Saturday 25 December 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून माहे डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये रस्त्यांच्या व पुलांच्या कामांसाठी 72 कोटी रुपयांचा निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.25 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-माहे जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण रस्त्यांचे,साकव पूलांचे, प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे या मार्गांवरुन दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या नुकसान झालेल्या विविध‍ विकास कामांचे पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या माहे डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केल्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्यांचे व साकव पूलांच्या कामांसाठी 50 कोटी तर प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांच्या भूसंपादनासह सुधारणा करण्याच्या कामांसाठी 22 कोटी 04 लाख असा एकूण 72 कोटी 04 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये जुलै महिन्यामध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सार्वजनिक मालमत्तेचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते.त्यामुळे डोंगरी व दुर्गम भागात दळण-वळण मोठी गैरसोय निर्माण झाली होती.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्यांचे,साकव पूलांचे, प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांचे पुनर्बांधणीचे कामांना राज्य शासनाच्या माहे डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधी मंजूर होण्यासाठी प्रस्तावित केली होती. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी शिफारस केल्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्यांचे व साकव पूलांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी 50 कोटी तर प्रमुख जिल्हा मार्ग,राज्य मार्ग यांच्या भूसंपादनासह सुधारणा करण्याच्या कामांसाठी 22 कोटी 04 लाख असा एकूण 72 कोटी 04 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.मंजूर झालेल्या कामांमध्ये सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण रस्ते व पूलांच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पाटण मणदुरे जळव तारळे पाल रस्ता रामा 398 किमी 1/00 ते 05/00 भाग पाटण ते साखरी रुंदीकरणासह सुधारणा 03 कोटी 20 लाख, पाटण मणदुरे जळव तारळे पाल रस्ता रामा 398 किमी 35/00 ते 38/00 भाग निवडे पुनर्वसन ते पाल रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी 30 लाख, वाखानवस्ती कराड ढेबेवाडी सणबुर महिंद नाटोशी मोरगिरी चाफेर रस्ता प्रजिमा 55 कि.मी. 42/500 ते 44/500 (भाग कि.मी.42/500 ते 44/00 - महिंद ते गडगडा ) भुसंपादन व  सुधारणा 02 कोटी, चरेगांव चाफळ दाढोली महाबळवाडी येरफळे त्रिपुडी चोपडी बेलवडे आंब्रुळे कुसरुंड नाटोशी रस्ता प्रजिमा 53 कि.मी. 20/700 ते 21/400  (भाग -कि.मी.20/700 ते 21/400 येरफळे ते त्रिपुडी  ) भुसंपादन व  सुधारणा 01 कोटी, सातारा गजवडी चाळकेवाडी घाणबी केर पाटण प्रजिमा 29 किमी 49/00 ते 51/00 भाग घाणबी फाटा ते घेरादातेगड फाटा सुधारणा 90 लाख, नागठाणे तारळे पाटण रस्ता प्रजिमा 37 किमी 17/700 ते 13/00 भाग कोंजवडे फाटा ते वजरोशी रुंदीकरणासह सुधारणा 02 कोटी, इजिमा 138 ते निगडे कसणी निवी डाकेवाडी धामणी चव्हाणवाडी  मस्करवाडी घराळवाडी रस्ता प्रजिमा 121 कि.मी. 10/200  कसणी गांवाजवळ लहान पुलाचे बांधकाम 02 कोटी, नाडे सांगवड मंद्रुळकोळे ढेबेवाडी रस्ता प्रजिमा- 58 कि.मी. 19/880 मध्ये वांग नदीवर मंद्रुळकोळे येथे मोठया पुलाचे बांधकाम 06 कोटी 50 लाख, त्रिपुडी मुळगांव कवंरवाडी नेरळे गुंजाळी लेढोंरी मणेरी चिंरबे काढोली चाफेर रिसवड ढोकावळे प्रजिमा 123 कि.मी.0/00 ते 26/00(भाग कि.मी.5/00 ते 6/500- कवरवाडी ते चेवलेवाडी) चे बांधकाम 02 कोटी 50 लाख या कामांचा समावेश आहे.राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या विकास कामांची लवकरच निविदा कार्यवाही करण्यात येऊन दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

नेरळे गावाचा सर्वांगीण विकास करुन घेण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट हवी-युवा नेते मा.यशराज देसाई. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मंजूर नेरळे येथे कोयना नदीकाठी पुरसंरक्षक भिंत व नदीघाट कामाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 


दौलतनगर दि.25(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- कोविड सारख्या महामारीशी सामना केल्यानंतर सध्या जनजीवन पुर्वपदावर येत असल्याने विकास कामे मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मंजूर झालेल्या नेरळे येथील कोयना नदीकाठी संरक्षक  भिंत व नदीघाटाचे आजच आपण भूमिपूजन करत असून येणाऱ्या काळात नेरळे गावासाठी  जनहिताच्या दृष्टीने आवश्यक असलेली विकास कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लागतील.नेरळे गावाचा सर्वांगीण विकास करुन घेण्यासाठी सर्व ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते यांनी आपली एकटूज कायम ठेवावी असे प्रतिपादन युवा नेते मा.यशराज देसाई यांनी केले.

               नेरळे,ता.पाटण येथील कोयना नदीकाठी पूरसंरक्षक भिंत व नदीघाट बांधणे या 85 लक्ष रुपयांचे कामाचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू,पांडूरंग शिरवाडकर,गोविंद बोर्गे,जयसिंग बोर्गे,आनंदा शिर्के,लक्ष्मण बोर्गे,वसंत रोमण,संदिप कांबळे,निवास शिर्के,संजय डोंगळे यांचे सह नेरळे ग्रामस्थ उपस्थित होते.

              याप्रसंगी ते पुढे म्हणाले की,सन 2014 साली पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांना निवडूण दिल्यानंतर त्यांनी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाच्या विविध योजनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील जनहिताच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या विकास कामांना मोठया प्रमाणांत निधी मंजूर करुन आणत या मंजूर निधीमधून विविध‍ विकास कामे मार्गीही लागली आहेत.आपल्या पाटण तालुक्यामध्ये प्रतिवर्षी मोठया प्रमाणांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे व कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कोयना नदीला वारंवार पूर येऊन या कोयना नदीकाठी वसलेल्या गावांचे पूराच्या पाण्यामुळे नुकसान होत होते.त्यामुळे ना.शंभूराज देसाई यांनी कोयना नदीकाठी वसलेल्या व पूराच्या पाण्यामुळे नुकसान होणाऱ्या पाटण विधानसभा मतदारसंघातील सांगवड,बनपेठवाडी (येराड),नेरळे,गुंजाळी,मंद्रुळ हवेली, गिरेवाडी तसेच सुपने मंडलातील तांबवे,केसे,पश्चिम सुपने व साजूर या गावांलगत कोयना नदीकाठी संरक्षक भिंत व नदीघाट बांधण्याच्या कामांना भरघोस असा निधी मंजूर करुन आणत ही कामे मार्गी लावली.सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याबरोबर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी ना.शंभूराज देसाई यांनी सातत्याने प्रयत्न केल्याने सन 2019 च्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा मतदारसंघातील जनतेने ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वावर विश्वास दाखविला.तालुक्यातील सर्व सामान्य मतदार बंधू भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केल्याने त्यांना राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्त्वाच्या अशा पाच विविध खात्यांची जबाबदारीही मिळाली आहे.तसेच वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री म्हणूनही काम पहात आहेत.गत देान वर्षामध्ये आपण सर्व कोरेाना सारख्या महा भयंकर महामारीला सामोरे जात होतो.कोरोनाच्या संसर्गामुळे शासनाच्या महसूलावर परिणाम झाला.परिणामी विकास कामांवर काही प्रमाणांत निर्बंध येऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी शासनाने प्राधान्य दिले.सध्या जनजिवन पुर्वपदावर येत असताना मंजूर असलेली विकास कामे मार्गी लागत असून ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून यापुढील काळामध्ये उर्वरित विकास कामांसाठी मोठया प्रमाणांत निधी मंजूर होईल असे सांगत नेरळे गावाचा सर्वांगीण विकास करुन घेण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ व युवकांनी आपली एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन मा.यशराज देसाई यांनी शेवटी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक  व आभार शंकर सुतार यांनी मानले.

चौकट:-सर्व शेतकरी व सभासद यांनी पिकविलेला ऊस आपल्या कारखान्यास गळीतास घालून सहकार्य करा.

               गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे गावांमधील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी कटीबध्द असून त्यांचे मार्गदर्शनाखाली आपण लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम चांगल्या पध्दतीने सुरु आहे. परंतू या अगोदर ऊस तोडणी यंत्रणेमुळे काही अंशी नेरळे गावातील ऊस हा बाहेरच्या कारखान्यांना गळीतास जात होता.चालू गळीत हंगामामध्ये आवश्यक तेवढी तोडणी यंत्रणा उपलब्ध असल्याने गावातील शेतकरी व सभासद यांनी आपला पिकविलेला ऊस लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याला घालून सहकार्य करण्याचे आवाहनही मा.यशराज देसाई यांनी कार्यक्रमा दरम्यान नेरळे गावातील शेतकरी,सभासद व ग्रामस्थ यांना केले.

Wednesday 22 December 2021

पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीत शिवसेना पक्षाची मुसंडी.

 



दौलतनगर दि.22(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण तालुक्यातील 89 ग्रामपंचायतीमधील 140 रिक्त जागांसाठी पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला होता. त्यानुसार या पोट निवडणूकांमध्ये 32 ठिकाणी एकही अर्ज न दाखल झाल्याने या जागा रिक्त राहिल्या असून 38 ठिकाणी  39 बिनविरोध सदस्य झाले तर प्रत्यक्ष 16 ठिकाणी ग्रामपंचायतींच्या 17 रिक्त जागांसाठी दि. 21 डिसेंबर रोजी मतदान होऊन या निवडणूका पार पडल्या. ग्रामपंचायतींच्या या पोट निवडणुकीमध्ये बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या 09 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. दरम्यान बिनविरोध व पोट निवडणूक झालेल्या 47 ग्रामपंचायतींमध्ये बोडकेवाडी,नहिंबे चिरंबे,भूडकेवाडी,जमदाडवाडी,टेळेवाडी, जरेवाडी,कोदळ पुनर्वसन, कळकेवाडी, रामिष्टेवाडी, शितपवाडी, सातर, पाळशी, पाणेरी, तामिणे, पाचगणी, मस्करवाडी, सुतारवाडी, डोंगळेवाडी, खोणोली, जाधववाडी, मान्याचीवाडी, माथणेवाडी, चाळकेवाडी, कळंबे, नाणेल,गाडखोप, खिवशी, वेखंडवाडी, काळोली, दुसाळे,मोरेवाडी (कुठरे) या 31 ग्रामपंचायतीमध्ये 32 ग्रामपंचायत सदस्य हे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानणारे आहेत.पाटण तालुक्यात गत सहा महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना पक्षाने बहुमत सिध्द केले होते.नंतर नुकत्याच पार पडलेल्या पोट निवडणुकींमध्ये शिवसेना पक्षाचे नेतृत्व मानणारे जास्त सदस्य निवडूण आले. ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीमध्ये बिनविरोध व निवडूण आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते मा.यशराज देसाई,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङमिंलिंद पाटील,जिल्हा परिषद सदस्‍य विजय पवार,सुग्रा बशीर  खोंदू,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सुरेश पानस्कर,संतोष गिरी,सीमा मोरे,निर्मला देसाई,सुभद्रा शिरवाडकर बबनराव शिंदे,भरत साळूंखे,अभिजित पाटील यांनी अभिनंदन केले.

Saturday 4 December 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक आराखडयातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 10 कोटी 26 लक्ष निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.04 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांकरीता सन 2021-22 च्या जिल्हा वार्षिक आराखडयातून 3054 ग्रामीण रस्ते दुरुस्ती, 5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालय इमारत,जनसुविधा योजने अंतर्गत स्मशानभूमी सुधारणा, वळण बंधारे व शेतीच्या पाण्यासाठी आडवे पाट बांधणे, अंगणवाडी इमारती, शाळा खोल्या इमारती बांधणे अशा विविध कामांसाठी सुमारे 10 कोटी 35 लक्ष निधी मंजूर झाला असल्याची माहिती नामदार शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                 प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शिफारसशीनुसार सन 2021-22 या आर्थिक वर्षातील सातारा जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा समावेश करण्यात आला होता. या आराखडयामध्ये समावेश असलेल्या विकास कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या असून यामध्ये 3054 ग्रामीण रस्ते दुरुस्ती अंतर्गत जांभेकरवाडी (मरळोशी) पोहोच रस्ता खडीकरण, डांबरीकरण 12.00 लाख,चव्हाणवाडी नाणेगाव रस्ता ते वरची जाळगेवाडी पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 12.00 लाख,येरफळे ते लुगडेवाडी रस्ता ग्रामा 113 खडीकरण डांबरीकरण 20.00 लाख,दुधडेवाडी (काळगाव), रस्ता  खडीकरण,डांबरीकरण 15.00 लाख,कदमवाडी (मल्हारपेठ) पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 20.00 लाख, कोळेकरवाडी(डेरवण) पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण 35.00 लाख,मोरेवाडी (कुठरे) ता.पाटण पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 16.50 लाख,मान्याचीवाडी (मालदन) पोहोच रस्ता खडीकरण डांबरीकरण 35.00 लाख, कारळे विठ्ठलाई मंदिर ते सुतारवस्ती ते जि.प्र.प्राथमिक शाळा रस्ता खडीकरण डांबरीकरण 15.00 लाख,5054 इतर जिल्हा मार्ग दुरुस्ती अंतर्गत मोरगिरी आडदेव आंब्रुळे बेलवडे खुर्द सांगवड रस्ता इजिमा 135 रस्त्याची सुधारणा करणे भाग आडदेव ते आंब्रुळे रस्ता 38.00 लाख, मोरगिरी आडदेव आंब्रुळे बेलवडे खुर्द सांगवड रस्ता इजिमा 135 रस्त्याची सुधारणा करणे भाग बेलवडे ते नाडे ढेबेवाडी रस्ता 38.00 लाख, आवर्डे ते मुरुड रस्ता इजिमा 152 रस्त्याची सुधारणा करणे भाग आवर्डे ते मुरुड रस्ता 38.00 लाख, त्रिपुडी ते रामा 136 मुळगाव  नेरळे धावडे गोकूळ गुरेघर पाचगणी रस्ता इजिमा 136 भाग कवरवाडी ते नेरळे रस्ता सुधारणा 38.00 लाख, जनसुविधा योजनेतून नविन ग्रामपंचायत इमारत बांधणे अंतर्गत बनपेठवाडी  येथे  ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12.00 लाख, मुळगाव  येथे  ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12.00 लाख, भिलारवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12.00 लाख, ऊरुल येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12.00 लाख, सांगवड येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत 12.00 लाख,जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी सुधारणा कामांमध्ये आंबेवाडी (घोट) येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03.00 लाख, कातवडी स्मशानभूमी शेड 04.00लाख, बांबवडे येथे बौध्दवस्ती ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 04.00 लाख, हारुगडेवाडी (नाडोली) स्मशानभूमी रस्ता सुधारणा 04.00 लाख, दुटाळवाडी (नुने) स्मशानभूमी रस्ता सुधारणा 04.00 लाख, पांढरवाडी (तारळे) येथे स्मशानभूमी निवारा शेड 04.00 लाख, आडूळपेठ स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03.00 लाख, मान्याचीवाडी येथे स्मशानभूमी सुशोभिकरण 03.00 लाख, सोनवडे येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03.00 लाख, आवर्डे बौध्दवस्ती स्मशानभूमी शेड 04.00 लाख, जंगलवाडी (चाफळ) येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, टेळेवाडी येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, मणेरी येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, रिसवड येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, चाहूरवाडी (नाणेगाव) येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, पाचुपतेवाडी येथे स्मशानभूमी रस्ता सुधारणा 03.00 लाख, रोमनवाडी (येराड)येथे स्मशानभूमी शेड 04.00 लाख, गव्हाणवाडी येथे स्मशानभूमी निवारा शेड व संरक्षक भिंत 04.00 लाख, बेलदरे येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत व परिसर सुधारणा  03.00 लाख, आरेवाडी येथे स्मशानभूमी शेड 03.00 लाख, क वर्ग तिर्थक्षेत्र व यात्रास्थळ विकास योजनेअंतर्गत दौलतनगर येथील श्री गणेश मंदिर परिसरातील रस्ता सुधारणा 18.00 लाख,लघु पाट बंधारे विभागांतर्गत मरळोशी येथे शेतीसाठी आडवे पाट 11.83 लाख, पाडळोशी येथे वळण बंधारा दुरुस्ती व पाट  11.49 लाख, कडवे खुर्द येथे शेतीसाठी पाण्याचे आडवे पाट 10.32 लाख, गायमुखवाडी बांबवडे येथे शेतीसाठी पाण्याचे आडवा पाट 9.91 लाख, मसुगडेवाडी (पाडळोशी),ता.पाटण येथे साठवण हौद व पाण्याचा आडवा पाटाची दुरुस्ती 15.63 लाख, करपेवाडी  (काळगाव ),ता.पाटण येथे वळण बंधारा दुरुस्ती 9.67 लाख, येराड,ता.पाटण येथे फळबावी शेतीसाठी वितरण व्यवस्थेची  दुरुस्ती 9.98 लाख, मुरुड देवाचा माळ 110 येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, गणेवाडी ठोमसे 330 येथे अंगणवाडी इमारत 8.50लाख, काढणे 206 येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, धडामवाडी धजगाव येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, ऊरुल बौध्दवस्ती 335 येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, वेताळवाडी मातंगवस्ती 362येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, नावडी टाकी वस्ती 413 येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, विहे नंदिवाले समाज 343 येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख, काहिर येथे अंगणवाडी इमारत 8.50 लाख,अंगणवाडी इमारती दुरुस्ती अंतर्गत टेळेवाडी, मानेगाव, गोकूळ तर्फ पाटण, जुंगठी, बांबवडे, घोट, कुसवडे, वाजेगाव, शिरळ व काढोली येथील अंगणवाडी इमारती दुरुस्तीसाठी 07 लाख 92 हजार,नविन शाळा खोल्या इमारती बांधकामामध्ये बोर्गेवाडी (घोट) येथे दोन शाळा खोलींचे बांधकाम 17.92, हेळवाक शाळा खोलीचे बांधकाम 8.96 लाख, मरळोशी येथे शाळा खोलीचे बांधकाम 8.96 लाख, भरेवाडी (काळगाव) येथे शाळा खोलीचे बांधकाम 8.96 लाख, वस्ती साकुर्डी येथे शाळा खोलींचे बांधकाम 8.96 लाख, विशेष  घटक  साकव योजनेअंतर्गत येरफळे जोतिबा मंदिर ते स्मशानभूमी बौध्दवस्ती रस्त्यावर साकव 35.81 लाख, म्होप्रे येथे दलितवस्ती बेघरवसाहत येथील रस्त्यावरील ओढयावर साकव 50.00 लाख, तांबेवाडी(ठोमसे) ते मागासवर्गीयवस्ती रस्त्यावरील ओढयावर साकव 42.28 लाख, तामकडे येथे बौध्दवस्ती रस्त्यावर साकव 30.33 लाख तसेच नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत नाडे येथे मरळी येथे शेतकरी अद्यावत कृषी प्रशिक्षण केंद्रउभारण्याकरीता 100.00 लाख, नाडे येथे बहूउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्र, कृषी मॉल उभारणे 75.00 लाख असा एकूण 10 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.लवकरच या कामांच्या निवीदा प्रक्रिया झाल्यानंतर तातडीने ही कामे सुरु करणेसंदर्भात संबंधित विभागाचे अधिकारी यांना ना.शंभूराज देसाई यांनी सूचना केल्या असल्याचे कार्यालयाचेवतीने शेवटी प्रसिध्दी पत्रकांत सांगण्यात आले आहे.

Sunday 28 November 2021

तुम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे..!गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई. नाटोशी येथील विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 

दौलतनगर दि.28(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-केवळ १०२ मतदारांची निवडणूक जिंकून विधानसभा जिंकल्याचा आव आणून अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणं बरं नव्ह...अहो तुम्ही तर 'शाश्वती' नसणाऱ्या पिक्चरच्या ट्रेलरची भाषा करता.मात्र आम्ही तसला न चालणारा पिक्चर न दाखवणार नाही  तर तुम्हाला शोले सारखा 'सुपरहिट" पिक्चरच दाखवावाच लागेल असा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना लगावला .दरम्यान २०२४ च्या सुपरहिट पिक्चरच्या तयारी साठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे,असे आवाहन ही मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.

               नाटोशी,ता. पाटण येथे सन 2020-21 च्या अर्थसंकल्पातून मंजूर झालेल्या नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर विंग वाठार रस्ता आणि नाटोशी ते कुसरूंड रस्त्याची सुधारणा व टकलेवाडी मातंगवस्ती रस्ता कॉक्रटीकरण या कामांच्या भूमीपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुग्रा खोंदू, बशीर खोंदू, बबनराव भिसे,गणेश भिसे,भागोजीशेठ शेळके,नथुराम कुंभार, सरपंच अविनाश कुंभार,उपसरपंच उदय  देसाई, विष्णुपंत देसाई, रामभाऊ देसाई,विष्णू मोरे,संपतशेठ कोळेकर,विजय शिंदे,विजय देशमुख,आनंदा मोहिते,सुनील खामकर,मोहन पाटील,मधुकर शिंदे,चेतन देसाई यांचेसह यांची उपस्थिती होती.

            यावेळी ना.शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या रूपाने संयमी,दूरदृष्टी चे नेतृत्व लाभले आहे.म्हणूनच राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू झाले मात्र कोविड काळात  एक लाख कोटी रुपयाने राज्याचे आर्थिक उत्पन्न घटून ही  राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आर्थिक निधी कधीही कमी पडू दिला नाही.पाटण मतदारसंघात परिवर्तन कशाला म्हणतात हेच अजून कळले नाही हे तालुक्याचे दुर्दैव आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तालुक्यातील सोसायटींच्या एकूण १०२ मतांपैकी 58 मतदान मिळाले म्हणजे परिवर्तन झाले असा डोंगरा पिटनारे  विरोधक  आताच अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत.मतदार संघातील केवळ १०२ नव्हे तर तमाम जनतेने एकदा १५ हजार आणि दुसऱ्यांदा तब्बल १८ हजार मतांनी पराभव करून यांना अस्मान दाखवले हे विसरून सत्तेच्या माजाची आणि मस्तीची  भाषा करीत आहेत. आम्ही कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही आणि करायचाच असता तर निवडणूक काळांत तुम्ही तुमच्या मतदारांना कुठं पाठवले होते ,कुठल्या हॉटेलात राहत होता,कुठं कुठं फिरत होता हे काय आपणाला माहीत नव्हते काय?मला मतदारच मिळवायचे  असते तर मला काहीही अवघड गोष्ट नव्हती तिथं जाऊन सुद्धा मला ते मिळवता आले असते मात्र  आम्ही  कधीही सत्तेची  मस्ती  आणि गुर्मी दाखवली नाही आणि दाखवायचीच असती तर तुमची संपूर्ण कुंडली ही आम्ही मांडली असती.असे स्पष्ट करून मंत्री देसाई म्हणाले,21 वर्षे सत्ता असताना ही या  मोरणा,कोयना ,मल्हारपेठ भागावर सापत्न भावनेतून पाहिले आणि विकासकामांत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले मात्र विकास कामांत कधीही राजकारण आणू नये  उलट ज्यांना  लोकांनी निवडून देऊन आमदार केले आहे त्यांनी कोणताही राजकीय भेदभाव  न करता संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे ही त्या लोकप्रतिनिधींची  नैतिक जबाबदारी आहे अशी शिकवण आम्हाला लोकनेते बाळासाहेब देसाई  यांनी घालून दिली आहे.म्हणूनच २००४ नंतर आपण आमदार झाल्यानंतर पाटण मतदार संघात विकासकामांच्या कधीही असमतोल दिसला नाही आणि यापुढे दिसणार ही नाही,असे शेवटी त्यांनी सांगीतले.कार्यक्रमाचे प्रास्तावित बशीर खोंदू यांनी केले तर आभार ॲङमारुती देसाई मानले.यावेळी मोरणा विभागातील विविध गावचे सरपंच,उपसरपंच,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

चौकट: चर्चा तर होणारच..! 

जिल्हा निवडणुकीत पराजय आम्हाला दिसत होता मात्र……

उद्याचा निकाल काय लागणार आहे महाविकास आघाडी तयार करायची आहे,जिल्हा बँकेच्या एकत्र निर्णय घ्यायचा आहे असे राष्ट्रवादी पक्षाचे राज्यातील वरिष्ठ नेते सांगत होते मात्र शेवटच्या  क्षणापर्यंत आम्हाला अंधारात ठेवले आमची तीच काँग्रेसची अवस्था होती.याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे आणि पक्षप्रमुख आदेश येईल तो मानणारा मी शिवसैनिक आहे 

चौकट:माझ्या भोंग्याची इतकी भीती का वाटते?

माझ्या पक्षाने मला मंत्री केले दादा मग माझ्या मंत्रिपदाला आणि माझ्या गाडीच्या भोंग्याला  एवढे का घाबरतात हेच मला कळत नाही. अहो दादा, मी  गृहखात्याचा मंत्री आहे आणि या खात्याचा नियमच आहे भोंगा म्हणचे सायरन वाजला पाहिजे त्यामुळेच मी जेथे जातो तेथे गल्लीबोळात ही भोंगा वाजतोच.तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो हा भोंगा केवळ पाटण मतदार संघात वाजत नाही तर संपूर्ण राज्यभर माझा हा भोंगा वाजत असतो आणि त्याची जास्तच भीती वाटत असेल तर मंत्रिपद भोगलेल्या आपल्या दादांना एकदा तरी विचारा की कोणत्या खात्याला भोंगा असतो ते ? असा उपरोधक टोला गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी लगावला.

चौकट:आता सुपरहिट 'शोले'  दाखवणार………

मंत्री शंभुराज देसाई विरोधकांनी 'ट्रेलर' संदर्भात केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.यावेळी ते  म्हणाले,अहो तुम्ही तर ट्रेलर ची भाषा करता मात्र ट्रेलर हा केवळ वातावरण निर्मितीसाठी  दाखवतात  'ट्रेलर' नंतर सिनेमा चालेल की नाही याची शास्वती नसते  तो प्लॉप ही होतो मात्र आम्ही जो आता २०२४ मधील होणाऱ्या सिनेमाचे केवळ ट्रेलर न दाखवता तो 'शोले' सारखा 'सुपरहिट' पिक्चर असणार आहे. जो कायमस्वरूपी जनतेच्या स्मरणात राहील.त्यामुळे ट्रेलरची भाषा आमच्यापुढे करू नका असा टोला ही मंत्री देसाई यांनी लगावला.

 

Thursday 25 November 2021

पाटण मतदारसंघातील जनतेने सात वर्षापूर्वीच तुमचा आवाज बंद केल्याचे भान राखावे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे सत्यजित पाटणकर यांना प्रतिउत्तर.


दौलतनगर दि.25(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- मंत्री पदासाठी तेवढेच कर्तृत्व ही लागते आणि त्यासाठी जनतेत मिसळावे लागते,सर्व सामान्य जनतेची कामे तळमळीने करावी लागतात,त्याला कोणच्याही मेहरबानीची गरज लागत नाही. सातारा जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांना उठता बसता माझ्या मंत्री पदाची भीती का वाटते मला माहित नाही.मात्र मला मंत्री पद मेहरबानी वर मिळाल्याची भाषा करणारे सत्यजितसिंह आपल्यावर तर अनेक वर्षांपासून ज्या पक्षाची मेहरबानी आहे.मग  त्या मेहरबानी वर आपण आमदार का बनू शकला नाही ? तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने तुमची निष्क्रियता ओळखूनच धनशक्तीच्या जोरावरील तुमची सत्तेची मस्ती उतरवत आपल्याला घरी बसवले असून सात वर्षापूर्वीच तुमचा आवाज बंद केल्याचे भान राखावे,असे प्रति उत्तर गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिले.ते दौलतनगर ता.पाटण येथे पत्रकारांशी बोलत होते.

               ना.शंभूराज देसाई म्हणाले की, ज्यांनी आजपर्यंत वर्षानुवर्षे जिल्हा बँकेचे संचालक पद  घेऊन ही केवळ हाताची घडी आणि तोंडावर  बोट ठेवून पाटण तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील  शेतकऱ्यांचे नुकसान केले आणि आता घराणे शाहीने पुन्हा त्याच पदावर मुलाला बसवून पुन्हा मागचे तेच पुढे होणार आहे.त्यामुळे आमच्या मंत्रिपदाची जास्त काळजी तुम्ही करण्याची गरज नाही.मंत्री पद हे पैशाचा माज दाखवून कधी मिळत नाही ते मिळविण्यासाठी जनतेचे प्रेम,कर्तृत्व आणि पक्षावरील निष्ठा लागते आणि याची माहिती आपण आपल्या वडिलांकडून घेतली असती तर अधिक बरे झाले असते.मात्र अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांना काय समजणार असा सवाल करून मंत्री देसाई म्हणाले,राज्यातील आघाडी सरकार हे  तिन्ही पक्षांचे सरकार आहे हे केवळ एका पक्षाचे सरकार नाही याचे भान ठेवून आपली वक्तव्ये करावीत आणि मगच कुणाच्या मेहरबानीवर कुणाला मंत्रीपदे मिळाली असली बेताल वक्तव्ये करावीत. जिल्हा बँकेची केवळ १०२ मतदारांची निवडणूक जिंकली म्हणून आपण पाटण मतदार संघातील सर्वसामान्य जनतेची निवडणूक जिंकली  नाही. त्यामुळे आपला आत्ताच इतका थयथयाट बरा नाही. अजून बऱ्याच निवडणुका व्हायच्या आहेत.तालुक्यातील निवडणुका आमच्यासाठी काही नविन नाहीत.आम्हीही या निवडणुकांमध्ये तुमच्याशी दोन हात करायला माझ्या कार्यकर्त्यांसह तयार असल्याचे सांगत ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले,पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाची निष्ठा सोयीनुसार गुंडळून ठेवणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकविण्याची गरज नाही. तसेच जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये आतापर्यंत तुम्ही कोणा-कोणाला खुणावले हे ही तालुक्याने पाहिले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयाची खात्री असताना मग तुम्ही ते मतदार एक महिनाभर वेग-वेगळया ठिकाणी का फिरवत होता.त्यांना दिपावलीसारखा मोठा सण असतानाही कुटुंबियांसमवेत न ठेवता त्यांच्या हातामध्ये गंडेदोरे का बांधले हेही जनतेला सांगीतले तर बर होईल.त्यामुळे केवळ 14 मते घेऊन विजयाने हुरळून गेलेल्या सत्यजितसिंह यांना माझ्या मंत्री पदाचा राजीनामा मागण्या एवढी आपली राजकीय उंची तरी आहे का ? असा हल्लाबोल मंत्री देसाई यांनी केला.सर्व सामान्य जनता ही कोणा बरोबर आहे हे नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.त्यामुळे ते तुम्ही वेगळे सांगण्याची गरज नसून लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सामान्य जनतेची कामे करण्याची मी सक्षम असून तुमच्या निष्क्रीयतेमुळेच तुम्हाला घरी बसविले असल्याने तुम्ही जनतेच्या प्रश्नांचा उसना कळवळा आणू नका.लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करण्यासाठी आम्हीच खंबीर आहोत,असे स्पष्ट करून मंत्री देसाई म्हणाले,मी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एक जबाबदार राज्यमंत्री आहे. शिवसेना या पक्षाचे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व  राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळात करतो. त्यामुळे मला माझ्या पक्षाबरोबर आणि पक्षप्रमुख यांच्याबरोबर वरिष्ठ पातळीवर चर्चा कराव्या लागतात आणि त्या मी करणारच आहे.त्याबद्दल आपणाला  नाक खुपसण्याची  गरज नाही आणि आपली तेवढी राजकीय उंची  नाही. माझे राज्यातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी आपुलकीचे संबंध आहेत आपण पाच वर्षातून केवळ निवडणुकीपूरतेच वाडयातून बाहेर पडता हे ही जनतेलाही माहीत आहे त्यामुळे आपणाला वाड्याबाहेरील संबंध कसे जपतात याची कल्पना काय असणार त्यामुळे इतरांच्या बरोबर असलेली आपुलकी, जिव्हाळ्याचे संबंध आणि घरोबा यातला फरक आपणाला काय कळणार? असा खोचक टोला ही त्यांनी सत्यजितसिंह यांना केला.तसेच दोन हात करण्याची भाषा आम्हाला करू नये,आम्हीही यापुढे जशास तसे उत्तर द्यायला नेहमीच तयार आहे.असा इशाराही ही शेवटी मंत्री देसाई यांनी शेवटी दिला.


Tuesday 23 November 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नातून नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडून पाटण नगरपंचायतीकरीता 05 कोटींचा निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.23 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण या तालुक्याच्या ठिकाणी  नगरपंचायतीच्या  क्षेत्रामध्ये  आवश्यक असणाऱ्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेकडे 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला होता.गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधा पुरविण्याच्या  विविध विकास कामांना 05 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पारीत केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधांची अनेक कामे गेली अनेक वर्ष प्रलंबित असल्याने येथील नागरीकांची मोठी गैरसोय होत होती. तसेच पाटण शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सदरची नागरी सुविधांची कामे मंजूर होण्यासाठी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केली होती.ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधांचे  विविध विकास कामासाठी राज्याचे नगरविकास विभागाने 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय पारित केला आहे.या शासन निर्णयानुसार पाटण नगरपंचायती अंतर्गत पुढीलप्रमाणे असणाऱ्या विविध विकास कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये पाटण नगरपंचायत येथे साठवण टाकीसह जलशुध्दीकरण प्रकल्प  100 लाख,रामापूर पाटण प्रभाग क्र. 14 येथे शादीखाना इमारत 50 लाख,झेंडा चौक,लायब्री चौक ते स्टेट बँकेपर्यंतचा मुख्य रस्ता डांबरीकरण 25 लाख,प्रभाग क्र. 1 राजेंद्र जाधव यांचे घरापासून पिंटू गुरव यांचे घरापर्यंतचा 200 मी. रस्ता 10 लाख,प्रभाग क्र. 2 जयवंतराव लुगडे यांचे घरापासून विठ्ठल मंदीरापर्यंत तसेच सागर माने यांचे घरापासून निनाई मंदिरापर्यंत 400 मी. रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,प्रभाग क्र. 2 विठ्ठलनगर येथील श्री. महादेव जाधव यांचे घरापासून परशुराम निवास पर्यंत रस्ता व आर.सी.सी.गटर बांधकाम व प्रभाग क्र. 3 राजेंद्र झुंजार यांचे घरापासून निनाई मंदिरापर्यंत आर.सी.सी.गटर 125 मी. बांधकाम 15 लाख,प्रभाग क्र. 05 अभिजीत खांडके यांचे घरापासून ते अरुण गोसावी यांचे घरापर्यंत रस्ता  काँक्रीटीकरण व प्रभाग क्र. 11  अभिजीत यादव घर ते निलेश गायकवाड घरापर्यंतचा अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण  16 लाख,प्रभाग क्र. 13  मुळगाव पुल ते झेंडा चौक रस्त्यावरील साकव 40 लाख,प्रभाग क्र. 13  मुळगाव पुल ते झेंडा चौक रस्ता डांबरीकरण 10 लाख,प्रभाग क्र. 15 रेव्हिन्यू कॉलनी येथील नामदेवराव झगडे यांचे घर ते सुनिल पानस्कर यांचे घरापर्यंत दोन्ही रस्त्यास सिमेंट काँक्रीट रस्ता,आर.सी.सी.गटर 15 लाख,प्रभाग क्र. 15 रेव्हिन्यू कॉलनी येथील महेश साळुंखे यांचे घर ते किर्पेकर यांचे घरापर्यंत रस्त्याच्या दोन्हीही बाजूस आर.सी.सी.गटर बांधकाम व प्रभाग क्र. 15 मोरे यांचे घरापासून श्री केळकर यांचे घरापर्यंत रस्ता 100 मी. सिमेंट काँक्रीटीकरण 17 लाख,प्रभाग क्र. 15  रेव्हयूनी गणेश मंदिर परिसरामधील जागेमध्ये उद्यान व परिसर सुधारणा व प्रभाग क्र. 16 लक्ष्मण कांबळे यांचे घरापासून गणपत कांबळे यांचे घरापर्यंत रस्ता 150 मी. सिमेंट काँक्रीटीकरण 23 लाख,प्रभाग क्र. 17 मारुती मंदिरासमोर ते दर्गापर्यंत रस्ता डांबरीकरण 15 लाख,प्रभाग क्र. 17 जहांगिर शेख यांचे घर ते मुस्लिम दर्गापर्यंत पर्यंत आर.सी.सी.गटर बांधकाम व प्रभाग क्र. 17 महबूब शेख यांचे घरापासून ते माधव भिसे यांचे घरापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण 17 लाख,प्रभाग क्र. 17 पिरजादे यांचे घरापासून ते कोयना नदीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण 10 लाख,प्रभाग क्र. 17 विष्णू लोहार यांचे घरापासून बापूराव बंडलकर यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व आर.सी.सी. गटर 15 लाख,प्रभाग क्र. 17 मुस्लिम दर्गा परिसर सुशोभिकरण व पथदिवे  व प्रभाग क्र. 17  मध्ये रामोशी समाज लादीकरण 17 लाख,प्रभाग क्र. 16 मारुती मंदिर ते शासकीय विश्रामगृह पर्यंतचा रस्ता सुधारणा 20 लाख,प्रभाग क्र. 14 मारुती मंदिर सार्वजनिक सभागृह परिसराचे सुशोभिकरण 20 लाख,प्रभाग क्र. 03 परशूराम बिल्डिंग ते प्रदिपू साळूंखे घर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण 20 लाख,प्रभाग क्र. 03 अवघडे घर ते कुंभार सर घर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण 15 लाख,प्रभाग क्र. 17 कराड चिपळूण रस्ता ते कोयना नदीपर्यंत कुरण रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख असा एकूण 05 कोटींचा निधी नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे..राज्याचे नगरविकास विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पाटण नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये नागरी सुविधा पुरविण्याच्या कामांना भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल ना.शंभूराज देसाई यांनी आभार मानले.लवकरच या मंजूर कामांची निविदा प्रक्रीया होऊन तातडीने हि कामे मार्गी लागणार असल्याचे शेवठी पत्रकात म्हटले आहे.

Saturday 20 November 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांच्या स्वप्नातील तालुका घडविण्यासाठी प्रयत्नशील- नामदार शंभूराज देसाई स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांचा ७8 व्या जयंती सोहळा संपन्न.

 


दौलतनगर दि.20(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण तालुक्यात अत्यंत  प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्व.शिवाजीराव देसाई आबासाहेब यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई  कारखान्याची उभारणी केली. कारखाना उभा करीत असताना अनेक संकटे आली. यातील काही संकटे ही नैसर्गिक तर काही संकटे ही मानवनिर्मित होती. त्या सर्व संकटांना  न डगमगता धाडसाने जिद्दीने सामोरं जात  साखर कारखान्याची जबाबदारी  त्यांनी लिलया पेलली. आणि मुदतपूर्व कारखाना उभा केला. त्यामुळे मरळीचा माळरान परिसर हा विकसित झालेला दिसतो. त्या पाठीमागे लोकनेते बाळासाहेब देसाई आणि कै.शिवाजीराव देसाई यांच्या विचारांची  प्रेरणा आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री म्हणून  लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्नातील तालुका घडविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असून पाटण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण  विकास करण्याचा आपला प्रयत्न असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दिली.

             दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे  8 वा जयंती सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते मा.यशराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील, ॲड.डी.पी.जाधव,प्रकाशराव जाधव,बबनराव भिसे,गजानन जाधव,शंकर शेजवळ,आनंदराव चव्हाण,संपतराव सत्रे, अशोकराव डिगे,बाळासो पाटील,नामदेवराव साळूंखे,विजय शिंदे, सुरेश पानस्कर,अभिजित पाटील,संजय देशमुख,बशीर खोंदू, सौ.दिपाली पाटील,सौ.विश्रांती जंबुरे,या प्रमुख मान्यवरांसह कारखान्याचे संचालक मंडळ,पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी नामदार शंभूराज देसाई यांनी आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई, स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

              गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई याप्रसंगी म्हणाले की,  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शब्दा खातर मरळीच्या माळरानावर  साखर कारखाना  उभा करण्याची  जबाबदारी कै.आबासाहेब  यांनी  लिलया पार  पाडली. आबासाहेबांनी  केलेल्या  या महत्त्व पूर्ण कार्याचे  ऋृण  तालुक्यातील  तुम्हा शेतक-यांना कधीही  विसरता येणारे नाही.मरळीच्या माळरानावर सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर आज पाटण तालुक्यातील शेतक-यांची  आणि  या विभागाची परिस्थिती काय असती याचा ही सारासार विचार करणे गरजचे आहे. मरळीचे  माळरान दौलतनगर परिसर म्हणून विकसित झालेला दिसतो आहे.त्या पाठिमागे लोकनेते बाळासाहेब देसाई आणि कै.शिवाजीराव देसाई यांची प्रेरणा आहे.प्रसिध्द पर्यटन स्थळ म्हणून  हा परिसर नावारूपाला येताना दिसत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, पाटण  विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मला मिळाली. ५० वर्षानंतर मंत्री पद देसाई घराण्यात आले.मिळालेल्या सत्तेचा उपयोग हा प्रथम आपल्या मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी झाला पाहिजे. दुर्गम आणि डोंगरी असलेला हा विधानसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत रोल मॉडेल करण्याचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून लोकनेते बाळासाहेब देसाई आणि कै.शिवाजीराव देसाई या दोन नेत्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यता उतरण्याचे काम केले.राजकीय जीवनामध्ये काम करत असताना चढ उतार असतात. आमदारकी मिळवण्यासाठी आपल्याला २१ वर्ष संघर्ष करावा लागला. मोठ्या राजकीय ताकदीच्या आणि सत्तेच्या विरोधात २००४ साली सामान्य जनतेने परिवर्तन केले. आणि आमदारकी आपल्या ताब्यात आली.त्या माध्यमातून विकासाची कामे करण्यासाठी आपण कधीच कमी पडलो नाही. राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री म्हणून  सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगत लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्नातील तालुका घडविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे शेवटी ते म्हणाले.