रशांत मोहिते,महेश पाटील,राजू चव्हाण,प्रशांत मोरे,मुज्जमिल खोंदू,वैभव पवार,अनिकेत देसाई, डी.एम.शेजवळ,महादेव पाटील,रामचंद्र कुंभार,भरत बादल,बाळासाहेब भाकरे,महिपती गायकवाड,नामदेवराव साळूंखे,रणजित शिंदे,विजय पवार(फौजी),सागर सपकाळ,राहूल घाडगे,दै.पुढारीचे सतीश मोरे,उपसंपादक अमोल चव्हाण,अशोक मोहने,चंद्रजित पाटील,महेश पाटील,तुषार देशमुख, दै.तरुण भारतचे आवृत्ती प्रमुख दिपक प्रभावळकर,संभाजी भिसे,दै.मुक्तागिरी विद्या म्हासुर्णेकर,दै.लोकमतचे निलेश साळुंखे, दैनिक प्रभात अमित शिंदे,विजय सुतार,विजय लाड,किशोर गुरव,संदिप राजे,संदिप गायकवाड,दैनिक सकाळचे अरुण गुरव,विजय लाड यांच्यासह विविध गावातील सरपंच,उपसरपंच,तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,शिवशाही सरपंच संघ पाटण तालुका कार्यकारीणीचे पदाधिकारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका,जयमल्हार मातंग संघटना पाटण तालुका,कोयना परिसर साखर कामगार संघटना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना तसेच बाळासाहेबांची शिवसेना,युवासेना महिला आघाडी सातारा जिल्हा या संघटनांचे सर्व कार्यकर्ते,हितचिंतक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

 

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईंचे हस्ते गोरगरीब महिलांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप.

 

दौलतनगर दि.18:-हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७ नोव्हेंबर,रोजी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते संसारोपयोगी साहित्याचे  ब्लँकेटचे व चटईचे तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रतिवर्षी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात येतो.यंदाच्या वर्षी शिवसेनाप्रमुख यांचे दहाव्या पुण्यस्मरण दिनाचे व यानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना ब्लँकेट व चटईचे तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम दि.१७ नोव्हेंबर रोजी आयोजीत करण्यात आला होता.या दिनानिमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमत: शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात येवून त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने या पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील महिलांना त्यांचे शुभहस्ते ब्लँकेट व चटई तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),अशोकराव पाटील,प्रदिप पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,पाटण मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना,युवासेना पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी हे मोठया संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करताना  नामदार शंभूराज देसाई म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जिव्हाळयाचे ऋृणानुबंध होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले होते हे अवघा महाराष्ट्र जाणून आहे.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार अनेक वर्षे तळपती ठेवली.तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगचित्रातून टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती.मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार पाडला.आपल्या लेखणीतून,व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आली आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख व हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखू लागला.आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत परंतू त्यांनी दिलेले आदर्श विचारांतून शिवसेना पक्षाची व संघटनेची वाटचाल सुरु आहे.आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील सरकारमध्ये महत्त्वाच्या पाच खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्री यांनी आपल्यावर सोपवली आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे आदर्श विचारांचा वारसा जोपासत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघाचेवतीने व आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने मी विनम्र अभिवादन करतो,असे ते शेवठी म्हणाले.

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा दि.20 रोजी 79वा जयंती सोहळा. पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची राहणार प्रमुख उपस्थिती. माध्यमिक,उच्च माध्यमिक व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळयाचे आयोजन

दौलतनगर दि.१8:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचेवतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 79 वा जयंती सोहळा रविवार दि. 20 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वा दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात येणार असून हा  जयंती सोहळा महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी दिली आहे.दरम्यान दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथी कार्यक्रमावेळी पाटण‍ विधानसभा मतदारसंघातील माध्यमिक,उच्च माध्यमिक व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पुढे ढकलण्यात आलेला सत्कार सोहळा व मुक-बधीर विद्यार्थ्यांना गणेश वाटप हे कार्यक्रम या जयंती सोहळया दिवशी घेण्यात आला आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (स्व.आबासाहेब) यांच्या जयंती सोहळा कार्यक्रमाला कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद व शेतकरी, हितचिंत, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी व पालक यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही पत्रकांत करण्यात आले आहे.

Monday, 14 November 2022

पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या 56 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा.

  

दौलतनगर दि.१4:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56 वा वाढदिवस गुरुवार दि.17 नोव्हेंबर,2022 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याची  माहिती पालमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचेकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली असून वाढदिवसानिमित्त नामदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा देण्याकरीता येणाऱ्या हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  पुष्पहार अथवा हारतुरे न आणता तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना वाढदिवसाची भेट देण्याकरीता वहया तसेच शालेय वस्तू आणाव्यात, सायंकाळी 06.00 वा दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी मराठी भव्य संगीत रजनी कार्यक्रम ‘शंभू दौलत जल्लोष 2022’ हा मराठी कलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजीत केला असून, पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी सर्व रोग निदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही  वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

               पत्रकांत म्हंटले आहे की, नामदार शंभूराज देसाई यांचा 56वा वाढदिवस गुरुवार दि.17 नोव्हेंबर,2022 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असून या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर येथे करण्यात आला आहे. 56 व्या वाढदिवसानिमित्त सकाळी कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर सकाळी 09.00 ते 11.00 पर्यंत ते कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी  येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन स्विकारणार आहेत.त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई ( ताईसाहेब ) यांच्या पुतळा, स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची समाधी व पुर्णाकृती  पुतळयास व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र अभिवादन केल्यानंतर हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन करुन पुण्यस्मरण दिनानिमित्त गरीब कुटुंबातील महिलांना ब्लँकेट व चटईचे वाटप करण्यात येणार आहे.दौलतनगर येथील शिवदैालत बँकेच्या शाखेच्या 19 व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर वाढदिवसानिमित्त आयोजित सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन करुन एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग पाटण अंतर्गत अंगणवाडी विद्यार्थ्यांकरीता तयार करण्यात आलेल्या शालेय साहित्याचे प्रदर्शनाचा शुभारंभ करणार आहेत. त्यानंतर त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर स.11.00 पासून दुपारी 04.00 वाजेपर्यंत नामदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते,हितचिंतक व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत.सायंकाळी 06.00 वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी भव्य संगीत रजनी कार्यक्रम ‘शंभू दौलत जल्लोष 2022’ हा मराठी कलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. दरम्यान मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दौलतनगर ता.पाटण येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नियोजन समितीने केले आहे. दरम्यान नामदार शंभूराज देसाई हे या दिवशी दिवसभर शुभेच्छा स्विकारण्यासाठी दौलतनगर ता.पाटण येथे उपस्थित राहणार आहेत,याची हितचिंतकांनी नोंद घ्यावी तसेच शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे,पुष्पगुच्छ व पुष्पहार न आणता शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पेन,वहया इ.शालेय साहित्य आणावे असे आवाहनही पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्या वतीने पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

Saturday, 12 November 2022

ना.शंभूराज देसाई यांचे 56 व्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता शालेय साहित्य,वहया आणा. पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईं वाढदिवस नियोजन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन.

 

   दौलतनगर दि.12 :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,पाटण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचा वाढदिवस प्रतिवर्षी पाटण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांव्दारे मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.यंदा त्यांचा 56 वा वाढदिवस गुरुवार दि.17 नोव्हेंबर,2022 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे मोठया दिमाखात साजरा करण्याचे नियोजित आहे. वाढदिवस असो वा सत्कार समारंभ या कार्यक्रमामध्ये शाल,श्रीफळ,फेटा देवून सत्कार किंवा स्वागत करण्यापेक्षा सत्कार म्हणून शालेय साहित्य अथवा वहया दयाव्यात हा पायंडा स्वत: नामदार शंभूराज देसाईंनीच मतदारसंघात पाडला असून त्यांचे दि.17 नोव्हेंबर रोजीचे वाढदिवसानिमित्त भेट देताना पुष्पगुच्छ,हारतुरे न आणता मतदार संघातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लावणेकरीता भेट म्हणून वहया व शालेय सहित्यच दयावे असे आवाहन पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिीच्यावतीने  प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

             पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांनी केलेल्या आवाहनामध्ये म्हंटले आहे की, प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने हार तुरे आणून शुभेच्छा देण्यात येत होत्या.त्या दिवसापुरते  त्या हारतुऱ्यांचे महत्व होते परत हे सर्व हारतूरे एकत्रित करुन त्याची विल्हेवाट लावावी लागत असल्याने ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाला भेट देवून सदिच्छा देणाऱ्या व्यक्तींनी हारतूरे न आणता गरीब कुटुंबातील मुलामुलींना शिक्षणासाठी हातभार लागण्याच्या हेतूने वहया तसेच शालेय साहित्यच भेट दयावे  असे आवाहन ना.शंभूराज देसाई यांनी या अगोदरच केले आहे. त्यांचे या आवाहनाला मतदारसंघातील जनतेने  चांगला प्रतिसाद दिला. हाच पायंडा लग्नसमारंभ तसेच सत्कार समारंभाच्या निमित्ताने राबविला त्यासही जनतेने मोठया संख्येने प्रतिसाद दिला.प्रतिवर्षी ना.शंभूराज देसाई यांना भेट म्हणून मिळणाऱ्या वहया तसेच शालेय साहित्य हे मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुला-मुलींना शिक्षणासाठी हातभार म्हणून मतदारसंघात वाटप करण्यात येत असते. गत दहा वर्षापासून प्रतिवर्षी ना.शंभूराज देसाई यांचा वाढदिवस तसेच इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट स्वरुपात मिळणाऱ्या वहयांचा सदुपयोग पाटण मतदारसंघातील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थींनीना देवून मदतीचा हातभार लावला आहे.त्यामुळे यंदाच्या वर्षीही ना.शंभूराज देसाई यांचे वाढदिवसानिमित्त भेट देताना वहया तसेच शालेय साहित्य दयावे, असे आवाहन पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने मतदारसंघातील सर्व  कार्यकर्ते,पदाधिकारी व हितचिंतक यांना केले आहे.