दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री
कार्यालय):-अतिवृष्टी व परतीच्या पावसाचा तडाखा बसलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी काल राज्याचे
कर्तबगार मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी केंद्र शासनाकडून जीएसटीचे 38 हजार
कोटी रुपये येणे बाकी असतानाही 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री
ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी या मदतीची घोषणा करुन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे
काम केले आहे.मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या धोरणात्मक निर्णयाचे राज्यातील शेतकऱ्यांनी
स्वागत केले आहे. दिवाळीपुर्वी नुकसानीची ही रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या हाती पडेल
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे
अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली आहे.
संपुर्ण राज्यामध्ये
अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले
असून मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी स्वत: या आठवडयात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या
बांधावर जावून नुकसानीची पहाणी करुन राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 10 हजार कोटी
रुपयांची मदतीची घोषणा केली आहे.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली
महाविकास आघाडी शासनाचा हा धोरणात्मक निर्णय असून मुख्यमंत्री यांच्या निर्णयामुळे
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परतीच्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या
नुकसानीबरोबर शेतजमिनी खरडून जाणे, ग्रामीण रस्ते, लहान पुल, पिण्याच्या पाण्याच्या
योजना, कमकुवत घरे कोसळणे या सर्व बाबींसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.अतिवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या शेतजकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व पायाभूत सुविधांच्या पुर्नबांधणीसाठी
मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी घोषित केलेल्या मदतीमध्ये शेतीपिकांसाठी जीरायत
व बागायत क्षेत्रासाठी रु 10 हजार प्रतिहेक्टर, फळपिकांसाठी रु.25 हजार प्रति हेक्टर,
मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी व घरपडघडीसाठी 5 हजार 500 केाटी अशी भरीव
मदत यामध्ये देण्यात आली आहे. तसेच रस्ते व पुल पुर्नंबांधणीसाठी 2 हजार 635 कोटी,
पाणीपुरवठा योजना पुर्नंबांधणीसाठी 1 हजार कोटी,जलसंपदा विभागाकडील कामे करण्याकरीता
102 कोटी, विजेचे खांब बदलणे, वीजपुरवठा सुरळीत करणे या कामांकरीता महावितरण ऊर्जा
विभागाला 239 कोटी व नगर विकास विभागाला 300 कोटी असे एकूण 10 हजार कोटींची ही मदत
मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी जाहीर केली आहे.
राज्य शासनाच्या तिजोरीत पैशाची ओढाताण
असताना तसेच केंद्र शासनाकडून जीएसटीचे 38 हजार कोटी रुपये येणे बाकी असतानाही तसेच
कोरोनाचे एवढे मोठे संकट राज्यापुढे असतानाही अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे नुकसान
झालेल्या सर्व नुकसानग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना राज्य शासनाकडून आवश्यक
ती मदत दिली जाईल असा शब्द मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांनी राज्यातील जनतेला
दिला होता त्यानुसार ही मदत जाहीर करुन धोरणात्मक असा निर्णय घेतला आहे. ही बाब राज्यातील
शेतकऱ्यांना उभारी देणारी आहे. आणि मदत देण्यास विलंब न लावता दिवाळीपुर्वी ही मदत
शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण असून ही मदत जाहीर
केल्याबद्दल मी अर्थराज्यमंत्री या नात्याने
मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांचे जाहीर आभार व्यक्त करीत असल्याचेही
ना.शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.
चौक्ट:- राज्याच्या हक्काचा परतावा दयायला केंद्र शासनाकडून विलंब.
मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने गेल्या
वर्षभरात राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 30 हजार 800 केाटी रुपयांची मदत केली
आहे.केंद्र शासना कडून राज्याच्या हक्काचे 38 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. राज्य
शासन याकरीता केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे परंतू राज्याचा हक्काचा
परतावा दयायला केंद्र शासन विलंब करीत असल्याचा आरोपही अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंनी केला आहे.
No comments:
Post a Comment