दौलतनगर दि.१२:- पाटण तालुक्यात
कोरोनाचे बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कराड व सातारा येथे रुग्णांना
पाठविणे गैरसोईचे होत असल्यामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील ग्रामीण
रुग्णालयात ज्याप्रमाणे आपण ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु केले आहे
त्याचप्रमाणे पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये आपण लोरिस्कमधील
कोरोना बाधित रुग्णांना दाखल करुन घेत आहोत त्याठिकाणी ऑक्सीजनसह २५ बेडचे काम
तात्काळ सुरु करा. त्याठिकाणी लागणारे २५ बेड दोनच दिवसात उपलब्ध करुन देण्याचे
जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे. लागणारे २५ ऑक्सीजन सिलेंडर हे स्व.शिवाजीराव
देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत बुधवारपर्यत उपलब्ध करुन दिले जातील त्यामुळे या
कामांस लवकर सुरुवात करा आणि येत्या बुधवारपर्यंत काम पुर्ण करा अशा सुचना आज गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनाच्या कोवीड संदर्भातील सर्व अधिकाऱ्यांना
केल्या.
आज गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली पाटणच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पाटण
तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने खबरदारीच्या
दृष्टीने उपाययोजना करण्याकरीता तालुक्यातील कोरोना उपाययोजना संदर्भातील सर्व
शासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली.यावेळी बैठकीस पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग
तांबे,तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे
अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,कोयनानगरचे सपोनी एम. एस. भावीकट्टी,तालुका वैद्यकीय
अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी
अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी
प्रारंभी ना.शंभूराज देसाईंनी संपुर्ण पाटण तालुक्यातील गाववाईज कोरोना बाधितांची
माहिती तालुका प्रशासनाकडून घेतली.तालुक्यातील प्रमुख गांवामध्ये मोठया प्रमाणात
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे.कोरोना रुग्णांचा तालुक्याने ९००
च्या वर टप्पा ओलंडला आहे.एकूण ९४३ कोरोना बाधित रुग्ण आढळले त्यापैकी ६५६ रुग्ण
बरे झाले आणि २४१ रुग्ण उपचार घेत आहेत.एकूण रुग्णांच्या ४६ रुग्ण मयत झाले आहेत.तसेच
गृह विलगीकरणात ११० रुग्ण आहेत.रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कराड असो वा सातारा
असो याठिकाणीही रुग्ण असल्याने आपल्या पाटण तालुक्यातील रुग्णांना कराड,सातारा
याठिकाणी उपचारा करीता बेड उपलब्ध होत नाहीत म्हणून आपण दोन ते तीन दिवसापुर्वी ढेबेवाडी
येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय सुरु केले.रुग्णांची
संख्या जास्त होवू लागल्याने पाटणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या
वसतीगृहामध्ये ऑक्सीजनसह २५ बेड उपलब्ध करुन देवून त्याठिकाणी रुग्णांच्यावर उपचार
करणेसंदर्भात जिल्हाधिकारी यांचेबरोबर माझी सकाळीच चर्चा झाली आहे.दोन दिवसात २५
बेड उपलब्ध करुन देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य केले आहे. त्याठिकाणी ऑक्सीजन
देणेकरीता लागणारे सिलेंडर आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. दोन दिवसात तेथील स्वच्छता
करुन पाईपींगचे काम तात्काळ सुरु करा. तसेच ढेबेवाडीच्या कोरोना रुग्णालयाकरीता
लागणारे २५ ऑक्सीजनचे सिलेंडर आज किंवा उद्या देण्याचे जिल्हाधिकारी यांनी मान्य
केले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये उपचार देणेकरीता आवश्यक वैद्यकीय
अधिकारी,कर्मचारी यांची उपलब्धता करावी वेळप्रसंगी खाजगी डॉक्टरांना पाचारण करावे
असे ना.शंभूराज देसाईंनी यावेळी सांगितले.
दरम्यान ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सीजनसह ३५ बेडचे कोवीड रुग्णालय
सुरु आहेच पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये ऑक्सीजनसह २५
बेडचे बुधवारपर्यंत काम पुर्ण झालेनंतर सुमारे ६० ऑक्सीजनसह बेड कोरोना
रुग्णांच्या उपचाराकरीता आपल्याला पाटण मतदारसंघात उपलब्ध होतील व वेळेत कोरोना
रुग्णांच्यावर उपचार करता येतील असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला.
चौकट:- स्व.शिवाजीराव
देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ऑक्सीजनचे ४० जम्बो सिलेंडर देणार.
ना.शंभूराज देसाई.
कोरेाना
बाधित रुग्णांना मोठया प्रमाणात ऑक्सीजनची गरज भासू लागली आहे.त्यामुळे
स्व.शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ऑक्सीजनचे ४० जम्बो सिलेंडर घेवून
पाटणच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतीगृहामध्ये व ढेबेवाडी कोरोना
रुग्णालयात देण्याचा निर्णय ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत घेत बुधवारपर्यंत हे ४०
जम्बो सिलेंडर प्रांताधिकारी तांबे यांचेकडे उपलब्ध करुन देण्यात येतील असे
ना.शंभूराज देसाईंनी बैठकीत सांगितले.
अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. पण येथे आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांची ही संख्या वाढवणे गरजेचे आहे.
ReplyDelete