दौलतनगर दि.07 :- दौलतनगर मरळी ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखान्याने नेहमीच कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी व
सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. कारखान्याने हंगाम 2019-20 मध्ये गाळप
केलेल्या संपूर्ण ऊसाची एफआरपीनुसार प्रतिटन रु.2657.54/- प्रमाणे उर्वरीत
राहिलेली 327 रुपये ही रक्कम दि.07.09.2020 रोजी वर्ग केली असून कारखान्याने
एफआरपीनुसार सर्वच्या सर्व 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खाती अदा केली असल्याची
माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकांव्दारे दिली आहे.
पत्रकांत
पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2019-20 चे गळीत हंगामात एकूण 02 लाख 02 हजार 414 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन
12.10% सरासरी साखर उताऱ्यांने 02 लाख 45 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचे
सन 2019-20 चे गळीत हंगामातील ऊसबिलाची एफआरपी रक्कम प्र.मे.टन रुपये 2657.54/- इतकी
आहे.एफआरपीप्रमाणे एकूण गळीताच्या ऊसबिलाची रक्कम रुपये 5379.24 लाख इतकी होत असून
कारखान्याने आतापर्यंत रुपये 4716.25 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली होती व
उर्वरित एफआरपीप्रमाणे शिल्लक असणारी 327 रुपये प्रमाणे होणारी रक्कम रुपये 662.99
लाख कारखान्याने आज रोजी दि. 07.09.2020 रोजी ऊस पुरवठादारांच्या बँक खाती वर्ग
केलेली आहे. दरम्यान केंद्र शासन व राज्य शासन यांचेकडून दि.31 मार्च,2020 अखेर
रुपये 511.91 लाख विविध अनुदानाची रक्कम आपले कारखान्याला येणे आहे. तसेच सन
2020-21 मध्ये निर्यात साखर व बफर स्टॉक अनुदानाची 528.11 लाख अशी एकूण रुपये
1040.02 लाख इतकी अनुदानाची रक्कम आपले कारखान्यास येणे बाकी आहे. सदर रक्कम
प्राप्त होण्याकरीता महाराष्ट्र राज्याचे गृह(ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज
देसाई यांचे मार्फत केंद्र शासन व राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. सन 2019-20 चा गळीत हंगाम
संपलेपासून गेले 5 महिन्यात कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर संपूर्ण टाळेबंदीच्या
काळामध्ये बाजारपेठा बंद असल्याने साखरेची बाजारातील कमी झालेली मागणी तसेच
वेळोवेळी विक्री दरामध्ये झालेला बदल,कामगारांची देणी,वाहतुक खर्च वित्तीय कर्जाची
उपलब्धता आदी अनेक आव्हांनांना तोंड देत एफआरपीची उर्वरित रक्कम सभासदांना
देण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवानेते यशराज
देसाई व कारखाना व्यवस्थापनाने निधीची उपलब्धता करुन लोकनेते बाळासाहेब देसाई
सहकारी साखर कारखान्याने सन 2019-20 च्या गळीत हंगामातील 100 टक्के एफआरपी रक्कम
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे. तसेच सन 2020-21 चे गळीत
हंगामाकरीता तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाची नोंद करुन ऊस हंगाम यशस्वी
करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शेवटी पत्रकांत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment