दौलतनगर दि.11 (जनसंपर्क
कक्ष,राज्यमंत्री कार्यालय) :-महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले
कोयना धरण व येथील निसर्ग सौंदर्य लाभलेल्या कोयनानगर,ता.पाटण हे राज्यातील एक प्रसिध्द
पर्यटनाचे ठिकाण असून कोयना धरणाचे पाणी साठयातून तयार करण्यात येणारी वीज ही संपूर्ण
महाराष्ट्राला पुरविण्यात येत असल्याने वीज निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या
कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासन गंभीर असून कोयना धरणाच्या सुरक्षेकामी
सध्या अस्तित्वात असलेल्या कोयना धरण परिसरातील आठ पोलीस चौक्यांची प्रत्यक्ष पाहणी
गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सर्व
अधिकाऱ्यांसमवेत केली.
यावेळी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या
समवेत शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, धोंडीराम भोमकर,अभिजित पाटील, बबनराव भिसे,उपविभागीय
अधिकारी श्रीरंग तांबे,प्र.उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजित पाटील, तहसिलदार योगेश टोमपे, कार्यकारी अभियंता कोयना धरणव्यवस्थापन
नितीन पोतदार, कोयनानगरचे सपोनि चंद्रकांत माळी यांची उपस्थिती होती.
पाटण तालुक्यातील कोयनानगर,ता.पाटण हे महाराष्ट्रातील एक प्रमुख् पर्यटन केंद्र
म्हणून प्रसिध्द असून महाराष्ट्रासह देशातून तसेच परदेशातून या ठिकाणी मोठया प्रमाणांत
पर्यटक हे दैनंदिन भेटी देत असतात. सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या कोयनानगर सह या परिसरातील
सुमारे 10 किलोमिटरच्या परिसरातील प्रमुख पर्यटन ठिकाणांचा पर्यटनाच्यादृष्टीने विकसित
करणेकरीताचा पर्यटन विकास आराखडा राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला असून प्रत्यक्ष या पर्यटन आराखडयांची कामे प्रगतीत असल्याने
येथील निसर्ग सौदर्यांमध्ये अधिकची भर पडत असल्याने कोयनानगर या पर्यटन ठिकाणाला भेट
देणाऱ्या पर्यटकांची संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी
असलेल्या कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासन हे गंभीर असून कोयना धरणाची सुरक्षाही
महत्त्वाची असल्याने कोयना धरण परिसरामध्ये कोयना धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने ठिक-ठिकाणी
आठ पोलीस चौक्यांची प्रत्यक्ष पाहणी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केली. सध्या
अस्तित्वात असलेल्या पोलीस चौक्यांच्या इमारती हा जुन्या असून त्या कालबाहय झालेल्या
आहेत. कोयनानगर येथे प्रतिवर्षी पावसाळयामध्ये मोठया प्रमाणांत पाऊस पडत असल्याने पोलीस
कर्मचारी व अधिकारी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोयना धरण परिसरातील
सुरक्षेच्यादृष्टीने उभारण्यात आलेले लोखंडी टेहाळणी मोर्चे हे जुने आहेत. कोयना धरणासाठी
चांगली सुरक्षा पुरविण्याच्यादृष्टीने पोलीस चौक्यांच्या इमारती व टेहाळणी मोर्चे यांची
तातडीने पुनर्बांधणी करणे गरजेचे असल्याने कोयना धरणाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत
महत्त्वाच्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेला अत्याधुनिक यंत्रणा पुरविण्यासह पोलीस चौक्यांची
पुनर्बांधणी करण्याकरीता तातडीने निधी मंजूर होण्याकरीता आवश्यक असलेला प्रस्ताव सादर
करण्यासाठी संबंधित जिल्हास्तरीय पोलीस अधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचे सांगून कोयना
धरणाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक यंत्रणा बसविण्याकरीता तसेच पोलीस
चौक्यांचे पुनर्बांधणीकरीता राज्यशासनाकडून निधी मंजूर होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर
संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन निधी मंजूर करणार असल्याचे ना.शंभूराज देसाई
यांनी सांगीतले.
चौकट :- कोयना धरणाच्या सुरक्षेकरीता
गृहराज्यमंत्री अलर्ट.
कोयना धरणाची सुरक्षा ही महत्त्वाची असल्याने गृहराज्यमंत्री
ना. शंभूराज देसाई यांनी काल पावसातही सर्व अधिकारी यांच्या समवेत सर्व पोलीस चौक्यांची
प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून असलेल्या
अडचणींची माहिती घेतली. त्यामुळे कोयना धरणाच्या सुरक्षेकरीता गृहराज्यमंत्री हे अलर्ट
असल्याची चर्चा परिसरात होती.
No comments:
Post a Comment