दौलतनगर दि.02
(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत अल्पशा
मतांनी झालेल्या पराभवाचे उट्टे
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखालील देसाई गटाच्या सर्वसामान्य
कार्यकर्त्यांनी काढले असून बँकेच्या पराभवानंतर चार विविध कार्यकारी सेवा
सोसायटीमध्ये सत्तांतर करीत चार सोसायटया मिळविण्यात देसाई गटाला यश प्राप्त झाले
आहे.सत्तातंराची ही परंपरा कायम ठेवत बहूतांशी सोसायटया देसाई गटाच्या ताब्यात
घेवून सोसायटीवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्याचा चंग देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी बांधला
आहे. चार सोसायटीमध्ये विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचा सत्कार आज गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंच्या हस्ते करण्यात आला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत अल्पशा मतांनी
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा झालेला पराभव देसाई गटाच्या कार्यकर्त्यांच्या
जिव्हारी लागला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये सोसायटयांच्या निवडणूकांमध्ये विजय
मिळविण्याकरीता देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनीच कंबर कसली असून याचा प्रत्यय
नुकत्याच झालेल्या सोसायटयांच्या निवडणूकांमध्ये दिसून आला. विरोधकांच्या ताब्यात
असणाऱ्या सोसायटीची सत्ता खेचून आणण्यात देसाई गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना
यश मिळाले आहे.
मल्हारपेठ ता.पाटण विभागातील विविध
विकासकामांच्या उदघाटनांचा कार्यक्रम आज गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंच्या
हस्ते पार पडले.याप्रसंगी मल्हारपेठ येथे कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजीत
करण्यात आला होता. याप्रसंगी सोसायटीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार
करण्यात आला.यामध्ये साईकडे,बेलवडे,धामणी सोसायटयांमधील विजयी उमेदवार उपस्थित
होते.
सत्कार करण्यात आलेल्या साईकडे विविध
कार्यकारी सेवा सोसायटीमधील विजयी उमेदवार पांडूरंग मोरे,आनंदा भुलुगडे,नेताजी मोरे,रामचंद्र
शामराव यादव,भगवंत करपे,आकाराम करपे,एकनाथ करपे,हणमंत ताईकडे,संगिता ताईगडे,पुष्पा
यादव,सोपान कांबळे,नथूराम साळूंखे, बेलवडे विविध कार्यकारी सेवा सोसायटी राजेंद्र
पवार,आनंदा पवार,राजाराम पवार,श्रीमती अलका पवार,गोविंदराव कांबळे,बंडू पवार,
शामराव सोनार,अधिक पाटील,यशवंत कवर,विजया पवार,हणमंत पवार,धामणी विविध कार्यकारी
सेवा सोसायटी श्रीमती सिमा दुधंडे,आनंदराव पाटील,बाजीराव गुरव,रघुनाथ जाधव,आंनदा
सावंत,शिवाजी सावंत,तानाजी लोकरे,अशोक मस्कर, महादेव घराळ, मारुती बोर्गे तसेच भरघोस मतांनी निवडून आलेल्या लोकनेते
बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी मंद्रुळहवेली मधील काशिनाथ चव्हाण, दिपाली
पानस्कर श्रीमती विमल देसाई,दिनगर चव्हाण,वसंतराव पानस्कर,विवेक यादव,मानसिंगराव
कदम,रमेश चव्हाण,तुकाराम चव्हाण,शंकरराव देसाई,दत्तात्रय भिसे,लक्ष्मण कळंत्रे या
विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान मौजे गारवडे सोसायटीमध्येही
सत्तातंर करुन देसाई गटाने बाजी मारली असून दोन दिवसापुर्वी गारवडे येथील सत्कार
समारंभामध्ये विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ गृहराज्यमंत्री ना.शंभूराज
देसाईंच्या पार पडला होता.
No comments:
Post a Comment