दौलतनगर दि.०४ :- ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५
बेडचे कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.जे काम शिल्लक
राहिले आहे ते दोन दिवसात पुर्ण करुन याठिकाणी रविवारपासून कोरोना रुग्णांना आवश्यक
ते उपचार देण्यास सुरुवात करा तसेच या विभागातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना
उपचारासाठी स्वतंत्रपणे तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी,
कर्मचारी यांच्यासह पुरेसा औषधसाठयासह सर्व सुविधा उपलब्ध करुन दया.त्याचबरोबर इतर
भागातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांच्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,पाटण तसेच
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वरीलप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करुन
देण्याच्या सुचना आज गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी आरोग्य व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली पाटण विश्रामगृह
याठिकाणी ढेबेवाडी येथील ऑकसीजनसह ३५ बेडचे कोरोना रुग्णालय रविवार दि. ०६
सप्टेंबरपासून सुरु करणे तसेच याविभागातील कोरोना व्यतिरिक्त रुग्णांना
उपचाराकरीता अद्यावत प्राथमिक आरोग्य केद्रांत सुविधा देणे व पाटण ग्रामीण
रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांच्यासह औषधसाठा उपलब्ध करुन
देणेसंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली होती. याप्रसंगी बैठकीस जिल्हा शल्यचिकिस्तक
डॉ.सुभाष चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठ्ठल्ये,पाटणचे प्रातांधिकारी
श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव, ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी
डॉ.आर.एल.जगताप,पाटण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीमती पाटील,तालुका
वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी,
सा.बा.उपविभागाचे उपअभियंता अजित पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी ना.शंभूराज देसाईंनी
ढेबेवाडी तसेच पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक हे दोन्हीही कोरोना बाधित
आढळल्याने ढेबेवाडी याठिकाणी सुरु करावयाच्या ऑकसीजनसह ३५ बेडचे कोरोना रुग्णालयाकरीता आवश्यक
असणारे वैद्यकीय
अधिकारी,कर्मचारी यांच्यासह पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन देणेसंदर्भात जिल्हा शल्यचिकिस्तक व जिल्हा परिषदेचे जिल्हा
आरोग्य अधिकारी यांना सुचना दिल्या. सध्या ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये
कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांची माहिती घेत कोरोना रुग्णालयाकरीता
आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी हे या विभागातील प्राथमिक आरोग्य
केंद्रातील उपलब्ध करुन देणेबाबत सुचित केले. ढेबेवाडी कोरोना ग्रामीण रुग्णालयात
सध्या दोन वैद्यकीय अधिकारी असून वाढीवचे दोन वैद्यकीय अधिकारी तसेच एकूण १०
परिचारिका, ०२ फार्मासिस्ट, ०२ लॅब टेक्नीशियन, वॉर्ड बॉय, स्वीपर,त्याचबरोबर
स्वच्छता कर्मचारी आणि दोन रुग्णवाहिकांना आवश्यक असणारे दोन चालक उपलब्ध करुन
देणेसंदर्भात ना.देसाईंनी सुचना केल्या आहेत.तसेच वाढीवचे वैद्यकीय
अधिकारी,कर्मचारी यांच्या राहण्याची याठिकाणी सोय करुन देण्याच्याही सुचना
सा.बा.उपविभागाचे उपअभियंता यांना दिल्या आहेत.
दरम्यान कोरोना व्यतिरिक्त रुग्णांची गैरसोय
होवू नये याकरीता करावयाच्या उपाययोजना संदर्भातही आढावा घेताना ना.शंभूराज
देसाईंनी या बैठकीत पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात तसेच तालुक्यातील एकूण १३
प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना व्यतिरिक्त रुग्णांच्या उपचार करण्याकरीता आवश्यक
असणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आवश्यक औषधसाठाही उपलब्ध करुन
देण्यात यावा.तसेच कोरोना रुग्णालयातील बायोमेडीकल वेस्टची विल्हेवाट लावण्याकरीता
आवश्यक असणारी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात याव्यात असे ना.शंभूराज देसाईंनी सुचित
केले असून दिलेल्या सुचनानुसार संबधित विभागाने अंमलबजावणी करण्याचे त्यांनी
अधिकाऱ्यांना सांगितले.
चौकट:- कोरोना,कोरोना म्हणून इतर रुग्णांची गैरसोय नको-
ना.शंभूराज देसाई.
कोरोनाच्या भितीमुळे कोरोना
नसलेल्या रुग्णांना उपचाराकरीता अनेक खाजगी रुग्णालयात नाकारले जात असल्याच्या
तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे या रुग्णांना उपचार मिळत नसून त्यांची गैरसोय होत
आहे. याकरीता ढेबेवाडीचे कोरेाना रुग्णालय वगळता तालुक्यातील पाटणचे ग्रामीण
रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना व्यतिरिक्त
रुग्णांच्यावर उपचार करण्याच्या सक्त सुचना दया असेही ना.शंभूराज देसाईंनी
सांगितले.
No comments:
Post a Comment