दौलतनगर दि.06:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी
व दुर्गम भागात वसलेल्या गावांचे पोहोच रस्ते हे दळण वळणाच्यादृष्टीने नादुरुस्त झाले
असल्याने या नादुरुस्त रस्त्यांच्या कामांना
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्य मंत्री ग्रामसडक योजना टप्पा
2 संशोधन व विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री
व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास विभागाकडे शिफारस
केली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांच्या रस्त्यांच्या कामांना
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 19.470 कि.मी.
लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 07 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात
आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला असल्याची माहिती
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली
आहे.
प्रसिध्दीपत्रकां पुढे म्हंटले आहे की, पाटण हा डोंगरी व दुर्गम तालुका असून सततच्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील प्रमुख रस्त्यांची अतिवृष्टीमध्ये मोठया प्रमाणात दुरावस्था होत असल्याने या रस्त्यांचे पुनर्बांधणीसाठी निधीची आवश्यकता होती. दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील गावांना पोहोच रस्त्यांच्या पुनर्बांधणीचे कामासाठी आवश्यक तो निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ग्रामविकास विभागाकडे शिफारस केली होती. तसेच या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा पाठपुरावा सुरु होता.त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील 06 गावांच्या रस्त्यांच्या कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 19.470 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 07 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचा शासन निर्णय शासनाचे ग्राम विकास विभागाने पारित केला आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये टी.आर.16 आंबवणे रस्ता सुधारणा 2.450 कि.मी.करीता 262.22 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 12.66लक्ष असा एकूण 274.88 लक्ष, टि.आर.02 ढेरुगडेवाडी रस्ता भाग हुंबरपेढा ते ढेरुगडेवाडी रस्ता 2.900 कि.मी. करीता 271.55 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 16.62 लक्ष असा एकूण 288.17 लक्ष, टी.आर.07 सुतारवाडी मोरेवाडी मालदन रस्ता सुधारणा 1.500 कि.मी. करीता 131.01 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 11.40 लक्ष असा एकूण 142.41 लक्ष, नाणेल पोहोच रस्ता सुधारणा 06 कि.मी.करीता 567.84 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 36.27 लक्ष असा एकूण 604.11 लक्ष, टी.आर.10 तामिणे पोहोच रस्ता सुधारणा 2.150 कि.मी.करीता 175.99 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 12.22 लक्ष असा एकूण 188.21 लक्ष तर टी.आर.07 जंगमवाडी रस्ता सुधारणा 4.470 कि.मी.करीता 291.23 लक्ष तर देखभाल दुरुस्तीसाठी 18.41 लक्ष असा एकूण 309.64 लक्ष असा पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध 06 रस्त्यांचे कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत एकूण 19.470 कि.मी. लांबींच्या रस्त्यांच्या कामांना 18 कोटी 07 लाख 42 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 संशोधन व विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे ही पावसाळयानंतर तातडीने सुरु होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर या कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन मंजूर कामे तातडीने सुरु करण्याच्या सुचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकारी यांना केल्या असून निविदा निश्चितीनंतर तातडीने मंजूर झालेली रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत विविध गावांच्या रस्त्यांच्या कामांसाठी भरघोस निधी मंजूर झाल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांनी ना.शंभूराज देसाई यांचे आभार मानले असल्याची माहिती शेवटी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment