Friday 6 October 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून ग्रामीण मार्ग दुरुस्ती,लघु पाटबंधाऱ्यांची कामे व नविन साकव यांना 04 कोटी 87 लक्ष निधी मंजूर.

 


 

दौलतनगर दि.06:- पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांना दळण वळणाचेदृष्टीने महत्त्वाचे असलेल्या ग्रामीण मार्गांचे दुरुस्तीसाठी 01 कोटी 05 लाख तर विविध गावांमध्ये शेतीच्या पाण्याची सोय होण्यासाठी लघु पाटबंधाऱ्यांचे विविध कामांसाठी 02 कोटी 21 लक्ष 30 हजार तसेच काही गावांचे पोहोच रस्त्यावर साकव बांधणेच्या कामांना सर्वसाधारण साकव योजनेतून 1 कोटी 61 लाख 59 हजार रुपयांचा निधी असा एकूण 04 कोटी 87 लक्ष 89 हजार रुपयांचा निधी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशी नुसार सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

             प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांना जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये निधी मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारशीनुसार विविध विकास कामांचा सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये समावेश करण्यात येऊन या विकास कामांना निधी मंजूर झाला आहे. सन 2023-24 च्या जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडील चार ग्रामीण मार्गांसाठी 01 कोटी 05 लाख रुपये मंजूर झाला आहे. त्यामध्ये डेरवण कोळेकरवाडी रस्ता ग्रामा 130 सुधारणा 20 लक्ष, नाव ते गोवारे पोहोच रस्ता ग्रामा 193 सुधारणा 20 लक्ष, सोनवडे ते खांडेकरवाडी रस्ता ग्रामा 239 सुधारणा 30 लक्ष व डावरी पोहोच रस्ता ग्रामा 244 सुधारणा 35 लक्ष या ग्रामीण रस्त्यांचा समावेश आहे.तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लघु पाटबंधाऱ्यांचे 13 कामांसाठी 02 कोटी 21 लक्ष 30 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये जुंगठी दिवशी खुर्द  साठवण हौद व शेती आडवे पाट 14.43 लक्ष, जुगाईवाडी घोट पाट व पाईप लाईन 10.08 लक्ष, घाणबी  साठवण हौद 25.08 लक्ष, वेखंडवाडी येथे शेतीसाठी पाण्याचे आडवे पाट 19.95 लक्ष, सडावाघापूर ग्रामतलाव दुरुस्ती 10.28 लक्ष, कळंबे पाझर तलाव दुरुस्ती 30.33 लक्ष, खराडवाडी बामणकी शिवारातील बंधारा दुरुस्ती व आर.सी.सी.पाट 24.17 लक्ष, केळेवाडी कडवे पाट 21.09 लक्ष, पाडळोशी येथे मसुगडेवाडी धैवणीची डाग येथे वळण बंधारा व पाण्याचे आडवे पाट 14.16 लक्ष, मेंढोशी येथील वळण बंधारा दुरुस्ती 8.87 लक्ष, पाबळवाडी येथे शेतीसाठी आडवे पाट 14.79 लक्ष, आवर्डे मागासवर्गीय वस्ती वळण बंधारा व वितरण व्यवस्था 10 लक्ष व वनकुसवडे येथे शेतीसाठी आर.सी.सी.साठवण हौद व आडवे पाट 18.07 लक्ष या कामांचा समावेश आहे तर दळणवळणाचे दृष्टीने मुख्य रस्त्यावर साकव बांधणेच्या कामांना सर्वसाधारण साकव योजनेअंतर्गत मंजूरी मिळाली असून या साकवच्या कामांमध्ये वेखंडवाडी ते चोरजवाडी रस्त्यावर साकव 50 लक्ष, सोनाईचीवाडी येथे सोनाईचीवाडी ते गारवडे रस्स्त्यावर साकव पूल 60 लक्ष, वाटोळे येथे पाबळ ओढयावर साकव पूल 51.59 लक्ष या तीन साकवच्या कामांचा समावेश आहे.दरम्यान पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून ग्रामीण मार्ग दुरुस्ती, लघु पाटबंधाऱ्यांची कामे व सर्वसाधारण साकवच्या कामांना भरघोस निधी मंजूर झाला असल्याने डोंगरी व दुर्गम भागातील रस्ते व साकव अभावी होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होणार असून शेतीच्या पाण्याचेदृष्टीने लघु पाट बंधाऱ्यांच्या कामांना निधी मंजूर झाला असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्या अभावी होणारी गैरसोय दूर होणार असून मंजूर झालेल्या विकास कामांच्या निवीदा प्रक्रिया तातडीने करुन पावसाळा संपताच या विकास कामांना तातडीने सुरु करण्यासंदर्भात पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांची संबंधित अधिकारी यांना सूचना केल्या असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत नमूद केले आहे.


No comments:

Post a Comment