Tuesday, 23 April 2024

दौलतनगर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात साजरा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना 41 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला भक्तीमय वातावरण

 


  दौलतनगर दि.२३:-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यंदाच्या वर्षी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा परिसरात महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुर्णाकृती पुतळयावर व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते.

              दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 41 व्या पुण्यतिथीनिमित्त गत चौदा वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे पंधरावे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये 758 वाचक सहभागी झाले होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने,कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई,श्रीमती विजयादेवी देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, सौ.डॉ.वैष्णवीराजे देसाई,कु. ईश्वरी देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज, ह.भ.प.अनिल पाटील महाराज पापर्डेकर, ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज ह.भ.प.दगडू माळी,नाना देसाई पापर्डेकर,भरत पाटील,सुरेश शिंदे,अमित लोहार,सुभाष देसाई यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.

              तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते यांचे पुण्यतिथी दिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर,डोक्यावर कलश,तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी ढोल वाद्यांसमवेत श्री विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकापासून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पुतळयासमोर प्रथमत: ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच २१ तोफांची सलामी देण्यात आली. तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते यांचा 41 वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला प्रती पंढरपुर अवतरले होते. गत चौदा वर्षापासून ह.भ.प.पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत. यंदाचा सोहळयातही त्यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा बजावली तर हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.जयवंतराव शेलार महाराज,ह.भ.प.अनिल पाटील महाराज,ह.भ.प.जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी कर्मचारी अधिकारी व कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

चौकट- रिंगण सोहळा ठरला भाविकांसाठी आकर्षण.

            लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदाच्या वर्षी लोकनेते साहेब यांचे पुण्यतिथी  सोहळयानिमित्त रिंगण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या रिंगण सोहळयामध्ये ना.शंभूराज देसाई यांचे सह सौ.स्मितादेवी देसाई, मा.यशराज देसाई, मा.रविराज देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई,सौ.डॉ.वैष्णवीराजे देसाई, कु.ईश्वरी देसाई,चि.जयराज देसाई, चि.आदित्यराज देसाई यांचे उपस्थितीमुळे हा रिंगण सोहळा उपस्थित सर्व भक्त,भाविकांसाठी आकर्षण ठरले.तसेच हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित भाविक भक्त भारावून गेले.

Saturday, 20 April 2024

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 41 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर,ता.पाटण येथे भक्तीमय वातावरणात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास प्रारंभ.

 

 

दौलतनगर दि.20:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आणि महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर, ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये  पंधराव्या वर्षी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा प्रारंभ शनिवार दि. २० एप्रिल,२०24 रोजी भाविक भक्तांच्या उदंड प्रतिसादाने भक्तीमय वातावरणात ह.भ.प.जयवंतराव शेलार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रंजना जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन केले.तसेच मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.यशराज देसाई(दादा),चि.जयराज देसाई(दादा) यांचे शुभहस्ते श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करण्यात आले.

              सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे पंधरावे वर्ष असून प्रति वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 41 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०24 पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.

              दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये 690 वाचक सहभागी झाले आहेत.पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार, प्रवनचनकारांना एक चांगले तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान यंदाचे  पारायण सोहळयास वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. प्रति वर्षाप्रमाणे व्यासपीठ चालक म्हणून ह.भ.प.पुंडलिक महाराज कापसे,आळंदीकर हे उपस्थित असून रविवार दि. २१ एप्रिल, २०२4 रोजी ह.भ.प. उदय महाराज आटकेकर यांचे प्रवचन तर ह.भ.प. पांडूरंग महाराज साळूंखे,पलूस यांचे किर्तन आणि सोमवार दि.२२ एप्रिल, २०२4 रोजी ह.भ.प आनंद महाराज कुंभार बुधगाव सांगली यांचे प्रवचन तर ह.भ.प. श्रीराम महाराज अभंग इंदापूर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त मंगळवार दि. २३ एप्रिल २०२4 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा. श्रीमती विजयादेवी देसाई(मॉसाहेब),मा.नामदार श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी करुन लोकनेते बाळासाहेब देसाई यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केल्यानंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. रामदास महाराज आरेवाडीकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता होणार आहे.

 

Friday, 5 April 2024

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथीनिमित्त २० एप्रिलपासून दौलतनगरला श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा.

 



दौलतनगर दि.05:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने कारखाना कार्यस्थळा वरील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये पंधराव्या वर्षी भव्य अशा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे आयोजन शनिवार दि.२० एप्रिल ते मंगळवार दि. २३ एप्रिल,२०२4 पर्यंत दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुह तसेच पाटण तालुका वारकरी संघाच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो. यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल,२०२4 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 41 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०२4 पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये करण्यात आले आहे. शनिवार दि.२० एप्रिल रोजी पारायण सोहळयाचा शुभारंभ व श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन पाटण तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. जयवंतराव शेलार यांच्या शुभहस्ते व राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा मा. ना. श्री.शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रजल्वन करुन करण्यात येणार आहे.या पारायण सोहळयात शनिवार दि. २० एप्रिल २०२4 रोजी ह.भ.प.  कैवल्य महाराज सातारकर यांचे प्रवचन, ह.भ.प. बापूसाहेब महाराज उखळीकर पंढरपूर यांचे किर्तन,रविवार दि. २१ एप्रिल, २०२4 रोजी ह.भ.प. उदय महाराज आटकेकर यांचे प्रवचन तर ह.भ.प. पांडूरंग महाराज साळूंखे,पलूस यांचे किर्तन आणि सोमवार दि.२२ एप्रिल, २०२4 रोजी ह.भ.प आनंद महाराज कुंभार बुधगाव सांगली यांचे प्रवचन तर ह.भ.प. श्रीराम महाराज अभंग इंदापूर यांचे किर्तन होणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 41 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त मंगळवार दि. २३ एप्रिल २०२4 रोजी सकाळी 8.३० ते 9.३० वा. श्रीमती विजयादेवी देसाई(मॉसाहेब),मा.नामदार श्री. शंभूराज देसाई व मा.सौ.स्मितादेवी देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई (दादा) यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा व पुतळयावर पुष्पवृष्टी आणि विनम्र अभिवादन व नंतर रिंगण सोहळा होणार असून त्यानंतर सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. रामदास महाराज आरेवाडीकर यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर पारायणाची सांगता करण्यात येणार आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख, राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा मा. ना.श्री.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाचे हे पंधरावे वर्ष असून या पारायण सोहळयाच्या निमित्ताने पाटण तालुक्यातील किर्तनकार,प्रवचनकारांना तालुकास्तरीय व्यासपीठ निर्माण झाले आहे.या पारायण सोहळयामध्ये सहभागी होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी वाचकांनी आपल्या नावाची नोंद ही कारखान्याचे मुख्य कार्यालय,शेती ऑफीस विभागीय कार्यालय,गट ऑफीस तसेच शिवदौलत सह.बँक शाखा मल्हारेपठ, ढेबेवाडी, तारळे, दौलतनगर, पाटण व मलकापूर या शाखांचे ठिकाणी करावी.तसेच  लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 41 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे.

 


Friday, 22 March 2024

पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे कामाला 29 कोटी 83 लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता.

 


दौलतनगर दि.22:- पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामासाठी 14 कोटी 87 लक्ष रुपयांचा निधी या पूर्वी मंजूर होऊन या इमारतीचे कामालाही सुरुवात झाली आहे.तर या प्रशासकीय इमारतीचे वाढीवचे बांधकामासाठी जादा निधीची आवश्यकता असल्याने वाढीवचा निधी मंजूर होणेबाबतचा  सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सुचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी  मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना केल्या होत्या. त्यानुसार पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचे कामाला 29 कोटी 83 लक्ष 27 हजार इतक्या रकमेची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

                पाटण येथे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली आणण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सुमारे 14 कोटी 87 लक्ष रुपयांची भरघोस अशी तरतुद सन 2020-21 च्या राज्य शासनाचे अर्थसंकल्पामध्ये करुन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पाटण तालुकावाशियांची बहुप्रतिक्षित असलेली मागणी मुर्त स्वरुपात आणली होती. सदर कामांस प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी पारित केला होता. त्यानुसार  पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.दरम्यान प्रत्यक्ष उपलब्ध जागेमुळे संकलप चित्रात बदल होऊन बांधकाम क्षेत्रफळामध्ये 621 चौ.मी. ची वाढ झाली. वस्तू व सेवा करामध्ये 12 टक्क्यावरुन 18 टक्के वाढ तसेच बांधकामाच्या किंमतीतमध्ये वाढ झाल्याने पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचे कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्तावास दि.12.03.2024 रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत प्राप्त मान्यतेस अनुसरुन 29 कोटी 83 लक्ष 27 हजार इतक्या रकमेची  सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामंजूर रक्कमेत तळ मजल्यासह पाच मजले बांधकाम, इलेक्ट्रीकचे काम, अग्निरोधक यंत्रणा, फर्निचर, रेन रुप वॅाटर हारवेस्टींग, सोलार रुप टॅाप,बायो गिजस्टर, या बाबींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

                पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुख्‍य बाजारपेठेच्या ठिकाणी  शासकीय कार्यालय हे वेग-वेगळया ठिकाणी असल्याने तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातून आपल्या दैनंदिन कामासाठी आलेल्या नागरिकांना या वेगवेगळया ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते.त्याचा नाहक त्रास हा येथील सर्वसामान्य जनतेला होत होता. वेळेत कामं होत नसल्याने नागरीकांमध्ये नाराजी निर्माण होत होती. तालुक्याच्या ठिकाणची असणारी सर्व शासकीय कार्यालये ही एका छताखाली यावी या संकल्पनेतून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे  सततच्या प्रयत्नामुळे पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचे कामला 29 कोटी 83 लक्ष 27 हजार इतक्या रकमेची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून तालुकास्तरीय सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली  येणार आहेत.यामध्ये उपविभागीय कार्यालय,तहसिल कार्यालय,लोक अदालत कार्यालय,सेतू कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय,दुय्यम निबंधक कार्यालय,वनक्षेत्रपाल कार्यालय,तालुका कृषी कार्यालय व ट्रेझरी ऑफीस हि सर्व कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्याने एकाच ठिकाणी सर्व प्रकारची लोकोपयोगी कामे कमी कालावधीमध्ये होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे तालुक्यातील समाधानाचे वातावरण असून लवकरच या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पुर्ण झाल्यानंतर या नवीन वास्तुमुळे पाटणच्या वैभवात भर पडणार आहे.       

Thursday, 14 March 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र पाटणमध्ये उभारणार मंत्रिमंडळ बैठकीत प्रशिक्षण केंद्रास मान्यता; ३४८ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प आराखडा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून माहिती


गुरुवार, १४ मार्च २०२४

मुंबई : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मौजे वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र असून यामध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रशिक्षण केंद्रासाठी ३४८ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांची क्षमता वृद्धी होईल, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. 

गुरुवारी, १४ मार्च रोजी मुंबईतील पावनगड निवासस्थानी मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत प्रशिक्षण केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, प्रशिक्षण केंद्रात सायबर सेल कार्यान्वित होणार आहे. अवैध मद्य विक्री व निर्मिती, अन्य राज्यातून आवक होणारे अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया व गुन्हे नोंद करण्यात येतात. सदर गुन्हे नोंदवणे, त्याचा तपास करून गुन्हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने हा सायबर सेल उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. 

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे, तसेच कायदेविषयक व शारीरिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र नसल्याने विभागाला पोलीस प्रशिक्षण केंद्रावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी मंत्री शंभूराज देसाई हे पाठपुरावा करत होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या प्रशिक्षण केंद्राबाबत सकारात्मकता दर्शवत सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रशिक्षण केंद्रास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विकासवादी भूमिकेमुळे सातारा जिल्ह्यात या प्रशिक्षण केंद्राच्या रूपाने महत्त्वपूर्ण शासकीय आस्थापना उभारली जात आहे, अशी भावना मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. 

तसेच पाटण तालुक्यातील मौजे वाटोळे येथे होणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राकरिता ३४८ कोटी रुपयांचा खर्च येणार असून ५० एकर जागा लागणार आहे. तसेच ५१ नवीन पदे प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली आहेत. सुरुवातीला दोन वर्षे पोलीस विभागातील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांची प्रतिनियुक्तीवर सेवा घेऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. 

ते पुढे म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनास महसूल देणाऱ्या प्रमुख विभागांपैकी एक आहे. या विभागाद्वारे २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे २१ हजार ५५० कोटी रुपये इतका महसूल जमा करण्यात आलेला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता २५ हजार २०० कोटी रुपये इतके महसुली उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे. या उद्दिष्टाची प्रतिपूर्ती करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले. 

............ 
(समाप्त) 
............

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील कामांसाठी 11 कोटी 81 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. मागासवर्गीय वस्तींमधील अभ्यासिका,साकव,स्मशानभूमी,विद्युत विकास,सभामंडप व लघु पाटबंधाऱ्यांची कामे लागणार मार्गी.

 


दौलतनगर दि.13:- पाटण विधानसभा मतदारसंघातील पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत नाविण्यपूर्ण योजना मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका,साकव,जनसुविधा स्मशानभूमी कामे, विद्युत विकास योजनेतील वाढीव वस्त्यांना विद्युतीकरणाची कामे,स्थानिक व डोंगरी विकास निधी तसेच लघु पाट बंधारे विभागांतर्गत वळण बंधारा व पाण्याचे आडवे पाटांचे दुरुस्तीचे कामे अशा विविध विकास कामांसाठी 11 कोटी 81 लक्ष 18 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमधील अभ्यासिकांचे कामांना सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनतील नाविण्यपूर्ण योजना मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका बांधणे या योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी मारुलहवेली,सातर,उधवणे,आडूळ गावठाण व बनपूरी या गावांतील अभ्यासिकांची कामे प्रस्तावित केली होती.त्यानुसार या मागासवर्गीय वस्त्यांमधील अभ्यासिकांचे प्रस्ताव हे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्यानंतर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मारुलहवेली,सातर,उधवणे,आडूळ गावठाण व बनपूरी या 05 गावांतील अभ्यासिकांचे कामांसाठी प्रत्येकी 18 लाख या प्रमाणे नाविण्यपूर्ण योजना मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका बांधणे या योजने अंतर्गत 90 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.विशेष घटक साकव योजने अंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांमधील पोहोच रस्त्यांवरील ओढयावर साकव बांधणेच्या कामांमध्ये मोरेवाडी कुठरे येथे लोकरवस्ती रस्त्यावर साकव 49.99 लक्ष, धावडे मातंगवस्ती रस्त्यावर साकव 47.19 लक्ष, मणदुरे बौध्दवस्ती रस्त्यावर साकव 53.39 लक्ष, दिवशी बुद्रुक येथे मागासवर्गीय वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव 50 लक्ष  असा एकूण 2 कोटी निधी मंजूर झाला आहे.जनसुविधा योजनेतून स्मशानभूमींचे कामांमध्ये दिवशी खुर्द जंगम समाजासाठी दफनभूमी 4 लक्ष, धनावडेवाडी निगडे,ता.पाटण येथे स्मशानभूमी 4 लक्ष, निगडे येथे स्मशानभूमी 4 लक्ष,निवी येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, पांढरेपाणी येथे स्मशानभूमी व निवारा शेड 4 लक्ष, पाळशी येथे स्मशानभूमी 4 लक्ष, बांबवडे येथे  स्मशानभूमी शेड व वेटींग शेड 4 लक्ष, बोंद्री येथे स्मशानभूमीशेड व वेटींग शेड 4 लक्ष, म्हारवंड येथे स्मशानभूमी 4 लक्ष, सातर गावठण  येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष,आंबेघर तर्फ मरळी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, आटोली पुनर्वसन येथे स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण 4 लक्ष, गुरेघर स्मशानभूमी व पोहोच रस्ता 4 लक्ष, गोकूळ तर्फ पाटण स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, चाळकेवाडी  बेलाचीआळी ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 4 लक्ष, भिकाडी  स्मशानभूमी निवारा शेड व रस्ता सुधारणा 4 लक्ष, शितपवाडी  स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, पाडळोशी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, सळवे स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, साबळेवाडी  येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत 4 लक्ष, बाहे येथे स्मशानभूमी 4 लक्ष, मारुल तर्फ पाटण बौध्दवस्ती येथे स्मशानभूमी 4 लक्ष, केरळ स्मशानभूमी शेड 4 लक्ष, काठी  स्मशानभूमी निवारा शेड व रस्ता सुधारणा 4 लक्ष, काळगाव  यथे स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, राजवाडा घाणव येथे स्मशानभूमी 4 लक्ष, आंब्रुळे येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, गणेवाडी ठोमसे  येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, घोटील येथे  स्मशानभूमी शेड 4 लक्ष अशी एकूण 1 कोटी 20 लक्ष निधी मंजूर झाला आहे.