दौलतनगर दि.10:- मल्हारपेठ ता.पाटण
येथील पोलीस औट पोस्टचे अपग्रेडेशन करुन पोलीस स्टेशन करण्याची अनेक वर्षांची
मागणी आहे. यासंदर्भात मी आमदार असताना अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला असून
मल्हारपेठ पोलीस औटपोस्टचे पोलीस स्टेशन करण्यासंदर्भातील सर्व प्रक्रिया एक
महिन्याच्या आत पुर्ण करा जेणेकरुन शासनाकडून कराड चिपळूण या प्रमुख राष्ट्रीय
महामार्गावर मल्हारपेठ येथे नव्याने पोलीस स्टेशनची निर्मिती करता येईल यात विलंब
नको लवकरात लवकर हा प्रस्ताव मान्यतेकरीता शासनाकडे सादर करा अशा सुचना
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी गृह विभागाच्या मंत्रालयीन वरीष्ठ
अधिकाऱ्यांना केल्या.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे अध्यक्षतेखाली आज मंत्रालय येथे मल्हारपेठ,ता.पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन
करुन पोलीस स्टेशन करण्यासंदर्भातील बैठक पार पडली.यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे गृह
विभागाच्या मंत्रालयीन वरीष्ठ अधिकाऱ्यांना सुचना केल्या.या बैठकीस गृह विभागाचे
उपसचिव कैलास गायकवाड,अप्पर पोलीस महासंचालक जग्गनाथन,कोल्हापूर परिक्षेत्राचे
विशेष पोलीस महानिरिक्षक सुहास वारके,सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते हे गृह
विभागाचे व वित्त विभागाच्या अव्वर सचिव गावकर यांच्यासह वरीष्ठ अधिकाऱी उपस्थित
होते.
मल्हारपेठ,ता.पाटण हे पाटण
विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती ठिकाण असून येथील औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी
नविन पोलीस स्टेशन करण्यात यावे ही बरेच वर्षाची मागणी आहे.मल्हारपेठला नवीन पोलीस
स्टेशन करणेकरीता सन 2001 मध्ये राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
सन 2007 मध्ये या प्रस्तावासंदर्भात विधानसभेत तारांकीत प्रश्न दाखल केलेनंतर
तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी सदर प्रस्ताव हा तपासणीकामी पोलीस
महासंचालक यांचेकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर या
प्रस्तावावर कोणतीही अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे मल्हारपेठ ता. पाटण येथील
पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन नवीन पोलीस स्टेशन करण्याचा प्रस्ताव अनेक
वर्षापासून प्रलंबित राहिला.आता या प्रस्तावास विलंब न लावता एक महिन्याच्या आत
मल्हारपेठ ता. पाटण येथील पोलीस औटपोस्टचे अपग्रेडेशन करुन याठिकाणी नवीन पोलीस
स्टेशन करणेसंदर्भातील सर्व प्रक्रिया पुर्ण करा व हा प्रस्ताव मान्यतेकरीता
शासनाकडे सादर करा अशा सुचना ना.शंभूराज देसाईंनी या बैठकीत दिल्या.
No comments:
Post a Comment