Wednesday 19 April 2023

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर,ता.पाटण येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन तज्ञ डॉक्टरांमार्फत होणार मोफत आरोग्य तपासणी. पाटण मतदारसंघातील नागरीकांनी या शिबीरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन.

 

दौलतनगर दि.19 :- महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 40 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने शारिरीक तपासणी करुन तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचेकडून योग्य तो सल्ला व आवश्यक ते औषधोपचार करुन आरोग्याची काळजी घेण्यासाठी शुक्रवार दि. 21 एप्रिल,2023 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 04.00 या वेळेमध्ये दौलतनगर,ता.पाटण येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

                                 प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून दौलतनगर,ता.पाटण येथे तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व रोग निदान शिबीरामध्ये स्त्रीरोग तपासणी,बालरोग तपासणी,नेत्ररोग तपासणी अस्थिरोग तपासणी कान,नाक,घसा तपासणी,त्वचारोग तपासणी,माता सुरक्षित तर घर सुरक्षित अंतर्गत 18 वर्षे वरील सर्व स्त्रियांची तपासणी,एन.सी.डी.विभाग,रक्तदाब,ब्लड शुगर,कॅन्सर तपासणी,आयुष्यमान भारत डिजीटल मिशन कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट नोंदणी,रक्तदान शिबीर, इ.सी.जी. तपासणी, रक्त लघवी तपासणी या आरोग्यविषयक तपासण्या होणार आहेत. रुग्णाच्या आरोग्याची तज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक ती तपासणी करण्यात येऊन त्याचा आजार बरा होण्यासाठी आवश्यक तो प्राथमिक औषधोपचार करुन डॉक्टरांकडून रुग्णांना आरोग्‍य विषयक योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे. तसेच संबंधित रुग्णांना या ठिकाणी आवश्यकतेनुसार औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.तरी या सर्व रोग निदान शिबीराचा लाभ पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

No comments:

Post a Comment