Thursday 14 March 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 05 कोटींचा निधी मंजूर. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध धार्मिक व पर्यटन स्थळांचा होणार विकास.



दौलतनगर 14 : पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील श्री निनाईदेवी मंदिर मरळी,जानाई मंदिर निवकणे, नवसरी देवी मंदिर नवसरी, जानाई मंदिर मालोशी, जानाई मंदिर जाळगेवाडी,वाघनाथ मंदिर पाडळोशी, पद्मावती मंदिर वनकुसवडे, निनाईदेवी  मंदिर मंद्रुळहवेली, जनार्धन स्वामी महाराज मठ वसंतगड, विठ्ठल रुक्मिणी  मंदिर तांबवे व श्री दत्त मंदिर मल्हारपेठ या धार्मिक व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांचा विकास पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील शिफारस केलेल्या  पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                   प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटन व तिर्थक्षेत्र  स्थळांच्या ठिकाणी आवश्यक अशा मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत संबंधित गावातील ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे विनंती केलेली होती. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रसिध्द असलेल्या या धार्मिक व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविल्यास या पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची  गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील श्री निनाईदेवी मंदिर मरळी,जानाई मंदिर निवकणे, नवसरी देवी मंदिर नवसरी, जानाई मंदिर मालोशी, जानाई मंदिर जाळगेवाडी,वाघनाथ मंदिर पाडळोशी, पद्मावती मंदिर वनकुसवडे, निनाईदेवी  मंदिर मंद्रुळहवेली, जनार्धन स्वामी महाराज मठ वसंतगड, विठ्ठल रुक्मिणी  मंदिर तांबवे व श्री दत्त मंदिर मल्हारपेठ या पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीचा पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील या पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला आहे.मंजूर झालेल्या पर्यटन विकासाच्या कामांमध्ये मरळी येथील निनाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 250 लक्ष, निवकणे जानाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, नवसरी नवसरीदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, मालोशी श्री जानाईदेवी मंदिर परिसर सुशोभिकरण 25 लक्ष, जाळगेवाडी जानाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष,पाडळोशी श्री वाघनाथ मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, वनकुसवडे बागलादेवी पद्मावतीदेवी मंदिर परिसर सुधाणा 25 लक्ष,मंद्रुळहवेली निनाईदेवी मंदिर परिसर संरक्षक भिंत 25 लक्ष, वसंतगड जनार्धन स्वामी महाराज मठ रस्ता सुधारणा 25 लक्ष, तांबवे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणा 25 लक्ष व मल्हारपेठ श्री दत्त मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष अशा एकूण 05कोटी रुपयांचा कामांचा समावेश असून पाटण विधानसभा मतदारसंघातील धार्मिक व पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तर प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांना तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात लवकरच जिल्हास्तरीय अधिकारी यांची बैठक आयोजित करुन या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करुन ही कामे लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात संबंधित शासकीय अधिकारी यांना सूचना करण्यात येणार असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

  

No comments:

Post a Comment