Wednesday 19 April 2023

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे चित्ररथ गौरव यात्रेची उत्साहात मिरवणूक. लोकनेते साहेबांना पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेने केले विनम्र अभिवादन.

 

दौलतनगर दि.9:- महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त लोकनेते साहेब यांचे जीवन कार्यावरील काही महत्त्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागलेली व नियोजित विकास कामांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेची व पालखीची भव्य मिरवणूक पाटण तालुक्यात बुधवारी मोठया उत्साहात पार पडली. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून साकारलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे जीवन कार्यावरील चित्ररथ व गौरवयात्रेला तालुक्यातील जनतेने चागला प्रतिसाद दिला.तसेच या चित्ररथ गौरव यात्रेमधील पालखीमध्ये ठेवलेल्या लोकनेते साहेब यांचे पादुकांचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

                         लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रतिवर्षी दौलतनगर,ता.पाटण येथे  श्री ग्रंथराज पारायण सोहळा आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी सोहळयानिमित्त गुरुवार दि. 20 ते रविवार दि. 23 एप्रिल पर्यंत दौलतनगर,ता.पाटण येथील महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये तीन दिवसीय श्री ग्रंथराज पारायण सोहळा संपन्न होत आहे. पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पारायण सोहळयाच्या अगोदर लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्र राज्याकरीता केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख करुन देण्याकरीता त्यांच्याकार्याचा मागोवा घेणारे,लोकनेते साहेब यांनी राज्यासाठी,जिल्हयासाठी तसेच तालुक्यासाठी दिलेल्या योगदानाची युवा पिढीला माहिती देणारे तसेच लोकनेते साहेब यांचे स्वप्नातील तालुका या संकल्पनेतून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मतदारसंघात साकारलेले तसेच नियोजित विकास कामे या सर्वांचे चित्ररथांची गैारवयात्रा व गौरवयात्रेच्यापुढे लोकनेते यांच्या पादुकांचा पालखीरथ असा सोहळा साजरा करण्यातय येऊन तालुक्यातील 22 गावातून हे चित्ररथ व गौरवयात्रेचे मार्गक्रमण झाले. बुधवारी सकाळी 09 वाजता कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पादूकांचे पूजन करुन या चित्ररथ गौरवयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी श्रीमती विजयादेवी देसाई, लोकनेते बाळासहोब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा),मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी,पोलिस अधिक्षक समीर शेख, जयराज देसाई, आदित्यराज देसाई,डॉ.सुभाष चव्हाण,उपविभागीय अधिकारी,सुनील गाडे,तहसिलदार रमेश पाटील,जयवंतराव शेलार,अशोकराव पाटील, विजय पवार, संतोष गिरी,भरत साळूंखे,अभिजित पाटील,बबनराव शिंदे,सोमनाथ खामकर,संजय देशमुख,जालंदर पाटील यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अभिवादन करण्यासाठी दौलतनगर येथे उपस्थित होते.

             लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ व गौरवयात्रेमध्ये विविध वाद्य,लोकनेत्यांची आकर्षक पालखी,फटाक्यांची आतषबाजी यामुळे तालुक्यातील सर्व वातावरण दुमदुमुन गेले होते.तालुक्यातील दौलतनगर, चोपदारवाडी, मारुलहवेली, निसरे फाटा, मल्हारपेठ, नाडे नवारस्ता,पाटण असा मार्ग होता.एकूण 22 गावातून जाणारा हा चित्ररथ गौरवयात्रेच्या सोहळयाचे मोठया उत्साहात ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करुन लोकनेत्यांच्या पालखी मधील पादुकांचे महिला वर्गाकडून पूजन करुन या चित्ररथ गौरवयात्रेचे स्वागत करण्यात आले.या चित्ररथ गौरवयात्रेमध्ये जिल्हास्तरीय शासकीय विभागांचा प्रथमच सहभाग होता.यामध्ये वन विभाग,वन्यजिव विभाग,जिल्हा आरोग्य विभाग,कृषी विभाग,जलसंपदा विभाग,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,शिक्षण विभाग,सामाजिक न्याय विभाग,ग्रामविकास विभाग,महिला व बालकल्याण विभाग,सहकार विभाग,गृह विभाग,महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, जिल्हा अग्रणी बँक,जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा अधिकारी, मध संचनालय विभाग,पशुसंवर्धन विभाग,रेशीम विभाग,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,नगरपंचायत पाटण यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना,कोयना परिसर साखर कामगार संघटना,शिवदौलत सह.बँक, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण, सार्वजनिक बांधकाम उपविभाग उत्तर व दक्षिण, न्यू इग्लिश स्कूल नाटोशी व  धावडे, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पाटण, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे,मल्हारपेठ पोलीस ठाणे, दौलत औद्योगिक प्रशिक्षण संस्था व श्रीमती विजयादेवी देसाई ज्यूनि.व सिनि. कॉलेज, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे 36 आकर्षक चित्ररथ या सोहळयामध्ये सहभागी झाले होते. या चित्ररथ गौरव यात्रेची मिरवणूक भर उन्हातही अत्यंत उत्साहात संपन्न झाली. यावेळी चेअरमन मा. यशराज देसाई(दादा), मा.रविराज देसाई(दादा) यांचे ठिकठिकाणी महिलांकडून औक्षणही करण्यात येऊन ग्रामस्थांचेवतीने सत्कारही करण्यात आला. या अनोख्या सोहळयामध्ये प्रत्येक गावाच्या ठिकाणी मिरवणूकीत सहभागी झालेल्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. पाटण येथे चित्ररथ गौरव यात्रेच्या सांगता समारंभामध्ये चेअरमन मा.यशराज देसाई यांनी या चित्ररथ गौरव यात्रेमध्ये सहभागी झालेल्यांचे तसेच चित्ररथ तयार करुन सहभागी झालेल्या सर्व संस्था तसेच शासकीय विभागांचे आभार मानले. दरम्यान आज  मंत्रीमंडळांच्या कॅबिनेट बैठकीमुळे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना आजच्या लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ गौरव यात्रेप्रसंगी आज उपस्थित राहता आले नाही . जनसेवेसाठी संवेदनशीलता आणि कर्तव्यतत्परतेचा आदर्श लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी आपल्यापुढे ठेवला असल्याचे सांगत त्यांचा हा वारसा जपण्याच्या दृष्टीने नेहमीच कटिबद्ध असल्याने राज्याचा महत्वाच्या खात्याचा मंत्री  या नात्याने जबाबदारी पार पाडत असताना, गेल्या १५ वर्षांत यंदा प्रथमच आपल्या पारायण सोहळ्याच्या प्रारंभदिनी आज येता आले नसले, तरी उद्यापासून ना.शंभूराज देसाई  हे पारायण सोहळ्यात  उपस्थित राहणार आहेत.

चौकट: लोकनेते बाळासाहेब देसाई चित्ररथ गौरवयात्रेतील चित्ररथांनी वेधले सर्वांचे लक्ष.

शासकीय विभागांच्या विविध योजनांची माहितीसाठी दौलतनगर येथे चार दिवस राहणार प्रदर्शन.

लोकनेते बाळासाहेब देसाई  यांचे पुण्यतिथी निमित्ताने त्यांचे जीवन कार्यावरील काही महत्त्वाच्या घटनांचे दर्शन घडविणारे तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे माध्यमातून मार्गी लागलेली व नियोजित विकास कामांचे दर्शन घडविणारे चित्ररथ व गौरव यात्रेमध्ये शासनाच्या विविध शासकीय विभागांनी तयार केलेल्या चित्र रथांनी उपस्थित सर्वांचे लक्ष वेधले.तसेच या चित्ररथ गौरव यात्रेमध्ये सहभागी झालेल्या विविध शासकीय योजनांची माहिती असणारे चित्ररथ हे पाटण तालुक्यातील नागरिकांसाठी प्रदर्शनामध्ये दौलतनगर येथे ठेवण्यात आले असून या माध्यमातून लोकांना संबंधित योजनांची आवश्यक ती माहिती देण्यासाठी त्या त्या विभागाचे अधिकारीही चार दिवस उपस्थित राहणार असल्याने शासनाच्या सध्या सुरु असलेल्या शासकीय योजनांची जत्रा या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन या योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत होणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचा हा उपक्रम फायदेशीर होणार आहे.

No comments:

Post a Comment