दौलतनगर दि.३१ :- पाटण तालुक्यात
कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने कराड तसेच सातारा येथे पाटण
तालुक्यातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे आठ दिवसापुर्वीच बैठक
घेवून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आठ दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह
३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेबरोबर चर्चा करुन
तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या त्यानुसार या कोवीड
रुग्णालयाच्या सुरुवात करावयाच्या प्रत्यक्ष कामांची पहाणी आज गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी सर्व संबधित अधिकाऱ्यांना सोबत घेत ढेबेवाडी येथे केली.
यावेळी गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांच्यासमवेत पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर
यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक
डॉ.दत्तात्रय डोंगरे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी.पाटील,ढेबेवाडीचे सपोनी उत्तम भजनावळे
सार्वजनीक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता विद्याधर शिंदे यांची उपस्थिती
होती.
ढेबेवाडी
ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भातील पहाणी
दौऱ्यात गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात कोरोनाचे बाधित
रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.ज्याप्रमाणे पाटण तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत
आहेत त्याचप्रमाणे सातारा आणि कराड येथेही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कराड
अथवा सातारा येथे कोरोना रुग्णांवर उपचार करावयाच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक बेड
उपलब्ध होत नाहीत म्हणून आठच दिवसापुर्वी पाटण तालुक्यात ढेबेवाडी येथील ग्रामीण
रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात मी सातारा जिल्हाधिकारी
यांचेबरोबर चर्चा केली होती. त्याअनुषगांची पुर्वतयारी करुन हे कोवीड रुग्णालय
लवकर सुरु करण्याच्या सुचनाही तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
त्यानुसार ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय
सुरु करण्याच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात या
कोवीड रुग्णालयाचे काम पुर्ण करुन या रुग्ण्यालयात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक
असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना तालुका प्रशासनातील सर्व
संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसात पाटण तालुक्यातील कोरोना बाधित
रुग्णांना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील उपचाराच्या सुविधा
प्राप्त होतील अशी मला आशा आहे असे शेवठी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले.
No comments:
Post a Comment