दौलतनगर दि.12 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :- लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रगती साठी
पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील विध्यार्थी यांच्या
प्रगतीसाठी स्वर्गीय आबासाहेब यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी घालून दिलेल्या
आदर्श विचारां च्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपण सदैव
प्रयतशील आहे.दरम्यान पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखान्याला भविष्यात ही जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी राज्य शासन कटीबद्द
असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह आणि
वित्त राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.
ते लोकनेते
बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देसाई
यांच्या ३५ वा पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे
अध्यक्ष रविराज देसाई,यशराज देसाई,जयराज देसाई,देसाई कारखान्याचे चेअरमन अशोकराव
पाटील, माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या सुग्रा खोंदू,ॲङ डी.पी.जाधव, जिल्हा
परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,पंजाबराव देसाई,संजय गांधी निराधार
येाजना समितीचे अध्यक्ष भरत साळूंखे,
शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड. मिलिंद पाटील,अभिजित पाटील,बबनराव शिंदे, माणिक पवार, माजी
सदस्य राजेंद्र चव्हाण,बबनराव शिंदे, नामदेवराव साळूंखे,जालिंदर पाटील,कारखान्याचे संचालक सोमनाथ खामकर, बबनराव भिसे, विजय जंबुरे, प्रांताधिकारी
श्रीरंग तांबे,तहसीलदार योगेश टोमपे,गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
मंत्री ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांनी कारखाना चालवीत
असताना शिक्षण समूहाचे छोटेसे रोपटे उभे केले आज याच रोपट्याचे वटवृक्षा मध्ये
रूपांतर झाल्याने खऱ्या अर्थाने स्व आबासाहेबांचे पाटण तालुक्यातील सर्वसामान्य
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयीचे जपण्याचे पूर्णत्वास जात असल्याचे समाधान मिळत
आहे.या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी तालुक्यातील इयता १० वी १२ वी परीक्षेत प्रथम
द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित
करून विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते मात्र सध्या सलग दुसऱ्या वर्षी ही कोविड
संसर्ग परिस्थिती असल्यामुळे तालुक्यातील गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडित सुरू
असलेली ही परंपरा खंडित होऊन हा कार्यक्रम सध्या पद्धतीने साजरा करण्यात येत
आहे.मात्र कोविड परिस्थिती कमी झाल्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांना सन्मानित करणारा
हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.राज्यातील साखर कारखानदारी ही सध्या अडचणीत असून
कोविड काळामुळे केवळ साखर कारखानदारीच नव्हे तर राज्य आणि देश ही अडचणीतुन चालला
आहे.राज्याचा महसूल गतवर्षी पेक्षा या वर्षी तब्बल सव्वा लाख कोटी रुपयांनी कमी
असून त्यातच भर म्हणून राज्याचे ३२ हजार कोटी एवढी जीएसटी परताव्याची रक्कम ही
केंद्रशासनाकडून अद्याप येणे बाकी आहे. त्यामुळे सरकारची परिस्थिती तीच साखर
कारखानादारीची आहे.राज्यात साखरेचे प्रचंड साठे शिल्लक असताना राज्यात २० टक्के उसाची जादा लागण झाली आहे त्यामुळे राज्यातील
साखर कारखान्यापुढे मोठा प्रश्न उभा
राहिला आहे. तरीही युवा नेते यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याने
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेऊन अडचणीच्या काळात ही कामगारांना
कायम,हंगामी अशा ऑर्डर दिल्या ही कौतुकाची बाब आहे.लोकनेते देसाई कारखान्याची
राज्य शासनाकडून येणारी थकबाकी देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून या
कारखान्याच्या मदतीसाठी ही राज्यातील आघाडी शासन सदैव तयार असल्याची ग्वाही ही
मंत्री देसाई यांनी यावेळी दिली.
चौकट: ७३
कर्मचाऱ्यांना दिल्या ऑर्डर..!
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातील तब्बल ७३
अधिकारी कर्मचारी यांना प्रामाणिक,अखंडित आणि दिर्घकाल सेवा झालेबद्दल स्वर्गीय
शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताच्या पार्श्वभूमीवर कायम,हंगामी व कंत्राटी करण्यात आल्याची घोषणा युवा नेते यशराज
देसाई यांनी कार्यक्रमात जाहीर केले.यामध्ये ३८ कामगारांना हंगामी,९ कामगारांना
कायम आणि २१ कामगारांना कंत्राटी म्हणून ऑर्डर देण्यात आल्या.या सर्व कामगारांचे
मंत्री शंभुराज देसाई,यशराज देसाई,रविराज देसाई तसेच कामगार संघटचे
अध्यक्ष विजय मोरे यांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment