दौलतनगर 04.:-
कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतक्यांची एक मध्यवर्ती संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून
शेतकऱ्यांच्या शेती मालाची खरेदी विक्री होत
असते. या संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासणे हा मुख्य हेतू पाहिजे परंतु
पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन
देण्याऐवजी येथून राजकीय फायदा होण्यासाठी यंत्रणेचा वापर केला जात आहे.गेली अनेक वर्षे
सत्ता असूनही संस्थेची कोणतीही प्रगती नाही
ना तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला बाजार पेठ उपलब्ध करुन देता आली नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्याची ससेहोलपट होत आहे.त्यामुळे
शेतकऱ्यांच्या हितासाठी पाटण कृषी उत्पन्न
बाजार समितीची निवडणूक ताकदीने लढणार असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्कमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी केले.
पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीच्या
अनुषंगाने आयोजित मतदार,पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर
कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),चि.जयराज
देसाई, माजी चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव
शेलार, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,भरत
साळूंखे,बबनराव शिंदे,व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
होते.
यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे
म्हणाले की, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात आज मेळावा घेण्याची
वेळ का आली याचा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील इतर बाजार समितीच्या
कारभार बघितला तर पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही योजनेची
अंमलबजावणी करण्यात अपयश आले आहे.मराठवाडयातील
कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शासना मार्फत असणाऱ्या योजनांची प्रभावीपणे
अंमलबजावणी केलेली बघायला मिळते. यामध्ये शेतकऱ्यांसाठी निवाऱ्याच्या सुविधेसह त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीची
चांगली व्यवस्था पहायला मिळते.परंतु पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला साधी बाजारपेठ उपलब्ध करुन देता आली नाही.या शेतकऱ्याच्या
संस्थेतून केवळ राजकीय फायदाच घेण्यासाठी यंत्रणेचा वापर केला आहे.बाजार समितीच्या
निवडणुकीमध्ये आपण केवळ विरोधासाठी विरोध म्हणून नाही तर शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय
घेण्यासाठी तसेच राज्यातील शिवसेना भाजपा युतीच्या सरकारच्या माध्यमातून शासनाच्या
असणाऱ्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी
बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले
की, पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सोसायटीसह ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विजयी
झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार करत सर्वांचा सन्मान केला आहे. आता निवडूण आलेल्या
सर्व पदाधिकारी यांची जबाबदारी वाढली आहे.
कारण हि निवडणूक दिसते तेवढी सोपी नाही. सध्या सर्व गावांना आपण भरघोस निधी देण्याचा
प्रयत्न केला असून गावा गावातील कार्यकर्त्यांनी मागेल ते काम देण्याचा प्रयत्न केला
आहे.तसेच यापुढेही विकास कामांना निधी कमी पडणार नाही.त्यामुळे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते
यांनी एकत्रित येऊन जबाबदारी घेऊन या बाजार
समिती निवडणूकीत जिंकायचीच या हेतूने निवडणूकीच्या रिंगणात आता उतरुया असे आवाहनही
त्यांनी शेवटी केले.कार्य्रमाचे स्वागत व प्रास्तावित विजय पवार यांनी केले तर आभार
पांडूरंग नलवडे यांनी मानले. मेळाव्यास सोसायटी,ग्रामपंचायत व व्यापारी मतदारसंघातील
मतदार बहुसंख्येने उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment