दौलतनगर दि.25(जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- मंत्री पदासाठी तेवढेच कर्तृत्व ही लागते आणि त्यासाठी
जनतेत मिसळावे लागते,सर्व सामान्य जनतेची कामे तळमळीने करावी लागतात,त्याला
कोणच्याही मेहरबानीची गरज लागत नाही. सातारा जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक
सत्यजितसिंह पाटणकर यांना उठता बसता माझ्या मंत्री पदाची भीती का वाटते मला माहित
नाही.मात्र मला मंत्री पद मेहरबानी वर मिळाल्याची भाषा करणारे सत्यजितसिंह
आपल्यावर तर अनेक वर्षांपासून ज्या पक्षाची मेहरबानी आहे.मग त्या मेहरबानी वर आपण आमदार का बनू शकला नाही ? तालुक्यातील सर्वसामान्य
जनतेने तुमची निष्क्रियता ओळखूनच धनशक्तीच्या जोरावरील तुमची सत्तेची मस्ती उतरवत आपल्याला
घरी बसवले असून सात वर्षापूर्वीच तुमचा आवाज बंद केल्याचे भान राखावे,असे प्रति उत्तर
गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी दिले.ते दौलतनगर ता.पाटण येथे पत्रकारांशी
बोलत होते.
ना.शंभूराज
देसाई म्हणाले की, ज्यांनी आजपर्यंत वर्षानुवर्षे जिल्हा बँकेचे संचालक पद घेऊन ही केवळ हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून पाटण तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान केले आणि आता घराणे शाहीने पुन्हा त्याच पदावर
मुलाला बसवून पुन्हा मागचे तेच पुढे होणार आहे.त्यामुळे आमच्या मंत्रिपदाची जास्त
काळजी तुम्ही करण्याची गरज नाही.मंत्री पद हे पैशाचा माज दाखवून कधी मिळत नाही ते
मिळविण्यासाठी जनतेचे प्रेम,कर्तृत्व आणि पक्षावरील निष्ठा लागते आणि याची माहिती
आपण आपल्या वडिलांकडून घेतली असती तर अधिक बरे झाले असते.मात्र अर्ध्या हळकुंडाने
पिवळे होणाऱ्यांना काय समजणार असा सवाल करून मंत्री देसाई म्हणाले,राज्यातील आघाडी
सरकार हे तिन्ही पक्षांचे सरकार
आहे हे केवळ एका पक्षाचे सरकार नाही याचे भान ठेवून आपली वक्तव्ये करावीत आणि मगच
कुणाच्या मेहरबानीवर कुणाला मंत्रीपदे मिळाली असली बेताल वक्तव्ये करावीत. जिल्हा
बँकेची केवळ १०२ मतदारांची निवडणूक जिंकली म्हणून आपण पाटण मतदार संघातील
सर्वसामान्य जनतेची निवडणूक जिंकली नाही. त्यामुळे आपला आत्ताच इतका थयथयाट बरा नाही. अजून बऱ्याच
निवडणुका व्हायच्या आहेत.तालुक्यातील निवडणुका आमच्यासाठी काही नविन नाहीत.आम्हीही
या निवडणुकांमध्ये तुमच्याशी दोन हात करायला माझ्या कार्यकर्त्यांसह तयार असल्याचे
सांगत ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले,पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाची
निष्ठा सोयीनुसार गुंडळून ठेवणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकविण्याची गरज नाही. तसेच
जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये आतापर्यंत तुम्ही कोणा-कोणाला खुणावले हे
ही तालुक्याने पाहिले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत विजयाची खात्री
असताना मग तुम्ही ते मतदार एक महिनाभर वेग-वेगळया ठिकाणी का फिरवत होता.त्यांना
दिपावलीसारखा मोठा सण असतानाही कुटुंबियांसमवेत न ठेवता त्यांच्या हातामध्ये
गंडेदोरे का बांधले हेही जनतेला सांगीतले तर बर होईल.त्यामुळे केवळ 14 मते घेऊन
विजयाने हुरळून गेलेल्या सत्यजितसिंह यांना माझ्या मंत्री पदाचा राजीनामा मागण्या
एवढी आपली राजकीय उंची तरी आहे का ? असा हल्लाबोल मंत्री देसाई यांनी केला.सर्व
सामान्य जनता ही कोणा बरोबर आहे हे नुकतेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या
निकालावरुन स्पष्ट झाले आहे.त्यामुळे ते तुम्ही वेगळे सांगण्याची गरज नसून
लोकप्रतिनिधी म्हणून सर्व सामान्य जनतेची कामे करण्याची मी सक्षम असून तुमच्या
निष्क्रीयतेमुळेच तुम्हाला घरी बसविले असल्याने तुम्ही जनतेच्या प्रश्नांचा उसना
कळवळा आणू नका.लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करण्यासाठी आम्हीच खंबीर आहोत,असे
स्पष्ट करून मंत्री देसाई म्हणाले,मी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एक
जबाबदार राज्यमंत्री आहे. शिवसेना या पक्षाचे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली
मंत्रिमंडळात करतो. त्यामुळे मला माझ्या पक्षाबरोबर आणि पक्षप्रमुख यांच्याबरोबर
वरिष्ठ पातळीवर चर्चा कराव्या लागतात आणि त्या मी करणारच आहे.त्याबद्दल आपणाला नाक खुपसण्याची
गरज नाही आणि आपली तेवढी राजकीय उंची नाही. माझे राज्यातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी आपुलकीचे
संबंध आहेत आपण पाच वर्षातून केवळ निवडणुकीपूरतेच वाडयातून बाहेर पडता हे ही
जनतेलाही माहीत आहे त्यामुळे आपणाला वाड्याबाहेरील संबंध कसे जपतात याची कल्पना
काय असणार त्यामुळे इतरांच्या बरोबर असलेली आपुलकी, जिव्हाळ्याचे संबंध आणि घरोबा
यातला फरक आपणाला काय कळणार? असा खोचक टोला ही त्यांनी सत्यजितसिंह यांना
केला.तसेच दोन हात करण्याची भाषा आम्हाला करू नये,आम्हीही यापुढे जशास तसे उत्तर
द्यायला नेहमीच तयार आहे.असा इशाराही ही शेवटी मंत्री देसाई यांनी शेवटी दिला.
Yalach mhanatat Patan cha Dhanya Wagh .We proud of you Dada .
ReplyDeleteOnly Saheb7070
ReplyDeleteपाटण तालुक्यातील एकच आमदार .व. ग्रूहराज राज्य मंत्री
ReplyDeleteशंभूराज देसाई .