दौलतनगर दि.26(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गतवर्षीच्या गळीत हंगामापेक्षा या गळीत हंगामामध्ये ऊसाचे
प्रमाण जास्त आहे. त्यातच साखरेचे भाव यंदाच्या वर्षीही अनिश्चित असून सध्या
कोरोना संसर्गाच्या संकटामुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे अनेक कारखान्यांकडे मोठया
प्रमाणांत साखरेचे साठे पडून आहेत.त्याचबरोबर तोडणी व वाहतुक खर्चात मोठया
प्रमाणात वाढ झाली आहे.आपला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा
महाराष्ट्रातील असा कारखाना आहे जो अडचणीच्या काळातही महाराष्ट्र राज्याचे
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली साखर उद्योगामध्ये व्यवस्थितरित्या
सुरु आहे.कारखान्याने गतवर्षीचा गळीत हंगाम यापुर्वीच्या सर्वच गळीत हंगामाप्रमाणे
चांगल्या प्रकारे पुर्ण केला आहे. यंदाच्या गळीत हंगामातही कार्यक्षेत्रातील
जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे
उद्दीष्ट कारखान्याने ठेवून नियोजनबध्द काम करुन सन 2021-22 चा गळीत हंगामही
प्रतिवर्षाप्रमाणे यशस्वी करावा,असे आवाहन युवानेते यशराज देसाई यांनी केले.
दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात सन 2021-22 चे गळीत हंगामासाठी रोलरचे पूजन
युवानेते यशराज देसाई यांचे शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.प्रारंभी
रोलरचे पूजन झालेनंतर यशराज देसाई यांनी कारखान्यातील सर्व कामकाजाची पदाधिकारी
यांचेसोबत पाहणी केली.योवळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,
कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, संचालक आनंदराव चव्हाण, पांडूरंग
नलवडे,विकास गिरी गोसावी,शशिकांत निकम, सोमनाथ खामकर, वसंत कदम, गजानन जाधव, कार्यकारी
संचालक एस.एल.देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना यशराज देसाई पुढे
म्हणाले,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 चे गळीत हंगामात 02 लाख 33 हजार 326 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.91% सरासरी
साखर उताऱ्याने 02
लाख 78 हजार क्विंटल साखर उत्पादन केले असून सन 2020-21 च्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील गाळपास आलेल्या ऊसाला आतापर्यंत
एफआरपीच्याप्रमाणे प्रतिटन रुपये 2330 नुसार होणारे बिल ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांचे
बँक खाती यापुर्वीच अदा केले आहे. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यातील गळीत हंगाम पुर्व
कामे प्रगतीपथावर असून प्रतिवर्षाप्रमाणे सन 2021-22 च्या ऊस गाळप हंगामाकरीता जादा ऊस गाळपाच्यादृष्टीने कार्यक्षेत्रातील
जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट व नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.
गतवर्षीच्या सरासरी साखर उताऱ्यामध्ये यंदाच्या वर्षी वाढ करण्याचा मनोदय आमचा आहे
त्याला यश मिळेल असे सांगून ते म्हणाले,साखर उद्योग अडचणीत असताना देखील आपला देसाई
सह.साखर कारखाना चांगल्या प्रकारे सुरु आहे. तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील जास्तीत
जास्त ऊस गाळप करण्याचे आणि गाळप केलेल्या ऊसाला एफआरपीच्या धोरणानुसार ऊसदर देण्याचा
आपण नेहमीच प्रयत्न करीत आलो आहोत. यावर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाची
उपलब्धता चांगली राहणार असून शेतकऱ्यांचा आर्थिक विकासाचा कणा असलेल्या साखर कारखानदारीपुढे
आज सातत्याने कमी होणाऱ्या साखरेच्या दरामुळे तसेच कोरोना संसर्गाचे पार्श्वभूमीवर
शासकीय निर्बंधाचे पालन करीत सर्व उद्योगधंदे व व्यापारी बाजारपेठा ठराविक कालावधीतच
सुरु असल्याने आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील यावर मात करुन यंदाचा
गळीत हंगाम यशस्वी करणेकरीता सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. कारखान्यासमारे आर्थिक
अडचणी असतानाही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली नुकतेच आपण कारखान्यातील 73 कर्मचाऱ्यांना कायम,हंगामी
व कंत्राटी अशा पद्धतीच्या नेमणूकाही दिल्या आहेत. व्यवस्थापनाने ठरविलेल्या नियोजनाप्रमाणे
कारखान्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियोजनबध्द काम करावे.कारखाना कार्यक्षेत्रातील
ऊस पिकवणाऱ्या सभासद तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला पिकवलेला सर्व ऊस आपल्या कारखान्याला
देऊन सहकार्य करावे व येणारा गळीत हंगाम यशस्वी करावा,असे आवाहनही त्यांनी शेवटी बोलताना
केले.यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment