Saturday 22 April 2023

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत रविवारी दौलतनगर येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 40 वा पुण्यतिथी सोहळा व श्री ग्रंथराज पारायण सोहळ्याची होणार सांगता.

 

दौलतनगर दि.22:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा व ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उदयोग समुह व पाटण तालुका वारकरी संघ यांचे सौजन्याने दौलतनगर,ता. पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये  आयोजित  ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता व लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा पुण्यतिथी सोहळा रविवार दि.23 एप्रिल,2023 रोजी  ना.शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत साजरा होणार असून यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई (दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकांत म्हंटले आहे.

            सन २०१० या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून पाटण तालुक्यात दौलतनगर येथे भव्य प्रमाणांत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येत असून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास पाटण तसेच शेजारील तालुक्यातील भाविकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता लोकनेते बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी हि दौलतनगर येथे तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळयानेच साजरी करण्यात येत आहे. यंदा या पारायणाचे तेरावे वर्ष असून प्रति वर्षाप्रमाणे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे 40 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. २० ते २३ एप्रिल, २०23 पर्यंत तीन दिवसीय पारायण या ठिकाणी होत आहे.

दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये सुरु झालेल्या पारायण सोहळयामध्ये 758 वाचक सहभागी झाले आहेत.पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या पारायण सोहळयाच्या निमित्ताने तालुक्यातील तसेच शेजारील तालुक्यातील किर्तनकार, प्रवनचनकारांना एक चांगले तालुकास्तरीय व्यासपिठ निर्माण झालेले असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पाटण तालुक्यातील दौलतनगरला लोकनेते बाळासाहेब देसाई नगरीमध्ये पारायण सोहळयामुळे प्रति पंढरीचे रुप अवतरले असल्याचे चित्र दिसत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त रविवार दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी 8. ०० ते 9. ०० वा.नामदार श्री. शंभूराज देसाई व  सौ.स्मितादेवी देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयापर्यंत दिंडी सोहळा आयोजित केला आहे. त्यांनतर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे पुतळयावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.त्यानंतर दौलतनगर येथे भव्य रिंगण सोहळा होणार असून सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. विजय महाराज रामिष्टेवाडी यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुह,दौलतनगर यांचेतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्यांनतर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता होणार आहे.

 चौकट :- लोकनेते साहेब,स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुतळा समाधी स्थळावर होणार हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष,राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येते. लोकनेते साहेब यांचा पुण्यतिथी सोहळा दि. 23 एप्रिल रोजी भक्तीमय वातावरणात साजरा करत या दिवशी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता होते.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाचे वर्षी मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून दौलतनगर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई,स्व.शिवाजीराव देसाई यांचे पुर्णाकृती पुतळा समाधी स्थळ यांचेवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येऊन लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे पुण्यतिथी निमित्त त्यांचे पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment