दौलतनगर दि.18:-हिंदुहृदयसम्राट
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने
दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने
समुहाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज
देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७ नोव्हेंबर,रोजी
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने
पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते
संसारोपयोगी साहित्याचे ब्लँकेटचे व चटईचे
तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
दौलतनगर,ता.पाटण येथे लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने प्रतिवर्षी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आयोजीत
करण्यात येतो.यंदाच्या वर्षी शिवसेनाप्रमुख यांचे दहाव्या पुण्यस्मरण
दिनाचे व यानिमित्ताने पाटण मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना ब्लँकेट व
चटईचे तसेच शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम दि.१७ नोव्हेंबर रोजी आयोजीत करण्यात आला
होता.या दिनानिमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण
समुहाच्यावतीने समुहाचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार
शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमत: शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे
यांना विनम्र अभिवादन करण्यात येवून त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने या
पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील महिलांना त्यांचे शुभहस्ते ब्लँकेट व चटई तसेच शालेय विद्यार्थ्यांना
खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज
देसाई(दादा),अशोकराव पाटील,प्रदिप पाटील,विजय पवार,जालंदर पाटील,पाटण मतदारसंघातील
बाळासाहेबांची शिवसेना,युवासेना पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध संस्थांचे पदाधिकारी
हे मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे
यांना अभिवादन करताना नामदार शंभूराज
देसाई म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जिव्हाळयाचे ऋृणानुबंध होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना करताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले होते हे अवघा महाराष्ट्र
जाणून आहे.शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची
तलवार
अनेक वर्षे तळपती ठेवली.तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी
जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट
कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगचित्रातून टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी
उडविण्याची शक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही
होती.मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून अविरतपणे चालविला आणि पार
पाडला.आपल्या लेखणीतून,व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे
प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली शिवसेनेच्या
स्थापनेपासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
ही एक झंझावाती शक्ती म्हणून
महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आली आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख व हिंदुहृदयसम्राट म्हणून ओळखू लागला.आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत
परंतू त्यांनी दिलेले आदर्श विचारांतून शिवसेना पक्षाची व संघटनेची वाटचाल सुरु
आहे.आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील सरकारमध्ये महत्त्वाच्या पाच खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्री यांनी आपल्यावर
सोपवली आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे
आदर्श विचारांचा वारसा जोपासत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दहाव्या
पुण्यस्मरण दिनानिमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघाचेवतीने व आदरणीय लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने मी विनम्र अभिवादन करतो,असे ते शेवठी म्हणाले.
No comments:
Post a Comment