सातारा दि.०१ :-सातारा जिल्हयामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेदिवंस वाढ
होत असल्यामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेवून राज्याचे
मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे आग्रह धरीत साताऱ्यात 200 ऑक्सीजन बेड व
50 व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करणेस शासनाची दोनच
दिवसापुर्वी मंजुरी घेतली. येत्या 15 दिवसात उभारावयाच्या या जम्बो कोवीड फॅसिलिटी
सेंटरच्या जागेची व जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना उपलब्ध करुन
दयावयाच्या सुविधांची आज सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी जिल्हयाचे जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच जम्बो कोवीड फॅसिलिटी
सेंटरच्या संबधित सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना बरोबर घेत प्रत्यक्ष संयुक्तीकपणे
पहाणी केली.
जिल्हयामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ पहाता रुग्णांच्या उपचाराकरीता जिल्हयाच्या
ठिकाणी जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटरची गरज ओळखून लवकरात लवकर साताऱ्यात 200 ऑक्सीजन
बेड व 50 व्हेन्टिलेटर सुविधांचे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करणेसंदर्भात गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे,नगरविकासमंत्री
मा.ना.एकनाथजी शिंदे व राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांचेबरोबर दुरध्वनीवरुन
चर्चा करीत या सेंटरला तात्काळ मान्यताही घेतली.ना.शंभूराज देसाईंच्या
पुढाकारामुळे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर उभारण्याची सुत्रे तात्काळ हलली आणि मुख्यमंत्री
मा.ना.उध्दवजी ठाकरे यांनी मुख्य सचिव संजयकुमार यांना तात्काळ आदेश देत या
कामांला विलंब न लावता तातडीने सुरुवात करावी असे आदेश दिले. मुख्यमंत्री यांचे
आदेश जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना देत तात्काळ या कामांस सुरुवात करण्याच्या
सुचना राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी जिल्हाधिकारी यांना केल्या आहेत.
पुणे येथे ज्याप्रमाणे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु केले
आहे त्याप्रमाणे साताऱ्यात लवकरात लवकर हे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु
होणेकरीता जिल्हाधिकारी यांनी स्वत: पुण्याच्या जम्बो कोवीड सेंटरची पहाणी
करण्याचे ना.शंभूराज देसाईंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना त्याचदिवशी सुचित केले
होते.त्यानुसार आज जिल्हयाचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईं यांचा अधिकाऱ्यांसमवेत हा संयुक्तीक पहाणी दौरा आयोजीत करण्यात
आला होता.सातारा येथील शिवाजी संग्रहालयाच्या इमारतीच्या
परिसरात कशाप्रकारे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करता येईल याची माहिती जिल्हाधिकारी
शेखर सिंह यांनी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना
दिली. 15 दिवसाच्या आत हे सेंटर सुरु करणेसंदर्भातील सुचना जिल्हयाचे पालकमंत्री
ना.बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी संबधित सर्व
अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत हे सेंटर सुरु करणेसंदर्भात सर्वोत्तोपरी
उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी पहाणी
दौऱ्यामध्ये सांगितले.
साताऱ्यात जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु झालेनंतर जिल्हयामध्ये वाढलेल्या
कोरोना रुग्णांना आवश्यक त्या उपचाराच्या सुविधा देण्यास यामुळे चांगली मदत होणार
आहे.केवळ एका विनंतीवरुन विलंब न लावता मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, नगरविकासमंत्री
मा.ना.एकनाथजी शिंदे यांनी साताऱ्यात जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर सुरु करण्यास
तातडीने मान्यता दिल्याबद्दल मी सातारा जिल्हयातील तमाम जनतेच्या वतीने
मुख्यमंत्री मा.ना.उध्दवजी ठाकरे, नगरविकास मंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांचे प्रथमत:
आभार व्यक्त करतो व हे जम्बो कोवीड फॅसिलिटी सेंटर उभे करण्यास निधी कमी पडू देणार
नसल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यावेळी बोलताना सांगितले.यावेळी
जिल्हाधिकारी शेखर सिंह,अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी
सुनिल थोरवे,मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत,जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती
तेजस्वी सातपुते,जिल्हा शल्य चिकित्सिक डॉ.सुभाष चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी अनरिुध्द
आठल्ये, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जी.जगदाळे,महावितरणचे अधिक्षक अभियंता गायकवाड, सार्वजनिक
बांधकाम विभागाचे प्रभारी अधिक्षक अभियंता वेदफाटक,ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता
शिंदे,उपविभागीय अधिकारी मुल्ला हे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment