दौलतनगर दि.28(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण मतदारसंघात गत आठवडयात सलग दोन ते तीन पडलेल्या ढगफुटीसदृश्य
मुसळधार पावसामुळे मोठया प्रमाणांत नुकसान होऊन डोंगरी व दुर्गम भागातील कडा कोसळण्याची
शक्यत असलेल्या दरडप्रवण कोयना, मोरणा, ढेबेवाडी, काळगाव व तारळे विभागातील गावांना
तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.अतिवृष्टीमुळे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत
केलेल्या गावांतील कुटुंबांना शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्यामाध्यमातून पहिल्या
टप्प्यात तातडीने 4966 धान्यांचे किटचे जागेवर वाटप करुन संकटकाळी बाधित कुटुंबियांना
आधार देण्याचे काम केले असून अजूनही काही गावांना तातडीने मदत पोहाचविण्याच्यादृष्टीने
नियोजन सुरु आहे.
पाटण तालुक्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान
झाले. अतिवृष्टीमुळे डोंगर कपारीतील गावांवर डोंगराचा भाग कोसळून या गावांमधील कुटुंबे
बाधित झाली. दरडप्रवण धोकादायक स्थितीमध्ये असणाऱ्या कोयना, मोरणा, ढेबेवाडी, काळगाव
व तारळे विभागातील गावांमधील अनेक कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले
आहे. पाटण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने संपुर्ण जनजिवन विस्कळीत होऊन असुरक्षित
असलेल्या गावांना विविध ठिकाणी अचानक स्थलांरित करावे लागल्याने या स्थलांतरीत नागरीकांसमोर
अन्न धान्यासह, कपडे व इतर जिवनावश्यक वस्तूची तातडीची गरज लक्षात घेऊन स्थलांतरित
केलेल्या कुटुंबातील नागरीकांना मदतीचा हात देण्याकरीता तसेच बाधित कुटुंबांना मानसिक
आधार देण्याच्या हेतून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना शिवाजीराव देसाई चॅरिटेबल
ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यामधील आंबेघर तर्फ मरळी, मिरगाव कामरगाव, ढोकावळे, हुंबरळी,
वरसरकून बाजे,चोपडीवाडी डावरी, जितकरवाडी जिंती,भातडेवाडी जिंती,धनावडेवाडी निगडे,बागलेवाडी,
जुगाईवाडी, कडयाखालची बोर्गेवाडी, धडामवाडी धजगाव,दिक्षी, शिद्रुकवाडी,जोशेवाडी काळगाव,
म्हारवंड, नवजा, मानाईनगर, गोकूळनाला, डिचोली, पळासरी, खुडुपलेवाडी या बाधित गावांतील
गरजू कुटुंबांना पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 4966 धान्यांचे किटचे वाटप जागेवर जाऊन करण्यात आले.दरम्यान तालुक्यामध्ये
जस-जसे जनजिवन हळू-हळू पुर्वपदावर येत आहे,तसे नव्याने बाधित गावांची संख्या वाढू लागली
असून नव्याने बाधित गावातील कुटुंबांना आवश्यक असणाऱ्या संसार उपयोगी साहित्याची गरज
लक्षात घेऊन ब्लँकेट, चटई, साडया,टॉवेल,पाणी
बॉटल, फोम, कागद, आटा,धान्य साहित्याचे किट, तांदुळ, तुरडाळ, चहा पावडर, तेल, इ. संसार
उपयोगी साहित्याचे शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने तालुक्यातील बाधित कुटुंबापर्यंत
मदत पोहचविणार असल्याची ट्रस्टच्यावतीने माहिती देण्यात आली आहे.
Great work🙏🙏🙏
ReplyDelete