Tuesday, 10 October 2023

चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर युवकांसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मांदीयाळी.

 



दौलतनगर दि.10:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून पाटण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच युवकांची मांदीयाळी होती. श्रीमती विजयादेवी देसाई(मॉसाहेब), मंत्री ना.शंभूराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा), सौ.अस्मितादेवी देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई,ईश्वरी दिदी यांनी मा.यशराज देसाई (दादा) यांना कोयना दौलत निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

               पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस  प्रतिवर्षी  मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा येथील एहसास मतीमंद मुलांचे शाळेमध्ये खाऊवाटप करण्यात आले. दौलतनगर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे  पुर्णाकृती  पुतळयाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी दौलतनगर येथील श्री गणेश मंदिरामध्ये श्री गणेशाच दर्शन घेतले तद्नंतर मरळी गावचे ग्रामदैवत श्री निनाईदेवी मंदिर येथे निनाईदेवीचे दर्शन घेतले. श्री. निनाईदेवी मंदीरामध्ये मरळी ग्रामस्थांच्या मा. यशराज देसाई यांनी शुभेच्छा स्विकारल्या. त्यानंतर कै.सौ.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब), स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयाचे दर्शन घेऊन त्यांनी कारखाना परिसरातील शिवविजय हॉल येथे मा.यशराज देसाई (दादा)  यांचे आगमण झाले. शिवविजय हॉल येथे  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहाचेवतीने केक कापून वाढदिवस साजरा केल्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचेकडून शुभेच्छा स्विकारल्या. दरम्यान सकाळी 11.30 वा. मा.यशराज देसाई(दादा) यांचे नवारस्ता या ठिकाणी पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने पूष्पवृष्टी करुन जंगी स्वागत करण्यात आले. या ठिकाणी त्यांचे औक्षण करुन जाहिर सत्कार ही करण्यात आला.

            मा.यशराज देसाई यांना  शुभेच्छा देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. मा.यशराज देसाई यांना दूरध्वनीव्दारे व समक्ष भेटून हजारो कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधिक्षक समीर शेख खासदार श्रीनिवासजी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, विजय पवार परिक्षित थोरात, परेश शेठ, राजेंद्र देसाई कोल्हापूर,कार्यकारी संचालक सुहास देसाई, कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडूरंग नलवडे, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख माजी चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, संचालक शशिकांत निकम, बळीराम साळुंखे, शंकर पाटील, सोमनाथ खामकर,प्रशांत पाटील,विकास गिरी-गोसावी,विजयराव जंबुरे, प्रकाशराव जाधव,प्रकाश पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,बशीर खोंदु,माजी पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई सुरेश पानस्कर,संतोष गिरी, पांडूरंग शिरवाडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासो पाटील,उपसभापती विलास गोडांबे,संचालक राजेंद्र पाटील,मानसिंग कदम, प्रकाश तवटे, बाळासो सुर्यवंशी,समीर भोसले,दादासो जाधव,सिध्दार्थ गायकवाड,धनाजी गुजर, जोतिराज काळे,सुधाकर देसाई,नितीन यादव,संग्राम मोकाशी,सौ.वैशाली अनिल शिंदे,श्रीमती जयश्री पवार,विजयराव मोरे, गणेश काजारी, शिवसेना पदाधिकारी राजकुमार कदम ,राजेश चव्हाण,सागर नलवडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनावणे, रत्नदिप जाधव, राजकुमार कदम, अमोल पाटील, शिवाजी देसाई, गोरख देसाई, माणिक पवार, शिवाजी बोंगाणे, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, अशोकराव पाटील, सावळाराम लाड,भागोजी शेळके,दिपक सुतार, मिलींद पाटील, सलीम इनामदार, गणीभाई चाफेरकर,सुरेश जाधव विठ्ठल पवार, विलास कु-हाडे, संजय शिर्के, विनायक शिर्के,अरविंद पवार, विष्णू पवार, गणेश भिसे,किसन गालवे,संजय देशमुख, उत्तम मोळावडे,प्रविण पाटील, जालंदर पाटील, संग्राम पाटील,संग्राम देसाई,कृष्णराज देसाई,माजी पंचायत समिती सदस्य ॲङ डी.पी.जाधव,नथूराम कुंभार, बबनराव शिंदे,अमोल चव्हाण, अभिजित चव्हाण,धनाजी केंडे, विष्णू पवार,अरविंद पवार, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,नाना साबळे, हेमंत पवार, प्रकाश टोपले,महिपती गायकवाड,नथूराम सावंत,निवृत्ती कदम, शंकर पाटील,किसन पवार,माणिक पवार, बाळासो सुर्यवंशी, राजेंद्र चव्हाण, विश्वास निकम,रामभाऊ कदम, रविंद्र जाधव,नाना पवार,मनोज मोहिते, प्रशांत घार्गे, राजाराम मोहिते, मधुकर पाटील,नेताजी मोरे, ॲङ बाबूराव नांगरे,प्रदिप पाटील,हणमंतराव चव्हाण,लक्ष्मण देसाई,प्रकाश पाटील,सुनिल निकम,संदिप साळूंखे,विश्वासराव कणसे,शिवाजीराव गायकवाड,प्रभाकर शिंदे,अशोक माने,जयवंत जाधव,तुकाराम डूबल,सचिन पाटील,प्रताप सुर्यवंशी,सचिन पवार,शंभूराज युवा संघटनेचे उपाअध्यक्ष अभिजित पाटील, धनाजी शेवाळे, जय मल्हार मातंग संघटनेचे अध्यक्ष बबनराव भिसे, दै.पुढारीचे तुषार देशमुख, दै.तरुण भारतचे संभाजी भिसे, दैनिक सकाळचे अरुण गुरव यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह,मोरणा शिक्षण संस्था,पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती,शिवशाही सरपंच संघ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच पाटण तालुका, जयमल्हार मातंग संघटना पाटण तालुका, कोयना परिसर साखर कामगार संघटना,शिवसेना,युवासेना,पाटण तालुका शंभूराज युवा संघटना तसेच तालुक्यातील देसाई कुटूंबावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी कोयना परिसर साखर कामगार संघटना दौलतनगर,शिवदौलत सहकारी बँक,मा.यशराज देसाई(दादा) मित्र मंडळ मोरणा विभाग,मा.यशराज देसाई(दादा) युवा मंच ढेबेवाडी विभाग यांचेवतीने वहितूला करण्यात आली.

चौकट-वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी शिबीराचा शुभारंभ

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य विभाग व मा.यशराज देसाई(दादा)वाढदिवस नियोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने पाटण विधानसभा मतदारसंघातील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची तज्ञ डॉक्टरांचेकडून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा शुभारंभ  मतदारसंघातील 14 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आज करण्यात आला असून पाटण विधानसभा मतदारसंघातील 549 जिल्हा परिषद शाळांमधील 12899 शालेय विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य शिबीर तपासणी  करण्यात येणार आहे.

चौकट- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप.

पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी यामधील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप करण्याचा मनोदय मा.यशराज देसाई(दादा) वाढदिवस नियोजन समितीच्यावतीने केला होता.त्यानुसार केवळ दोनच दिवसांमध्ये शालेय साहित्य व खाऊ वाटपाचे नियोजन करण्यात येऊन चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे वाढदिवसानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील 549 जिल्हा परिषद शाळांमधील 12899 विद्यार्थ्यांना व 729 अंगणवाडयांमधील 4515 विद्यार्थ्यांना त्या त्या गावातील युवा पदाधिकारी,कार्यकर्ते यांचेवतीने शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

Friday, 6 October 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून ग्रामीण मार्ग दुरुस्ती,लघु पाटबंधाऱ्यांची कामे व नविन साकव यांना 04 कोटी 87 लक्ष निधी मंजूर.

 


 

दौलतनगर दि.06:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांना दळण वळणाचेदृष्टीने महत्त्वाचे असलेल्या ग्रामीण मार्गांचे दुरुस्तीसाठी 01 कोटी 05 लाख तर विविध गावांमध्ये शेतीच्या पाण्याची सोय होण्यासाठी लघु पाटबंधाऱ्यांचे विविध कामांसाठी 02 कोटी 21 लक्ष 30 हजार तसेच काही गावांचे पोहोच रस्त्यावर साकव बांधणेच्या कामांना सर्वसाधारण साकव योजनेतून 1 कोटी 61 लाख 59 हजार रुपयांचा निधी असा एकूण 04 कोटी 87 लक्ष 89 हजार रुपयांचा निधी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशी नुसार सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार विविध विकास कामांचा सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये समावेश करण्यात येऊन या विकास कामांना निधी मंजूर झाला आहे. सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील चार ग्रामीण मार्गांसाठी 01 कोटी 05 लाख रुपये मंजूर झाला आहे. त्यामध्ये डेरवण कोळेकरवाडी रस्ता ग्रामा 130 सुधारणा 20 लक्ष, नाव ते गोवारे पोहोच रस्ता ग्रामा 193 सुधारणा 20 लक्ष, सोनवडे ते खांडेकरवाडी रस्ता ग्रामा 239 सुधारणा 30 लक्ष व डावरी पोहोच रस्ता ग्रामा 244 सुधारणा 35 लक्ष या ग्रामीण रस्त्यांचा समावेश आहे.तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लघु पाटबंधाऱ्यांचे 13 कामांसाठी 02 कोटी 21 लक्ष 30 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये जुंगठी दिवशी खुर्द  साठवण हौद व शेती आडवे पाट 14.43 लक्ष, जुगाईवाडी घोट पाट व पाईप लाईन 10.08 लक्ष, घाणबी  साठवण हौद 25.08 लक्ष, वेखंडवाडी येथे शेतीसाठी पाण्याचे आडवे पाट 19.95 लक्ष, सडावाघापूर ग्रामतलाव दुरुस्ती 10.28 लक्ष, कळंबे पाझर तलाव दुरुस्ती 30.33 लक्ष, खराडवाडी बामणकी शिवारातील बंधारा दुरुस्ती व आर.सी.सी.पाट 24.17 लक्ष, केळेवाडी कडवे पाट 21.09 लक्ष, पाडळोशी येथे मसुगडेवाडी धैवणीची डाग येथे वळण बंधारा व पाण्याचे आडवे पाट 14.16 लक्ष, मेंढोशी येथील वळण बंधारा दुरुस्ती 8.87 लक्ष, पाबळवाडी येथे शेतीसाठी आडवे पाट 14.79 लक्ष, आवर्डे मागासवर्गीय वस्ती वळण बंधारा व वितरण व्यवस्था 10 लक्ष व वनकुसवडे येथे शेतीसाठी आर.सी.सी.साठवण हौद व आडवे पाट 18.07 लक्ष या कामांचा समावेश आहे तर दळणवळणाचे दृष्टीने मुख्य रस्त्यावर साकव बांधणेच्या कामांना सर्वसाधारण साकव योजनेअंतर्गत मंजूरी मिळाली असून या साकवच्या कामांमध्ये वेखंडवाडी ते चोरजवाडी रस्त्यावर साकव 50 लक्ष, सोनाईचीवाडी येथे सोनाईचीवाडी ते गारवडे रस्स्त्यावर साकव पूल 60 लक्ष, वाटोळे येथे पाबळ ओढयावर साकव पूल 51.59 लक्ष या तीन साकवच्या कामांचा समावेश आहे.दरम्यान पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून ग्रामीण मार्ग दुरुस्ती, लघु पाटबंधाऱ्यांची कामे व सर्वसाधारण साकवच्या कामांना भरघोस निधी मंजूर झाला असल्याने डोंगरी व दुर्गम भागातील रस्ते व साकव अभावी होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून शेतीच्या पाण्याचेदृष्टीने लघु पाट बंधाऱ्यांच्या कामांना निधी मंजूर झाला असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्या अभावी होणारी गैरसोय दूर होणार असून मंजूर झालेल्या विकास कामांच्या निवीदा प्रक्रिया तातडीने करुन पावसाळा संपताच या विकास कामांना तातडीने सुरु करण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांची संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.


चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचा दि.10 ऑक्टोंबर रोजीचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा.

 



दौलतनगर दि.06:- महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा) यांचा मंगळवार  दि.१0ऑक्टोंबर,२०२3 रोजीचा वाढदिवस शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेवतीने साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान वाढदिनी मा.यशराज देसाई (दादा) हे सकाळी 11 ते दुपारी 02.00 वा. पर्यंत दौलतनगर,ता.पाटण येथे उपस्थित राहणार असून शिवविजय हॉल दौलतनगर येथे शुभेच्छा स्विकारणार असल्याचे मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समिती यांनी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.

प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे चिरंजिव व पाटण तालुक्याचे युवा नेते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचा वाढदिवस  प्रतिवर्षी  मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेकडून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. यंदाच्याही वर्षी मा.यशराज देसाई (दादा) यांचे मंगळवार  दि. १0 ऑक्टोंबर,२०२3 रोजीचे वाढदिवसा निमित्त शिवसेना,युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडयांमधील विद्यार्थ्यांना शालेय वहया व खाऊ वाटप करण्यात येणार आहे. मा. यशराज देसाई यांचे हस्ते सकाळी 9.30 वा एहसास मतीमंद मुलांची शाळा येथे खाऊ वाटप  करण्यात येणार असून सकाळी 10 वाजता पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसैनिक यांचेवतीने मा.यशराज देसाई यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून नाडे या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी 11.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथील निवासस्थानी आगमन होणार असून  शिवविजय हॉल येथे वाढदिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचेवतीने वाढदिवसानिमित्त सत्कार स्विकारल्यानंतर उपस्थित पदाधिकारी,कार्यकर्ते व हितचिंतक यांचेकडून दुपारी 02 वाजेपर्यंत शुभेच्छा स्विकारणार आहेत. दरम्यान वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरीता येणा-या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ,हार न आणता पाटण विधानसभा मतदार संघातील गोर-गरीब कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा शालेय वस्तू भेट म्हणून आणण्याचे आवाहनही शेवटी मा. यशराज देसाई (दादा) वाढदिवस नियोजन समितीचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत करण्यात आले आहे.

 

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास अंतर्गत 06 रस्त्यांच्या कामांना 18कोटी 07 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून डोंगरी व दुर्गम भागातील गावांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी.

