दौलतनगर दि.०७ :-पाटण तालुक्यात
कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने कराड तसेच सातारा येथे पाटण
तालुक्यातील कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे ढेबेवाडी ग्रामीण
रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु करणेसंदर्भात आठ दिवसापुर्वी
राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा
यांना सुचित केले होते.आज ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून पाटण तालुक्यातील
कोरोना रुग्णांसाठी ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय
सज्ज झाले आहे.
गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी आठ दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड
रुग्णालय सुरु करणेसंदर्भात पुढाकार घेत त्यांनी स्वत: तालुका प्रशासनातील यासंदर्भातील
सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली तसेच या कोवीड रुग्णालयाच्या सुरुवात करावयाच्या
कामांची प्रत्यक्ष पहाणीही त्यांनी केली. त्यानतंर पुन्हा एकदा या कामाला गती
देणेसंदर्भात अधिवेशनाला जाणेपुर्वी तालुका प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक
घेतली आणि येत्या दोन दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड
रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेत आणा असे आदेशित केले होते.त्यानुसार या कोवीड
रुग्णालया करीता लागणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची उपलब्धता करण्याचेही
त्यांनी सुचित केले होते.
आज गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या
प्रयत्नातून आठ दिवसात ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात सुरु होत असलेल्या ऑक्सीजनसह ३५
बेडचे कोवीड रुग्णालय कोरोना रुग्णांवर उपचाराकरीता सज्ज झाले असून ना.शंभूराज
देसाईंच्या सुचनेवरुन या कोवीड रुग्णालयाकरीता आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी,
कर्मचारी यांची उपलब्धताही याठिकाणी करण्यात आली आहे.या कोवीड रुग्णालयाचे सर्व
नियंत्रण ना.शंभूराज देसाईंनी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे यांचेकडे दिले आहे.
कोरोना रुग्णांकरीता आवश्यक असणारे ३५ बेड ऑक्सीजनसह रुग्णालयामध्ये उपलब्ध
करण्यात आले आहेत.कोरोना रुग्णांवर उपचार करणेकरीता दोन नोडल वैद्यकीय अधिकारी,
दोन वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील ०७ वैद्यकीय अधिकारी, १०
अधिपरिचारीका, दोन औषनिर्माता, ०४ लॅब टेकनिशअन, एक कक्षसेवक व दोन सफाई कामगार
याप्रमाणे ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात कोवीड
रुग्णालयाकरीता एकूण ३१ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी याठिकाणी उपलब्ध करुन देण्यात
आले आहेत.
या रुग्ण्यालयात कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक
असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सुचना तालुका प्रशासनातील सर्व
संबधित अधिकाऱ्यांना ना.शंभूराज देसाईंनी दिल्या आहेत.आठ दिवसापुर्वी पाटण
तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनावरील
उपचाराच्या सुविधा प्राप्त होतील अशी आशा ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त केली होती
त्यानुसार त्यांनी हे रुग्णालय तालुका प्रशासनाच्या सहकार्यातून कोरोना
बाधितांसाठी आजपासून सज्ज केले आहे.
No comments:
Post a Comment