Monday 14 November 2022

पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या 56 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी होणार साजरा.

  

दौलतनगर दि.4:-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख,महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचा 56 वा वाढदिवस गुरुवार दि.17 नोव्हेंबर,2022 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे विविध उपक्रमांनी साजरा होणार असल्याची  माहिती पालमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समिती यांचेकडून प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली असून वाढदिवसानिमित्त नामदार शंभूराज देसाईंना शुभेच्छा देण्याकरीता येणाऱ्या हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  पुष्पहार अथवा हारतुरे न आणता तालुक्यातील गरीब कुटुंबातील मुलामुलींना वाढदिवसाची भेट देण्याकरीता वहया तसेच शालेय वस्तू आणाव्यात, सायंकाळी 06.00 वा दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी मराठी भव्य संगीत रजनी कार्यक्रम ‘शंभू दौलत जल्लोष 2022’ हा मराठी कलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजीत केला असून, पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी सर्व रोग निदान शिबिराचे ही आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही  वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

               पत्रकांत म्हंटले आहे की, नामदार शंभूराज देसाई यांचा 56वा वाढदिवस गुरुवार दि.17 नोव्हेंबर,2022 रोजी दौलतनगर ता.पाटण येथे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असून या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कारखाना कार्यस्थळ, दौलतनगर येथे करण्यात आला आहे. 56 व्या वाढदिवसानिमित्त सकाळी कुटुंबियांच्या वतीने औक्षण झालेनंतर सकाळी 09.00 ते 11.00 पर्यंत ते कारखाना कार्यस्थळावरील श्री गणेश मंदीरामध्ये गणेश दर्शन करुन मरळी  येथे ग्रामदैवत निनाईदेवीचे दर्शन झालेनंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थ मरळी यांच्यावतीने सत्कार व अभिष्टचिंतन स्विकारणार आहेत.त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई ( ताईसाहेब ) यांच्या पुतळा, स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांची समाधी व पुर्णाकृती  पुतळयास व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अपर्ण व विनम्र अभिवादन केल्यानंतर हिंदुहदयसम्राट शिवसेना प्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांचे दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन करुन पुण्यस्मरण दिनानिमित्त गरीब कुटुंबातील महिलांना ब्लँकेट व चटईचे वाटप करण्यात येणार आहे.दौलतनगर येथील शिवदैालत बँकेच्या शाखेच्या 19 व्या वर्धापनदिन समारंभास उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर वाढदिवसानिमित्त आयोजित सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन करुन एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग पाटण अंतर्गत अंगणवाडी विद्यार्थ्यांकरीता तयार करण्यात आलेल्या शालेय साहित्याचे प्रदर्शनाचा शुभारंभ करणार आहेत. त्यानंतर त्यांचे निवासस्थानी शिवविजय हॉल येथे आगमन झालेनंतर स.11.00 पासून दुपारी 04.00 वाजेपर्यंत नामदार शंभूराज देसाई हे वाढदिवसानिमित्त कार्येकर्ते,हितचिंतक व आम जनतेच्यावतीने निवासस्थानी शिवविजय हॉल येथे शुभेच्छा स्विकारणार आहेत.सायंकाळी 06.00 वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेसाठी भव्य संगीत रजनी कार्यक्रम ‘शंभू दौलत जल्लोष 2022’ हा मराठी कलावंतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. दरम्यान मंत्री ना. शंभूराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून दौलतनगर ता.पाटण येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या सर्व रोग निदान शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन नियोजन समितीने केले आहे. दरम्यान नामदार शंभूराज देसाई हे या दिवशी दिवसभर शुभेच्छा स्विकारण्यासाठी दौलतनगर ता.पाटण येथे उपस्थित राहणार आहेत,याची हितचिंतकांनी नोंद घ्यावी तसेच शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे,पुष्पगुच्छ व पुष्पहार न आणता शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पेन,वहया इ.शालेय साहित्य आणावे असे आवाहनही पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई वाढदिवस नियोजन समितीच्या वतीने पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment