दौलतनगर दि.10:- मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा रहिवाशी
मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट,२०२० रोजीचा वाढदिवस व
वाढदिवसानिमित्त पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळ व लोकनेते बाळासाहेब देसाई
नागरी सह.पतसंस्था यांच्यावतीने आयोजीत करण्यात येणारे सर्व कार्यक्रम यंदाच्या
वर्षी कोरोनाच्या संकटामुळे स्थगित करण्यात आले आहेत.कोरोना संकटामुळे यादिवशी ते परगांवी जाणार असून कुणीही
प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन शुभेच्छा दयाव्यात अशी माहिती लोकनेते बाळासाहेब
देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ यांच्यावतीने
प्रसिध्दीस देण्यात आली आहे.
पत्रकांत म्हंटले आहे की,मोरणा शिक्षण संस्थेचे व पाटण तालुका सातारा
रहिवाशी मित्र मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट रोजी प्रतिवर्षी
वाढदिवस साजरा करण्यात येतो त्यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने सातारा याठिकाणी लोकनेते
बाळासाहेब देसाई नागरी सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ
यांच्यावतीने पाटण तालुक्यातील सातारा रहिवाशी असणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वी मधील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा तसेच ज्या पालकांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहे
त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.यंदाच्या वर्षी
कोरोनाचे संकट असल्यामुळे रविराज देसाई यांचा दि. १२ ऑगस्ट, २०२० चा वाढदिवस व
वाढदिवसानिमित्ताचे सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. कोरोनामुळे पाटण
तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळ व मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई
यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून वाढदिवसादिवशी ते
परगांवी जाणार असून कोरोनामुळे कुणीही प्रत्यक्ष न भेटता दुरध्वनीवरुन शुभेच्छा
दयाव्यात असे रविराज देसाईंनी सांगितले असल्याचेही लोकनेते बाळासाहेब देसाई नागरी
सहकारी पतसंस्था व पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात
आले आहे.
No comments:
Post a Comment