सातारा येथील लोकनेते
बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ
यांच्या वतीने पाटण तालुक्यातील सातारा रहिवाशी असणारे इयत्ता १० वी व १२ वी मधील
गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सेवानिवृत्त व इतर पुरस्कार प्राप्त पालकांचा सत्कार
सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि. १२ ऑगस्ट २०१८ रोजी भगवतेसाई मंगल
कार्यालय, मोळाचा ओढा,सातारा या ठिकाणी आयोजित केला असल्याची माहिती लोकनेते
बाळासाहेब देसाई नागरी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ
यांच्यावतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकामध्ये
म्हंटले आहे की, लोकेनते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका
सातारा रहिवाशी मित्र मंडळ यांच्यावतीने पाटण तालुक्यातील सातारा रहिवाशी असणा-या
इयत्ता १० वी १२ वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेले
आहेत अशा सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींचा तसेच ज्या पालकांना वेगवेगळे पुरस्कार
मिळोलले आहेत त्यांचा सत्कार सोहळा प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतो. इयत्ता १० वी
व इयत्ता १२ वीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विदयार्थी
विद्यार्थीनींनी आपली गुणपत्रके, स्वत:चा पत्ता व फोन नंबरसह आपली माहिती लोकनेते
बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था, पोवईनाका सातारा व शिवदौलत सहकारी
बँक,सातारा शाखा येथील कार्यालयात दि. ०५ ऑगस्ट, २०१८ पुर्वी जमा
करावित. तसेच ज्या पालकांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनीही आपली
माहिती वरील कार्यालयात देवून सहकार्य करावे असे निवेदन मित्र मंडळाच्यावेतीने
करण्यात ओलेल आहे. यासंदर्भात पाटण तालुकयातील सातारा रहिवाशी असणा-या पाल्यांनी व
पालकांनी लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्थेच्या ०२१६२- २३६५८० व
शिवदौलत सहकारी बँक सातारा शाखेच्या ०२१६२-२३२३१२ या फोन नंबरवर संपर्क साधावा असे
आवाहनही लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व सातारा रहिवाशी
मित्रमंडळाच्यावेतीने पत्रकांत करण्यात आले आहे. दरम्यान रविवार दि. १२ ऑगस्ट २०१८
रोजी प्रतिवर्षाप्रमाणे हा सोहळा भगवतेसाई मंगल कार्यालय, मोळाचा ओढा, सातारा या
ठिकाणी संपन्न होणार असून या सोहळयास महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु
पाटणचे आमदार शंभूराज देसाई व श्रीमती विजयादेवी देसाई मॉसाहेब यांच्या हस्ते हा
सोहळा संपन्न होणार असून पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळाचे अध्यक्ष रविराज
देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
No comments:
Post a Comment