Monday 10 April 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास प्रारंभ. चेअरमन मा.यशराज देसाई यांचे शुभहस्ते वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण.



दौलतनगर दि.10: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगामात कारखान्याच्या सर्वच विभागांनी चांगली कामगिरी बजावली असून गळीत हंगामात गाळपाचा टप्पा पुर्ण करण्यासाठी कारखान्याशी निगडीत प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे कारखान्याने चांगले गाळप केले आहे. येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली असून आज या वाहतूक कंत्राटदार यांना करारपत्राचे वितरण करत असल्याची माहिती चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी यावेळी  दिली.

             चेअरमन मा.यशराज देसाई(दादा) यांचे हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 च्या गळीत हंगामातील ऊस तोडणी वाहतूक करारपत्र ऊस वाहतूक कंत्राटदार यांचेकडे सुपुर्द केली. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी  कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडूरंग नलवडे,माजी चेअरमन अशोकराव पाटील, कार्यकारी संचालक सुहास देसाई,चिफ अकौंटंट विनायक देसाई, शेती अधिकारी वैभव नलवडे यांचेसह अधिकारी व कर्मचारी तसेच तोडणी वाहतूक संस्थेचे चेअरमन राजाराम जाधव,तोडणी वाहतूक कंत्राटदार श्री.प्रकाश जाधव,पंडीत राठोड,संजय पवार,सुभाष गव्हाणे,जय पाटील हे उपस्थित होते.

                यावेळी चेअरमन मा.यशराज देसाई पुढे म्हणाले की, कारखान्याच्या सन 2023-24 या गळीत हंगामासाठी नोंदविलेल्या संपुर्ण ऊसाचे गाळप पुर्ण करण्याच्या दृष्टीने तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार करण्याचे काम  कारखाना व्यवस्थापनाने सुरु केली आहे. आपले कारखान्याचे नुकतेच पहिल्या टप्प्यातील विस्तारवाढीचे काम पुर्णत्वास गेले आहे. त्यामुळे संस्थेसहित सभासद शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. यापुढील काळात ही अनेक तांत्रिक आणि आधुनिक बदल करून त्याचा जास्तीत जास्त फायदा येणाऱ्या गळीत हंगामामध्ये आपल्याला होईल. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब,स्व.शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांचे विचारांचा वारसा जोपासत ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्यामध्ये काटकसरीचे धोरण राबवित ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून सभासदांच्या प्रगतीसाठी कारखाना व्यवस्थापनाकडून नेहमीच प्रामाणिक प्रयत्न सुरु असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हंटले आहे की,येणारा गळीत हंगाम लवकरात लवकर सुरु करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली आहे. तसेच येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्याकरीता कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपल्या राहिलेल्या ऊसाची नोंद करण्याकरीता कारखान्याचे संबंधित शेती गट ऑफीसशी संपर्क साधावा आपण पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्यास सहकार्य करावे आवाहनही त्यांनी शेवटी पत्रकांत केले आहे. 

No comments:

Post a Comment