Tuesday 23 November 2021

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नातून नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांचेकडून पाटण नगरपंचायतीकरीता 05 कोटींचा निधी मंजूर.

 

दौलतनगर दि.23 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण या तालुक्याच्या ठिकाणी  नगरपंचायतीच्या  क्षेत्रामध्ये  आवश्यक असणाऱ्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचेकडे 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा केला होता.गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधा पुरविण्याच्या  विविध विकास कामांना 05 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने पारीत केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधांची अनेक कामे गेली अनेक वर्ष प्रलंबित असल्याने येथील नागरीकांची मोठी गैरसोय होत होती. तसेच पाटण शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सदरची नागरी सुविधांची कामे मंजूर होण्यासाठी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी नगरविकास मंत्री ना.एकनाथजी शिंदे यांचेकडे शिफारस केली होती.ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण नगरपंचायतीचे क्षेत्रामध्ये नागरी सुविधांचे  विविध विकास कामासाठी राज्याचे नगरविकास विभागाने 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय पारित केला आहे.या शासन निर्णयानुसार पाटण नगरपंचायती अंतर्गत पुढीलप्रमाणे असणाऱ्या विविध विकास कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये पाटण नगरपंचायत येथे साठवण टाकीसह जलशुध्दीकरण प्रकल्प  100 लाख,रामापूर पाटण प्रभाग क्र. 14 येथे शादीखाना इमारत 50 लाख,झेंडा चौक,लायब्री चौक ते स्टेट बँकेपर्यंतचा मुख्य रस्ता डांबरीकरण 25 लाख,प्रभाग क्र. 1 राजेंद्र जाधव यांचे घरापासून पिंटू गुरव यांचे घरापर्यंतचा 200 मी. रस्ता 10 लाख,प्रभाग क्र. 2 जयवंतराव लुगडे यांचे घरापासून विठ्ठल मंदीरापर्यंत तसेच सागर माने यांचे घरापासून निनाई मंदिरापर्यंत 400 मी. रस्ता खडीकरण,डांबरीकरण 15 लाख,प्रभाग क्र. 2 विठ्ठलनगर येथील श्री. महादेव जाधव यांचे घरापासून परशुराम निवास पर्यंत रस्ता व आर.सी.सी.गटर बांधकाम व प्रभाग क्र. 3 राजेंद्र झुंजार यांचे घरापासून निनाई मंदिरापर्यंत आर.सी.सी.गटर 125 मी. बांधकाम 15 लाख,प्रभाग क्र. 05 अभिजीत खांडके यांचे घरापासून ते अरुण गोसावी यांचे घरापर्यंत रस्ता  काँक्रीटीकरण व प्रभाग क्र. 11  अभिजीत यादव घर ते निलेश गायकवाड घरापर्यंतचा अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण  16 लाख,प्रभाग क्र. 13  मुळगाव पुल ते झेंडा चौक रस्त्यावरील साकव 40 लाख,प्रभाग क्र. 13  मुळगाव पुल ते झेंडा चौक रस्ता डांबरीकरण 10 लाख,प्रभाग क्र. 15 रेव्हिन्यू कॉलनी येथील नामदेवराव झगडे यांचे घर ते सुनिल पानस्कर यांचे घरापर्यंत दोन्ही रस्त्यास सिमेंट काँक्रीट रस्ता,आर.सी.सी.गटर 15 लाख,प्रभाग क्र. 15 रेव्हिन्यू कॉलनी येथील महेश साळुंखे यांचे घर ते किर्पेकर यांचे घरापर्यंत रस्त्याच्या दोन्हीही बाजूस आर.सी.सी.गटर बांधकाम व प्रभाग क्र. 15 मोरे यांचे घरापासून श्री केळकर यांचे घरापर्यंत रस्ता 100 मी. सिमेंट काँक्रीटीकरण 17 लाख,प्रभाग क्र. 15  रेव्हयूनी गणेश मंदिर परिसरामधील जागेमध्ये उद्यान व परिसर सुधारणा व प्रभाग क्र. 16 लक्ष्मण कांबळे यांचे घरापासून गणपत कांबळे यांचे घरापर्यंत रस्ता 150 मी. सिमेंट काँक्रीटीकरण 23 लाख,प्रभाग क्र. 17 मारुती मंदिरासमोर ते दर्गापर्यंत रस्ता डांबरीकरण 15 लाख,प्रभाग क्र. 17 जहांगिर शेख यांचे घर ते मुस्लिम दर्गापर्यंत पर्यंत आर.सी.सी.गटर बांधकाम व प्रभाग क्र. 17 महबूब शेख यांचे घरापासून ते माधव भिसे यांचे घरापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण 17 लाख,प्रभाग क्र. 17 पिरजादे यांचे घरापासून ते कोयना नदीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण 10 लाख,प्रभाग क्र. 17 विष्णू लोहार यांचे घरापासून बापूराव बंडलकर यांचे घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व आर.सी.सी. गटर 15 लाख,प्रभाग क्र. 17 मुस्लिम दर्गा परिसर सुशोभिकरण व पथदिवे  व प्रभाग क्र. 17  मध्ये रामोशी समाज लादीकरण 17 लाख,प्रभाग क्र. 16 मारुती मंदिर ते शासकीय विश्रामगृह पर्यंतचा रस्ता सुधारणा 20 लाख,प्रभाग क्र. 14 मारुती मंदिर सार्वजनिक सभागृह परिसराचे सुशोभिकरण 20 लाख,प्रभाग क्र. 03 परशूराम बिल्डिंग ते प्रदिपू साळूंखे घर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण 20 लाख,प्रभाग क्र. 03 अवघडे घर ते कुंभार सर घर रस्ता सिमेंट काँक्रीटीकरण 15 लाख,प्रभाग क्र. 17 कराड चिपळूण रस्ता ते कोयना नदीपर्यंत कुरण रस्ता खडीकरण डांबरीकरण 15 लाख असा एकूण 05 कोटींचा निधी नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे..राज्याचे नगरविकास विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी पाटण नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये नागरी सुविधा पुरविण्याच्या कामांना भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल ना.शंभूराज देसाई यांनी आभार मानले.लवकरच या मंजूर कामांची निविदा प्रक्रीया होऊन तातडीने हि कामे मार्गी लागणार असल्याचे शेवठी पत्रकात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment