Saturday 26 May 2018

जनतेची विकासात्मक कामे करायला कुठेही कमी पडलो नाही आणि पडणारही नाही.आमदार शंभूराज देसाईंची ग्वाही.





दौलतनगर दि. २६ (आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालय):
सन २०१४ च्या निवडणूकीत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला भरघोस मताधिक्क्याने पाटण मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर गत साडेतीन वर्षात मतदारसंघातील जनतेची विकासात्मक असो वा वैयक्तीक कामे करण्याकरीता मी कुठेही कमी पडलो नाही याचे साक्ष या विभागातील जनतेने दिली असून भविष्यात देखील वैयक्तीक असो वा जनतेच्या विकासात्मक कामे करायला मी कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही पाटण मतदारसंघाचा आमदार म्हणून आपणांस देत असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पाटण विधानसभा मतदारसंघातील तांबवे ता.कराड येथे आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या साजुर ते तांबवे या रस्त्याचे भूमिपुजन त्यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामांसाठी आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.यावेळी कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य ॲड.उदयसिंह पाटील,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण,पंचायत समिती सदस्या सविताताई संकपाळ,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्हा.चेअरमन प्रभाकर शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाे पाटील,रयत सहकारी साखर कारखान्याचे शिवाजीराव गायकवाड व कोयना सहकारी बँकेचे संचालक अविनाश पाटील,लक्ष्मण देसाई,पाटण पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ॲड.उदयसिंह पाटील म्हणाले, सन २००९ पुर्वी या विभागाचे माजी आमदार आणि माजी मंत्री विलासराव काका उंडाळकर यांनी ज्याप्रमाणे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून गावागावात,वाडीवस्तीवर विकासाचे काम केले.त्यांच्या कामाप्रमाणेच आताचे या विभागाचे आमदार शंभूराज देसाई हे हा विभाग आपल्याकडे नव्याने जोडला आहे म्हणून कोणताही दुजाभाव न करता काकांच्या पावलावर पाऊल ठेवून या विभागातील जनतेची विकासात्मक कामे करीत आहेत. माजी मंत्री विलासरावकाका उंडाळकर यांचेसारखा हक्काचा आमदार या विभागाला आणि विभागातील जनतेला मिळाला आहे. विलासराव काका उंडाळकर यांनी २००९ पुर्वी केलेल्या या रस्त्यावर आमदार शंभूराज देसाई यांनी निधी देण्याचे काम केले आहे आमदार म्हणून त्यांनी या विभागातील जनतेची विकासाची तसेच वैयक्तीक अनेक कामे मार्गी लावली आहेत. काही लोक काही काम न करताच जनतेचा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न करतात अशा बुध्दीभेद करणा-यांपासून सावधच रहा असे सांगत त्यांनी चांगल्या लोकप्रतिनिधींच्या मागे उभे राहण्याची या विभागाची परंपरा आहे ती परंपरा या विभागातील जनतेने कायमस्वरुपी कायम ठेवावी असे आवाहन शेवठी बोलताना केले.
याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई म्हणाले, सन २००९ साली कराड तालुक्यातील सुपने मंडल हे पाटण विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आले.या विभागात २००९ पुर्वी माजी आमदार आणि माजी मंत्री विलासराव काका उंडाळकर यांनी उभे केलेले विकासाचे पर्व उल्लेखनीय आणि कधीही न विसरता येणारे आहे.हा विभाग पाटण विधानसभा मतदारसंघात आल्याने मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माजी मंत्री विलासराव काका उंडाळकर यांचेप्रमाणेच या विभागात त्यांचे एवढे नाही परंतू माझेपरीने जनतेची विकासात्मक कामे करण्याचा मी प्रयत्न करीत आहे.गत साडेतीन वर्षात या विभागातील एकदोन गांवे सोडली तर प्रत्येक गांवामध्ये विविध विकासाची कामे मार्गी लावण्यात मला यश आले आहे.जनतेची कामे करायला गेल्या ३० वर्षात मी कुठे कमी पडलो नाही आणि भविष्यात देखील कमी पडणार नाही.काकांना राज्याचे मंत्रीपद मिळाले होते त्याचप्रमाणे आमचे तालुक्यातही राज्याचे बांधकाम मंत्रीपद मिळाले होते परंतू आमच्या माजी मंत्री यांना काकांच्याप्रमाणे तालुक्यात काम करणे जमले नाही त्यामुळे मोठया प्रमाणात विकासाचा अनुशेष शिल्लक राहिला होता तो अनुशेष मी सन २००४ ते २००९ या कालावधीत विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील भरुन काढण्याचा प्रयत्न केला तर आता २०१४ ला आमदार झालेपासून गत साडेतीन वर्षात मी ३१० हुन अधिक कोटींची विकासकामे मंजुर करुन आणली आहेत या विभागात साडेतीन वर्षात १२.५० कोटी रुपयांची कामे मार्गी लावली तर ४ ते साडेचार केाटी रुपयांची कामे यंदाच्या वर्षी प्रस्तावित केली आहेत. जनतेने न मागता विकासाची कामे मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य मी आमदार म्हणून पुर्ण करीत आहे याचे मला समाधान आहे. २०१९ ची निवडणूक लांब असली तरी २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत या सुपने मंडलमधील मतदारांनी मला ज्याप्रमाणे चांगले मताधिक्क देवून सहकार्य केले त्याचपध्दतीने २०१९ लाही चांगले मताधिक्कय दयावे असे आवाहन करुन आपली प्रलंबीत राहिलेली विकासकामे मार्गी लावणेकरीता मी कटीबध्द असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले.उपस्थितांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी केले व आभार जयदीप पाटील यांनी मानले

No comments:

Post a Comment