तर जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत विद्युत विकास योजने अंतर्गत वाढीव वस्त्यांमध्ये पथदिप उर्जीकरण करणे यामध्ये बाचोली 0.88 लक्ष,पाचगणी बाहे 1.69 लक्ष,रामेल शेळकेवस्ती जि.प.शाळा 1.71 लक्ष,पाळशी दत्त आवाड थ्री फेज 1.72 लक्ष,मल्हारपेठ 1.91 लक्ष्ज्ञ,बाहे पाचगणी 2.51 लक्ष,नाणेल 2.64 लक्ष,काळगाव 2.95 लक्ष,जंगलवाडी चाफळ 3.47 लक्ष,सुळेवाडी 4.26 लक्ष,मराठवाडी दिवशी खुर्द 4.33 लक्ष,गोवारे 437 लक्ष,काढोली 4.94 लक्ष,गावडेवाडी 8 लक्ष,टोळेवाडी 2.22 लक्ष या कामांचा समावेश असून यासाठी  49.67 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सन 2023-24 स्थानिक विकास निधीतून गलमेवाडी मधलीआळी ओढयावर मोरी 12 लक्ष, धामणी बौध्दवस्ती लकडेआळी रस्ता 15 लक्ष,कदमवाडी नाटोशी सभामंडप 13 लक्ष,कोळणे गोवारे सभामंडप 8 लक्ष, माणगाव सभामंडप 13 लक्ष्‍ा,मुठ्ठलवाडी चौगुलेवाडी पाटील आवाड आर.सी.सी.गटर 7 लक्ष, किसरुळे पथपद सुधारणा व पेव्हर ब्लॉक 10 लक्ष,सुर्याचीवाडी नाणेगाव बु पेव्हर ब्लॉक 15 लक्ष,पश्चिम सुपने वरचा गायकवाड मळा ते हंबीरराव गायकवाड यांचे घर रस्ता 20 लक्ष, तामिणे रासाई मंदिर सभामंडप 13 लक्ष, केळोली वरची सभामंडप 13 लक्ष, गोरेवाडी मुरुड सभामंडप 13 लक्ष,म्होप्रे बेघरवस्ती सभामंडप 13 लक्ष,माईंगडेवाडी जिंती सभामंडप 13 लक्ष, दुधडेवाडी मरळी सभामंडप 13 लक्ष, मस्करवाडी पाटीलवाडी सभामंडप 13 लक्ष, चव्हाणवाडी धामणी सभामंडप 13 लक्ष, तारळे संत गोरोबा काका कुंभार समाज कुंभारवाडा सभामंडप 13 लक्ष, ढेरुगडेवाडी येराड अंबादेवी मंदिर सभामंडप 13 लक्ष, मरळी गोसावी समाज जिवंत समाधी मठासमोर सभामंडप 13 लक्ष, येरफळे जोतिबा मंदिर सभामंडप 13 लक्ष, साखरी सभामंडप 13 लक्ष, उत्तर तांबवे सभामंडप 13 लक्ष, भोळेवाडी भोळाईदेवी मंदिर सभामंडप 13 लक्ष, सुपने सभामंडप 20 लक्ष, मंद्रुळकोळे पाटीलआवाड दत्त मंदिर सभामंडप 13 लक्ष, पाडळी संजयनगर दलितवस्ती सभामंडप 13 लक्ष, कळंत्रेवाडी कुंभारगाव सभामंडप 13 लक्ष, कुंभारगाव बामणवाडी सभामंडप 13 लक्ष व आबईचीवाडी धनगरवस्ती सभामंडप 13 लक्ष अशा एकूण 04 कोटी 06 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सन 2023-24 डोंगरी विकास निधीतून आरेवाडी स्मशानभूमी रस्ता 6.21 लक्ष, उत्तर तांबवे शाळा दुरुस्ती 2.07 लक्ष, केंजळवाडी निवडे अंगणवाडी इमारत 11.25 लक्ष, बांबवडे अंगणवाडी  इमारत 11.25 लक्ष, शिंदेवाडी नाईकबा वस्ती अंगणवाडी इमारत 11.25 लक्ष, ढेरुगडेवाडी येराड अंगणवाडी इमारत 11.25 लक्ष,आंब्रुळे शाळा दुरुस्ती 3.57 लक्ष, सळवे नळ पाणी पुरवठा योजना विहिर व साठवण टाकीसह दुरुस्ती 20 लक्ष,मणेरी चिंचेचे आवाड साठवण टाकी 10 लक्ष, धावडे सभामंडप 13 लक्ष, सदुवर्पेवाडी सळवे नळ पाणी पुरवठा योजना 15 लक्ष अशा एकूण 114.85 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.लघु पाटबंधारे विभागांतर्गत वळण बंधारा व पाण्याचे पाट दुरुस्तीसाठी सन 2023-24 चे जिल्हा वार्षिक आराखडयातून  मरळी गव्हाणवाडी वळण बंधारा 15 लक्ष, कुठरे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा दुरुस्ती 45 लक्ष, कोकीसरे वळण बंधारा दुरुस्ती 10 लक्ष, सडाबोडकी पाझर तलाव दुरुस्ती 7 लक्ष, वाटोळे वळण बंधारा 17 लक्ष, तोंडोशी वळण बंधारा पाट दुरुस्ती 10 लक्ष, मणदुरे खडकात वळण बंधारा दुरुस्ती 15 लक्ष,कडवे बुद्रुक ग्रामतलाव दुरुस्ती 7 लक्ष, तारळे किडके धरण वळण बंधारा व पाट दुरुस्ती 10 लक्ष, बामणेवाडी भांबे पाट दुरुस्ती 10 लक्ष, काठी पाट दुरुस्ती 10 लक्ष, मराठवाडी दिवशी खुर्द साठवण हौद व पाट 25 लक्ष व डेरवण वळण बंधारा दुरुस्ती 10 लक्ष, बनपेठवाडी शेती पाट दुरुस्ती 10 लक्ष, येराड शांतीनगर पाट दुरुस्ती 5 लक्ष या एकूण 02 कोटी 06 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून पाटण विधानसभा मतदार संघातील डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये ही विकास कामे मार्गी लागणार आहेत.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 05 कोटींचा निधी मंजूर. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध धार्मिक व पर्यटन स्थळांचा होणार विकास.



