Friday 18 November 2022

स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा दि.20 रोजी 79वा जयंती सोहळा. पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची राहणार प्रमुख उपस्थिती. माध्यमिक,उच्च माध्यमिक व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळयाचे आयोजन

दौलतनगर दि.8:- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचेवतीने कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 79 वा जयंती सोहळा रविवार दि. 20 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 10.00 वा दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करण्यात येणार असून हा  जयंती सोहळा महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.रविराज देसाई(दादा) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांनी दिली आहे.दरम्यान दि. 12 जुलै रोजीचे पुण्यतिथी कार्यक्रमावेळी पाटण‍ विधानसभा मतदारसंघातील माध्यमिक,उच्च माध्यमिक व विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पुढे ढकलण्यात आलेला सत्कार सोहळा व मुक-बधीर विद्यार्थ्यांना गणेश वाटप हे कार्यक्रम या जयंती सोहळया दिवशी घेण्यात आला आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.शिवाजीराव देसाई (स्व.आबासाहेब) यांच्या जयंती सोहळा कार्यक्रमाला कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद व शेतकरी, हितचिंत, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी व पालक यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहनही पत्रकांत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment