Saturday 20 November 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांच्या स्वप्नातील तालुका घडविण्यासाठी प्रयत्नशील- नामदार शंभूराज देसाई स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब)यांचा ७8 व्या जयंती सोहळा संपन्न.

 


दौलतनगर दि.20(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण तालुक्यात अत्यंत  प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्व.शिवाजीराव देसाई आबासाहेब यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई  कारखान्याची उभारणी केली. कारखाना उभा करीत असताना अनेक संकटे आली. यातील काही संकटे ही नैसर्गिक तर काही संकटे ही मानवनिर्मित होती. त्या सर्व संकटांना  न डगमगता धाडसाने जिद्दीने सामोरं जात  साखर कारखान्याची जबाबदारी  त्यांनी लिलया पेलली. आणि मुदतपूर्व कारखाना उभा केला. त्यामुळे मरळीचा माळरान परिसर हा विकसित झालेला दिसतो. त्या पाठीमागे लोकनेते बाळासाहेब देसाई आणि कै.शिवाजीराव देसाई यांच्या विचारांची  प्रेरणा आहे. राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री म्हणून  लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्नातील तालुका घडविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असून पाटण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण  विकास करण्याचा आपला प्रयत्न असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दिली.

             दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे  8 वा जयंती सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई,युवा नेते मा.यशराज देसाई,कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील, ॲड.डी.पी.जाधव,प्रकाशराव जाधव,बबनराव भिसे,गजानन जाधव,शंकर शेजवळ,आनंदराव चव्हाण,संपतराव सत्रे, अशोकराव डिगे,बाळासो पाटील,नामदेवराव साळूंखे,विजय शिंदे, सुरेश पानस्कर,अभिजित पाटील,संजय देशमुख,बशीर खोंदू, सौ.दिपाली पाटील,सौ.विश्रांती जंबुरे,या प्रमुख मान्यवरांसह कारखान्याचे संचालक मंडळ,पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी नामदार शंभूराज देसाई यांनी आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई, स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधी व पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

              गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई याप्रसंगी म्हणाले की,  लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शब्दा खातर मरळीच्या माळरानावर  साखर कारखाना  उभा करण्याची  जबाबदारी कै.आबासाहेब  यांनी  लिलया पार  पाडली. आबासाहेबांनी  केलेल्या  या महत्त्व पूर्ण कार्याचे  ऋृण  तालुक्यातील  तुम्हा शेतक-यांना कधीही  विसरता येणारे नाही.मरळीच्या माळरानावर सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली नसती तर आज पाटण तालुक्यातील शेतक-यांची  आणि  या विभागाची परिस्थिती काय असती याचा ही सारासार विचार करणे गरजचे आहे. मरळीचे  माळरान दौलतनगर परिसर म्हणून विकसित झालेला दिसतो आहे.त्या पाठिमागे लोकनेते बाळासाहेब देसाई आणि कै.शिवाजीराव देसाई यांची प्रेरणा आहे.प्रसिध्द पर्यटन स्थळ म्हणून  हा परिसर नावारूपाला येताना दिसत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, पाटण  विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा आमदार होण्याची संधी मला मिळाली. ५० वर्षानंतर मंत्री पद देसाई घराण्यात आले.मिळालेल्या सत्तेचा उपयोग हा प्रथम आपल्या मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी झाला पाहिजे. दुर्गम आणि डोंगरी असलेला हा विधानसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत रोल मॉडेल करण्याचा प्रयत्न आहे. त्या माध्यमातून लोकनेते बाळासाहेब देसाई आणि कै.शिवाजीराव देसाई या दोन नेत्यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यता उतरण्याचे काम केले.राजकीय जीवनामध्ये काम करत असताना चढ उतार असतात. आमदारकी मिळवण्यासाठी आपल्याला २१ वर्ष संघर्ष करावा लागला. मोठ्या राजकीय ताकदीच्या आणि सत्तेच्या विरोधात २००४ साली सामान्य जनतेने परिवर्तन केले. आणि आमदारकी आपल्या ताब्यात आली.त्या माध्यमातून विकासाची कामे करण्यासाठी आपण कधीच कमी पडलो नाही. राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री म्हणून  सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगत लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे स्वप्नातील तालुका घडविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे शेवटी ते म्हणाले.

No comments:

Post a Comment