दौलतनगर 14 : पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील श्री निनाईदेवी मंदिर मरळी,जानाई मंदिर निवकणे, नवसरी देवी मंदिर नवसरी, जानाई मंदिर मालोशी, जानाई मंदिर जाळगेवाडी,वाघनाथ मंदिर पाडळोशी, पद्मावती मंदिर वनकुसवडे, निनाईदेवी  मंदिर मंद्रुळहवेली, जनार्धन स्वामी महाराज मठ वसंतगड, विठ्ठल रुक्मिणी  मंदिर तांबवे व श्री दत्त मंदिर मल्हारपेठ या धार्मिक व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांचा विकास पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील शिफारस केलेल्या  पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                   प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटन व तिर्थक्षेत्र  स्थळांच्या ठिकाणी आवश्यक अशा मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत संबंधित गावातील ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे विनंती केलेली होती. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रसिध्द असलेल्या या धार्मिक व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविल्यास या पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची  गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील श्री निनाईदेवी मंदिर मरळी,जानाई मंदिर निवकणे, नवसरी देवी मंदिर नवसरी, जानाई मंदिर मालोशी, जानाई मंदिर जाळगेवाडी,वाघनाथ मंदिर पाडळोशी, पद्मावती मंदिर वनकुसवडे, निनाईदेवी  मंदिर मंद्रुळहवेली, जनार्धन स्वामी महाराज मठ वसंतगड, विठ्ठल रुक्मिणी  मंदिर तांबवे व श्री दत्त मंदिर मल्हारपेठ या पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीचा पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील या पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला आहे.मंजूर झालेल्या पर्यटन विकासाच्या कामांमध्ये मरळी येथील निनाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 250 लक्ष, निवकणे जानाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, नवसरी नवसरीदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, मालोशी श्री जानाईदेवी मंदिर परिसर सुशोभिकरण 25 लक्ष, जाळगेवाडी जानाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष,पाडळोशी श्री वाघनाथ मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, वनकुसवडे बागलादेवी पद्मावतीदेवी मंदिर परिसर सुधाणा 25 लक्ष,मंद्रुळहवेली निनाईदेवी मंदिर परिसर संरक्षक भिंत 25 लक्ष, वसंतगड जनार्धन स्वामी महाराज मठ रस्ता सुधारणा 25 लक्ष, तांबवे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणा 25 लक्ष व मल्हारपेठ श्री दत्त मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष अशा एकूण 05कोटी रुपयांचा कामांचा समावेश असून पाटण विधानसभा मतदारसंघातील धार्मिक व पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तर प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांना तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात लवकरच जिल्हास्तरीय अधिकारी यांची बैठक आयोजित करुन या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करुन ही कामे लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात संबंधित शासकीय अधिकारी यांना सूचना करण्यात येणार असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.