Monday 17 April 2023

दि.१९ रोजी पाटण तालुक्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रा निघणार. मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते होणार गौरव यात्रेचा शुभारंभ.

                                                     


दौलतनगर दि.17:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवन चरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक पाटण तालुक्यात काढण्यात येणार आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरव यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार दि.19 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथे होणार असल्याची माहिती लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने पत्रकाव्दारे दिली आहे.

सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाटण तालुक्यात प्रथमच भव्य स्वरुपात तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१० पासून प्रतिवर्षी हा पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो. यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल,२०२3 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने दि.२० ते २३ एप्रिल,२०२3 पर्यंत तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पारायण सोहळा कारखाना कार्यस्थळावर साजरा होत असताना बुधवार दि.9 एप्रिल रोजी सकाळी ०8.०० वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहात कार्यान्वित असणाऱ्या विविध संस्थांचे वतीने तसेच जिल्हा व तालुकास्तरीय सर्व शासकीय विभागांकडून लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्य शासनाच्या विविध खात्यांचे कर्तबगार मंत्री आणि महाराष्ट्राचे पोलादी पुरुष म्हणून केलेल्या अतुलनीय कार्याचे व त्यांच्या जीवनचरित्रावरील काही महत्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधित तसेच पाटण तालुक्यामध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून राज्य शासनाच्या विविध योजनांमधून साकारलेल्या विविध विकास कामांचे,राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेले  चित्ररथ व गौरव यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या चित्ररथांचे व गौरव यात्रेचा प्रारंभ हा कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुर्णाकृती पुतळयापासून करण्यात येणार असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे कार्यावरील चित्ररथ व गौरव यात्रेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा), मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा) यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये बुधवार दि.19 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08.00 वा. दौलतनगर,ता.पाटण येथे होणार आहे. दरम्यान  चित्ररथ व गौरव यात्रा चोपदारवाडी, गव्हाणवाडी, सुर्यवंशीवाडी, पापर्डे, मारुलहवेली फाटा,गारवडे बहुले फाटा, सोनाईचीवाडी, नावडी वसाहत,निसरे,निसरे विहिर,निसरे फाटा, आबदारवाडी,गिरेवाडी, मल्हारपेठ, नारळवाडी,येराडवाडी,नवसरी, नाडे नवारस्ता, आडूळ गावठाण, आडूळपेठ, सुभाषनगर, लुगडेवाडी सोनगाव,येरफळे,म्हावशी स्टॉप ते पाटण पर्यंत अशी चित्ररथ व गौरव यात्रेची मिरवणूक काढण्यात येणार असून चाफोली रोड, पाटण येथील प्रांगणामध्ये या चित्ररथ व गौरव यात्रेची सांगता होणार आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जीवनचरीत्राची तसेच कार्याची विविधांगी माहिती देणारे व लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संबंधीचे चित्ररथ व गौरवयात्रेचा तालुक्यातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा व या चित्ररथ गौरवयात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ही पत्रकांत करण्यात आले आहे.

चौकट:लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ गौरव यात्रेमध्ये 32 चित्ररथांचा सहभाग, चित्ररथांचे चार दिवस प्रदर्शन.

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुण्यतिथी निमित्त आयोजित चित्ररथ गौरव यात्रेमध्ये यंदाच्या वर्षी जिल्हा व तालुकास्तरीय विविध शासकीय विभागांच्या 32 चित्ररथांचा सहभाग राहणार आहे.तसेच दौलतनगर येथे हे चित्ररथ प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.या दरम्यान राज्य शासनाकडून सध्या सुरु असलेल्या शासकीय विभागांच्या योजनांची जत्रा या योजनेअंतर्गत शासकीय विभागांचे अधिकारी हे त्या त्या विभागाशी संबंधित योजनांची माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment