Sunday 23 April 2023

दौलतनगर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात साजरा. लोकनेते बाळासाहेब देसाई यांना 40 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला भक्तीमय वातावरण

 

  दौलतनगर दि.२३:-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे प्रतिवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यंदाच्या वर्षी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भव्य दिव्य दिंडी सोहळयाने श्री.ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा परिसरात महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन पुर्णाकृती पुतळयावर व स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत पारायण सोहळयातील भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांना विन्रम अभिवादन करण्यात आले.भव्यदिव्य दिंडी व रिंगण सोहळयाने दौलतनगरला सकाळपासून भक्तीमय वातावरण होते.

              दौलतनगर ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्त गत तेरा वर्षापासून सुरु असलेल्या श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे यंदाचे चौदावे वर्ष होते.या पारायण सोहळयामध्ये 758 वाचक सहभागी झाले होते.तसेच तालुक्या बाहेरीलही भाविक भक्त या सोहळयामध्ये मोठया संख्येने सहभागी होते.तर वारकरी साप्रंदयातील विविध मान्यवरांची प्रवचने,कीर्तने तसेच गावोगावच्या भजनांचे जागराचे कार्यक्रम यानिमित्ताने आयोजीत करण्यात आले होते.या संपुर्ण पारायण सोहळयामध्ये पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई,श्रीमती विजयादेवी देसाई मॉसाहेब,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, सौ.स्मितादेवी देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई,कु. ईश्वरी देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई यांचा विशेष सहभाग होता.तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख,उपविभागीय अधिकारी सुनील गाडे,तहसिलदार रमेश पाटील यांचेसह विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी ह...जयवंतराव शेलार महाराज, ...अनिल पाटील महाराज पापर्डेकर,...जगन्नाथ ठोंबरे महाराज ह.भ.प.दगडू माळी, नाना देसाई पापर्डेकर, ह.भ.प.अनिल पाटील, ह.भ.प.दत्तू कदम,भरत पाटील,बंडा कुंभार,संजय शिर्के,राहूल लोहार,सुरेश शिंदे,गणेश भिसे,अमित लोहार,सुभाष देसाई यांच्यासह त्यांचे सहकारी यांचाही सहभाग होता.तर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्याचा प्रत्यक्ष साक्षिदार असलेले ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी उपस्थितांना लोकनेते साहेबांच्या कार्याबाबत विविध अनुभव सांगीतले.

              तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर ग्रंथाचे वाचन पुर्ण झालेनंतर लोकनेते यांचे पुण्यतिथी दिवशी फुलाने सजविलेल्या पालखीत श्री ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमा ठेवून टाळ मृदुंगाच्या तालावर,डोक्यावर कलश,तुळशी वृंदावन घेतलेल्या सुहासिनी ढोल वाद्यांसमवेत श्री विठ्ठल नामाचा तसेच ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली यांचे गजरात आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयघोषात माऊलीच्या मंडपातून निघालेल्या भव्य दिंडीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकापासून सुरुवात करण्यात आली.पारायण सोहळयाची भव्य दिंडी ही कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते यांचे पुर्णाकृती पुतळयासमोर आलेनंतर नामदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पुतळयासमोर प्रथमत: ध्वजारोहण करण्यात येवून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच २१ तोफांची सलामी देण्यात आली. तर पुतळयासमोर अभंग व आरती करुन लोकनेते यांचा 40 वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर पुतळ्यासमोर भव्य असा रंगलेला रिंगण सोहळा हे दृष्य अत्यंत मनमोहक होते. चौथ्या दिवशी काल्याच्या किर्तनाने उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देवून या अखंड हरीनाम भव्य सोहळ्याची सांगता करण्यात आली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी दिवशी दौलतनगरला प्रती पंढरपुर अवतरले होते. गत तेरा वर्षापासून ह...पुडंलिक महाराज कापसे आळंदीकर हे या पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून आपली सेवा बजावीत आहेत. यंदाचा सोहळयातही त्यांनी व्यासपीठ चालक म्हणून सेवा बजावली तर हा पारायण सोहळा यशस्वी करण्याकरीता मंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह...जयवंतराव शेलार महाराज,...अनिल पाटील महाराज,...जगन्नाथ ठोंबरे महाराज यांच्यासह त्यांचे सहकारी यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील अधिकारी कर्मचारी तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कष्ट घेतले. या सर्वांचे आभार नामदार शंभूराज देसाईंनी मानले.या सोहळ्यास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

चौकट- रिंगण सोहळा ठरला भाविकांसाठी आकर्षण.

            लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुतळ्यास अभिवादन केलेनंतर पुतळ्यासमोर प्रतिवर्षी साजरा करण्यात येणारा रिंगण सोहळा हा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असते, या रिंगण सोहळ्यामध्ये अबाल वृध्दासंह लहानथोर सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदाच्या वर्षी लोकनेते साहेब यांचे पुण्यतिथी  सोहळयानिमित्त रिंगण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या रिंगण सोहळयामध्ये ना.शंभूराज देसाई यांचे सह सौ.स्मितादेवी देसाई, रविराज देसाई, सौ.अस्मितादेवी देसाई, मा.यशराज देसाई, ईश्वरी देसाई,चि.जयराज देसाई, चि.आदित्यराज देसाई यांचे उपस्थितीमुळे हा रिंगण सोहळा उपस्थित सर्व भक्त,भाविकांसाठी आकर्षण ठरले.तसेच हा रिंगण सोहळा पाहून उपस्थित भाविक भक्त भारावून गेले.

चौकट-लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा स्व.शिवाजीराव देसाई यांचे समाधी स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत केले अभिवादन.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री यांचा शनिवार दि. 23 रोजी  पुण्यतिथी सोहळा पार पडला.या पुण्यतिथी सोहळयामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून लोकनेते साहेब यांचे पुर्णाकृती पुतळा समाधी स्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन करण्यात आले होते.त्यानुसार आज पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळा   स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचे समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते साहेब यांचे 40 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

Saturday 22 April 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत रविवारी दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 40 वा पुण्यतिथी सोहळा व श्री ग्रंथराज पारायण सोहळ्याची होणार सांगता.

 

दौलतनगर दि.22:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर,ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये  आयोजित  ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता व लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा पुण्यतिथी सोहळा रविवार दि.23 एप्रिल,2023 रोजी  ना.शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा होणार असून यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकांत म्हंटले आहे.

            सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात दौलतनगर येथे भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे तेरावे वर्ष असून प्रति वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०23 पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.

दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये 758 वाचक सहभागी झाले आहेत.पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार, प्रवनचनकारांना एक चांगले तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त रविवार दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी 8. ०० ते 9. ०० वा.नामदार श्री. शंभूराज देसाई व  सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा आयोजित केला आहे. त्यांनतर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.त्यानंतर दौलतनगर येथे भव्य रिंगण सोहळा होणार असून सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. विजय महाराज रामिष्टेवाडी यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता होणार आहे.

 चौकट :- लोकनेते साहेब,स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुतळा समाधी स्थळावर होणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येते. लोकनेते साहेब यांचा पुण्यतिथी सोहळा दि. 23 एप्रिल रोजी भक्तीमय वातावरणात साजरा करत या दिवशी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता होते.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचे वर्षी मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून दौलतनगर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुर्णाकृती पुतळा समाधी स्थळ यांचेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांचे पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.

Wednesday 19 April 2023

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर,ता.पाटण येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन तज्ञ डॉक्टरांमार्फत होणार मोफत आरोग्य तपासणी. पाटण मतदारसंघातील नागरीकांनी या शिबीरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन.

 

दौलतनगर दि.19 :- महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 40 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने शारिरीक तपासणी करुन तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचेकडून योग्य तो सल्ला व आवश्यक ते औषधोपचार करुन आरोग्याची काळजी घेण्यासाठी शुक्रवार दि. 21 एप्रिल,2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 या वेळेमध्ये दौलतनगर,ता.पाटण येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

                                 प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून दौलतनगर,ता.पाटण येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान शिबीरामध्ये स्त्रीरोग तपासणी,बालरोग तपासणी,नेत्ररोग तपासणी अस्थिरोग तपासणी कान,नाक,घसा तपासणी,त्वचारोग तपासणी,माता सुरक्षित तर घर सुरक्षित अंतर्गत 18 वर्षे वरील सर्व स्त्रियांची तपासणी,एन.सी.डी.विभाग,रक्तदाब,ब्लड शुगर,कॅन्सर तपासणी,आयुष्यमान भारत डिजीटल मिशन कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट नोंदणी,रक्तदान शिबीर, इ.सी.जी. तपासणी, रक्त लघवी तपासणी या आरोग्यविषयक तपासण्या होणार आहेत. रुग्णाच्या आरोग्याची तज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक ती तपासणी करण्यात येऊन त्याचा आजार बरा होण्यासाठी आवश्यक तो प्राथमिक औषधोपचार करुन डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्‍य विषयक योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे. तसेच संबंधित रुग्णांना या ठिकाणी आवश्यकतेनुसार औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.तरी या सर्व रोग निदान शिबीराचा लाभ पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ गौरव यात्रेची उत्साहात मिरवणूक. लोकनेते साहेबांना पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेने केले विनम्र अभिवादन.

 

दौलतनगर दि.9:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते साहेब यांचे जीवन कार्यावरील काही महत्त्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागलेली व नियोजित विकास कामांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेची व पालखीची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात बुधवारी मोठया उत्साहात पार पडली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवन कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रेला तालुक्यातील जनतेने चागला प्रतिसाद दिला.तसेच या चित्ररथ गौरव यात्रेमधील पालखीमध्ये ठेवलेल्या लोकनेते साहेब यांचे पादुकांचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

                         लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रतिवर्षी दौलतनगर,ता.पाटण येथे  श्री ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त गुरुवार दि. 20 ते रविवार दि. 23 एप्रिल पर्यंत दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये तीन दिवसीय श्री ग्रंथराज पारायण सोहळा संपन्न होत आहे. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पारायण सोहळयाच्या अगोदर लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन देण्याकरीता त्यांच्याकार्याचा मागोवा घेणारे,लोकनेते साहेब यांनी राज्यासाठी,जिल्हयासाठी तसेच तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाची युवा पिढीला माहिती देणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संकल्पनेतून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मतदारसंघात साकारलेले तसेच नियोजित विकास कामे या सर्वांचे चित्ररथांची गैारवयात्रा व गौरवयात्रेच्यापुढे लोकनेते यांच्या पादुकांचा पालखीरथ असा सोहळा साजरा करण्यातय येऊन तालुक्यातील 22 गावातून हे चित्ररथ व गौरवयात्रेचे मार्गक्रमण झाले. बुधवारी सकाळी 09 वाजता कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पादूकांचे पूजन करुन या चित्ररथ गौरवयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी श्रीमती विजयादेवी देसाई, लोकनेते बाळासहोब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,पोलिस अधिक्षक समीर शेख, जयराज देसाई, आदित्यराज देसाई,डॉ.सुभाष चव्हाण,उपविभागीय अधिकारी,सुनील गाडे,तहसिलदार रमेश पाटील,जयवंतराव शेलार,अशोकराव पाटील, विजय पवार, संतोष गिरी,भरत साळूंखे,अभिजित पाटील,बबनराव शिंदे,सोमनाथ खामकर,संजय देशमुख,जालंदर पाटील यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अभिवादन करण्यासाठी दौलतनगर येथे उपस्थित होते.

             लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये विविध वाद्य,लोकनेत्यांची आकर्षक पालखी,फटाक्यांची आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते.तालुक्यातील दौलतनगर, चोपदारवाडी, मारुलहवेली, निसरे फाटा, मल्हारपेठ, नाडे नवारस्ता,पाटण असा मार्ग होता.एकूण 22 गावातून जाणारा हा चित्ररथ गौरवयात्रेच्या सोहळयाचे मोठया उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन लोकनेत्यांच्या पालखी मधील पादुकांचे महिला वर्गाकडून पूजन करुन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत करण्यात आले.या चित्ररथ गौरवयात्रेमध्ये जिल्हास्तरीय शासकीय विभागांचा प्रथमच सहभाग होता.यामध्ये वन विभाग,वन्यजिव विभाग,जिल्हा आरोग्य विभाग,कृषी विभाग,जलसंपदा विभाग,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,शिक्षण विभाग,सामाजिक न्याय विभाग,ग्रामविकास विभाग,महिला व बालकल्याण विभाग,सहकार विभाग,गृह विभाग,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, जिल्हा अग्रणी बँक,जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा अधिकारी, मध संचनालय विभाग,पशुसंवर्धन विभाग,रेशीम विभाग,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,नगरपंचायत पाटण यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना,कोयना परिसर साखर कामगार संघटना,शिवदौलत सह.बँक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण, सार्वजनिक बांधकाम उपविभाग उत्तर व दक्षिण, न्यू इग्लिश स्कूल नाटोशी व  धावडे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पाटण, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे,मल्हारपेठ पोलीस ठाणे, दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनि.व सिनि. कॉलेज, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे 36 आकर्षक चित्ररथ या सोहळयामध्ये सहभागी झाले होते. या चित्ररथ गौरव यात्रेची मिरवणूक भर उन्हातही अत्यंत उत्साहात संपन्न झाली. यावेळी चेअरमन मा. यशराज देसाई(दादा), मा.रविराज देसाई(दादा) यांचे ठिकठिकाणी महिलांकडून औक्षणही करण्यात येऊन ग्रामस्थांचेवतीने सत्कारही करण्यात आला. या अनोख्या सोहळयामध्ये प्रत्येक गावाच्या ठिकाणी मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. पाटण येथे चित्ररथ गौरव यात्रेच्या सांगता समारंभामध्ये चेअरमन मा.यशराज देसाई यांनी या चित्ररथ गौरव यात्रेमध्ये सहभागी झालेल्यांचे तसेच चित्ररथ तयार करुन सहभागी झालेल्या सर्व संस्था तसेच शासकीय विभागांचे आभार मानले. दरम्यान आज  मंत्रीमंडळांच्या कॅबिनेट बैठकीमुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना आजच्या लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ गौरव यात्रेप्रसंगी आज उपस्थित राहता आले नाही . जनसेवेसाठी संवेदनशीलता आणि कर्तव्यतत्परतेचा आदर्श लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्यापुढे ठेवला असल्याचे सांगत त्यांचा हा वारसा जपण्याच्या दृष्टीने नेहमीच कटिबद्ध असल्याने राज्याचा महत्वाच्या खात्याचा मंत्री  या नात्याने जबाबदारी पार पाडत असताना, गेल्या १५ वर्षांत यंदा प्रथमच आपल्या पारायण सोहळ्याच्या प्रारंभदिनी आज येता आले नसले, तरी उद्यापासून ना.शंभूराज देसाई  हे पारायण सोहळ्यात  उपस्थित राहणार आहेत.

चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ गौरवयात्रेतील चित्ररथांनी वेधले सर्वांचे लक्ष.

शासकीय विभागांच्या विविध योजनांची माहितीसाठी दौलतनगर येथे चार दिवस राहणार प्रदर्शन.

लोकनेते बाळासाहेब देसाई  यांचे पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे जीवन कार्यावरील काही महत्त्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागलेली व नियोजित विकास कामांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेमध्ये शासनाच्या विविध शासकीय विभागांनी तयार केलेल्या चित्र रथांनी उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले.तसेच या चित्ररथ गौरव यात्रेमध्ये सहभागी झालेल्या विविध शासकीय योजनांची माहिती असणारे चित्ररथ हे पाटण तालुक्यातील नागरिकांसाठी प्रदर्शनामध्ये दौलतनगर येथे ठेवण्यात आले असून या माध्यमातून लोकांना संबंधित योजनांची आवश्यक ती माहिती देण्यासाठी त्या त्या विभागाचे अधिकारीही चार दिवस उपस्थित राहणार असल्याने शासनाच्या सध्या सुरु असलेल्या शासकीय योजनांची जत्रा या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा हा उपक्रम फायदेशीर होणार आहे.