दौलतनगर दि.01: पाटण विधानसभा मतदारसंघातील
कोयना नदीकाठी वसलेल्या गावांना कोयना नदीस अतिवृष्टीच्या काळात येणा-या पुरामुळे धोका
निर्माण होत असल्याने या गावांना पुरसंरक्षक भिंती बांधण्यास व कोयना नदीवर घाट बांधणेस
जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करुन द्यावा अशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज
देसाईंची आग्रहाची मागणी होती.त्यांनी यासंदर्भात लक्षवेदी सुचना देखील मांडली होती.त्यानुसार
साजूर,तांबवे बौध्दवस्ती,नेरळे,गिरेवाडी,पश्चिम सुपने,केसे व मंद्रुळहवेली या सात गांवाना
जलसंपदा विभागाने मान्यताही दिली आहे.त्या कामांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या आहेत.उर्वरीत
सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाचे प्रस्ताव मान्यतेकरीता जलसंपदा विभागाकडे
सादर झाले आहेत त्या प्रस्तावांना तात्काळ मान्यता देणेकरीता सदरचे तीन प्रस्ताव लगेचच
सादर करा अशा सुचना जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी आमदार शंभूराज देसाईंच्या
विनंतीवरुन मंत्रालयीन अधिका-यांना दिल्या.
राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन हे पाटण आणि सातारा दौ-यावर
आले असताना पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना नदीकाठी
वसलेल्या सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाना पुरसंरक्षक भिंती बांधणे व कोयना
नदीवर घाट बांधणे या कामांचे प्रस्तावाना जलसंपदा विभागाने मान्यता देणेचे प्रस्ताव
जलसंपदा विभागाकडे प्रलंबीत असल्याची बाब जलसंपदा मंत्री यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर
जलसंपदा मंत्री ना.महाजन यांनी तात्काळ भ्रमणध्वनीवरुन मंत्रालयीन अधिका-यांना पाटण
विधानसभा मतदारसंघातील उर्वरीत सांगवड,बनपेठ येराड व गुंजाळी या तीन गांवाचे पुरसंरक्षक
भिंती बांधणे व कोयना नदीवर घाट बांधणे या कामांचे प्रस्ताव तात्काळ मान्यतेकरीता सादर
करा अशा सुचना दिल्या. यावेळी आमदार शंभूराज देसाईंनी जलसंपदा मंत्री यांचे आभार व्यक्त
केले.पाटण मतदारसंघातील कोयना नदीकाठी वसलेल्या उर्वरित सांगवड गावाच्या पुरसंरक्षक
भिंती बांधणे व कोयना नदीवर घाट बांधणेकरीता 5 कोटी 43 लाख 72 हजार, बनपेठवाडी (येराड)
2 कोटी 3८ लाख 8७ हजार व गुंजाळीकरीता 3 कोटी 46 लाख 85 हजार असे अंदाजपत्रक संबधित
यंत्रणेकडून तयार करण्यात आले आहे.या तीन गावांचे प्रस्ताव रक्कम रुपये २ कोटीच्या
वरील असल्याने शासनाकडे मंजुरीकरीता प्रलंबीत राहिले आहेत.राज्याचे जलसंपदा मंत्री
ना.गिरीश महाजन यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ याची दखल
घेवून मंत्रालयीन अधिकारी यांना मान्यतेसंदर्भात सुचना केल्याने लवकरच या उर्वरीत तीन
गांवाच्या कामांनाही आवश्यक असणारा अंदाजपत्रकानुसारचा निधी मंजुर होवून ही कामे सुरु
करता येतील असा विश्वास आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
चौकट:- पुरसरंक्षण भिंतीच्या कामांकरीता १० टक्के लोकवर्गणीचीही
अट शिथील करण्यास मान्यता.
पुरसरंक्षण भिंतीच्या कामांकरीता १०
टक्के लोकवर्गणी भरण्याचा शासन निर्णय असून मतदारसंघातील साजूर,तांबवे बौध्दवस्ती,नेरळे,गिरेवाडी,पश्चिम
सुपने,केसे व मंद्रुळहवेली या सात गांवाना ही लोकवर्गणी भरणे शक्य नसल्याने या सर्व
कामांसदर्भातील १० टक्के लोकवर्गणीचीच अट शिथील करावी अशी मागणी आमदार शंभूराज देसाईंनी
जलसंपदामंत्री यांचेकडे केल्यानंतर तातडीने जलसंपदा मंत्री ना.महाजन पाटण मतदारसंघातील
पुरसंरक्षक भिंतीच्या कामांची १० टक्के लोकवर्गणीची अट शिथील करण्यास मान्यता दिली
असून तशाप्रकारच्या सुचनाही त्यांनी भ्रमणध्वनीवरुन मंत्रालयीन जलसंपदा अधिका-यांना
दिल्या.
No comments:
Post a Comment