 




दौलतनगर दि.06:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे पोहोच रस्ते हे दळण वळणाच्यादृष्टीने नादुरुस्त झाले असल्याने या नादुरुस्त रस्त्यांच्या कामांना  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्य मंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 19.470 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 07 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

            प्रसिध्दीपत्रकां पुढे म्हंटले आहे की, पाटण हा डोंगरी व दुर्गम तालुका असून सततच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांची  अतिवृष्टीमध्ये मोठया प्रमाणात दुरावस्था होत असल्याने या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती. दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील गावांना पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे कामासाठी आवश्यक तो निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. तसेच या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 19.470 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 07 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये टी.आर.16 आंबवणे रस्ता सुधारणा 2.450 कि.मी.करीता 262.22 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 12.66लक्ष असा एकूण 274.88 लक्ष, टि.आर.02 ढेरुगडेवाडी रस्ता भाग हुंबरपेढा ते ढेरुगडेवाडी रस्ता 2.900 कि.मी. करीता 271.55 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 16.62 लक्ष असा एकूण 288.17 लक्ष, टी.आर.07 सुतारवाडी मोरेवाडी मालदन रस्ता सुधारणा 1.500 कि.मी. करीता 131.01 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 11.40 लक्ष असा एकूण 142.41 लक्ष, नाणेल पोहोच रस्ता सुधारणा 06 कि.मी.करीता 567.84 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 36.27 लक्ष असा एकूण 604.11 लक्ष, टी.आर.10 तामिणे पोहोच रस्ता सुधारणा 2.150 कि.मी.करीता 175.99 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 12.22 लक्ष असा एकूण 188.21 लक्ष तर टी.आर.07 जंगमवाडी रस्ता सुधारणा 4.470 कि.मी.करीता 291.23 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 18.41 लक्ष असा एकूण 309.64 लक्ष असा पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध 06 रस्त्यांचे कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 19.470 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 07 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे ही पावसाळयानंतर तातडीने सुरु होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन मंजूर  कामे तातडीने  सुरु करण्याच्या सुचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या असून निविदा निश्चितीनंतर तातडीने मंजूर झालेली रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत विविध गावांच्या रस्त्यांच्या कामांसाठी भरघोस निधी मंजूर झाल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांनी ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले असल्याची माहिती शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Wednesday, 4 October 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास अंतर्गत 06 रस्त्यांच्या कामांना 18कोटी 07 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून डोंगरी व दुर्गम भागातील गावांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी.

 


दौलतनगर दि.04:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे पोहोच रस्ते हे दळण वळणाच्यादृष्टीने नादुरुस्त झाले असल्याने या नादुरुस्त रस्त्यांच्या कामांना  राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्य मंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 19.470 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 07 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

            प्रसिध्दीपत्रकां पुढे म्हंटले आहे की, पाटण हा डोंगरी व दुर्गम तालुका असून सततच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांची  अतिवृष्टीमध्ये मोठया प्रमाणात दुरावस्था होत असल्याने या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती. दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील गावांना पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे कामासाठी आवश्यक तो निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. तसेच या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 19.470 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 07 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये टी.आर.16 आंबवणे रस्ता सुधारणा 2.450 कि.मी.करीता 262.22 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 12.66लक्ष असा एकूण 274.88 लक्ष, टि.आर.02 ढेरुगडेवाडी रस्ता भाग हुंबरपेढा ते ढेरुगडेवाडी रस्ता 2.900 कि.मी. करीता 271.55 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 16.62 लक्ष असा एकूण 288.17 लक्ष, टी.आर.07 सुतारवाडी मोरेवाडी मालदन रस्ता सुधारणा 1.500 कि.मी. करीता 131.01 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 11.40 लक्ष असा एकूण 142.41 लक्ष, नाणेल पोहोच रस्ता सुधारणा 06 कि.मी.करीता 567.84 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 36.27 लक्ष असा एकूण 604.11 लक्ष, टी.आर.10 तामिणे पोहोच रस्ता सुधारणा 2.150 कि.मी.करीता 175.99 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 12.22 लक्ष असा एकूण 188.21 लक्ष तर टी.आर.07 जंगमवाडी रस्ता सुधारणा 4.470 कि.मी.करीता 291.23 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 18.41 लक्ष असा एकूण 309.64 लक्ष असा पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध 06 रस्त्यांचे कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 19.470 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 07 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे ही पावसाळयानंतर तातडीने सुरु होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन मंजूर  कामे तातडीने  सुरु करण्याच्या सुचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या असून निविदा निश्चितीनंतर तातडीने मंजूर झालेली रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत विविध गावांच्या रस्त्यांच्या कामांसाठी भरघोस निधी मंजूर झाल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांनी ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले असल्याची माहिती शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.