Friday 22 March 2024

पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे कामाला 29 कोटी 83 लक्ष रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता.

 


दौलतनगर दि.22:- पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामासाठी 14 कोटी 87 लक्ष रुपयांचा निधी या पूर्वी मंजूर होऊन या इमारतीचे कामालाही सुरुवात झाली आहे.तर या प्रशासकीय इमारतीचे वाढीवचे बांधकामासाठी जादा निधीची आवश्यकता असल्याने वाढीवचा निधी मंजूर होणेबाबतचा  सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सुचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी  मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांना केल्या होत्या. त्यानुसार पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचे कामाला 29 कोटी 83 लक्ष 27 हजार इतक्या रकमेची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

                पाटण येथे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली आणण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सुमारे 14 कोटी 87 लक्ष रुपयांची भरघोस अशी तरतुद सन 2020-21 च्या राज्य शासनाचे अर्थसंकल्पामध्ये करुन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत पाटण तालुकावाशियांची बहुप्रतिक्षित असलेली मागणी मुर्त स्वरुपात आणली होती. सदर कामांस प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दि. 27 फेब्रुवारी 2020 रोजी पारित केला होता. त्यानुसार  पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.दरम्यान प्रत्यक्ष उपलब्ध जागेमुळे संकलप चित्रात बदल होऊन बांधकाम क्षेत्रफळामध्ये 621 चौ.मी. ची वाढ झाली. वस्तू व सेवा करामध्ये 12 टक्क्यावरुन 18 टक्के वाढ तसेच बांधकामाच्या किंमतीतमध्ये वाढ झाल्याने पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचे कामाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याच्या प्रस्तावास दि.12.03.2024 रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत प्राप्त मान्यतेस अनुसरुन 29 कोटी 83 लक्ष 27 हजार इतक्या रकमेची  सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामंजूर रक्कमेत तळ मजल्यासह पाच मजले बांधकाम, इलेक्ट्रीकचे काम, अग्निरोधक यंत्रणा, फर्निचर, रेन रुप वॅाटर हारवेस्टींग, सोलार रुप टॅाप,बायो गिजस्टर, या बाबींचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

                पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मुख्‍य बाजारपेठेच्या ठिकाणी  शासकीय कार्यालय हे वेग-वेगळया ठिकाणी असल्याने तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातून आपल्या दैनंदिन कामासाठी आलेल्या नागरिकांना या वेगवेगळया ठिकाणी असलेल्या शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते.त्याचा नाहक त्रास हा येथील सर्वसामान्य जनतेला होत होता. वेळेत कामं होत नसल्याने नागरीकांमध्ये नाराजी निर्माण होत होती. तालुक्याच्या ठिकाणची असणारी सर्व शासकीय कार्यालये ही एका छताखाली यावी या संकल्पनेतून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे  सततच्या प्रयत्नामुळे पाटण येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकामाचे कामला 29 कोटी 83 लक्ष 27 हजार इतक्या रकमेची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशासकीय इमारतीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे संकल्पनेतून तालुकास्तरीय सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली  येणार आहेत.यामध्ये उपविभागीय कार्यालय,तहसिल कार्यालय,लोक अदालत कार्यालय,सेतू कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय,दुय्यम निबंधक कार्यालय,वनक्षेत्रपाल कार्यालय,तालुका कृषी कार्यालय व ट्रेझरी ऑफीस हि सर्व कार्यालय एकाच ठिकाणी येणार असल्याने एकाच ठिकाणी सर्व प्रकारची लोकोपयोगी कामे कमी कालावधीमध्ये होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे तालुक्यातील समाधानाचे वातावरण असून लवकरच या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पुर्ण झाल्यानंतर या नवीन वास्तुमुळे पाटणच्या वैभवात भर पडणार आहे.       

Thursday 14 March 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र पहिले अद्ययावत प्रशिक्षण केंद्र पाटणमध्ये उभारणार मंत्रिमंडळ बैठकीत प्रशिक्षण केंद्रास मान्यता; ३४८ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प आराखडा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून माहिती


गुरुवार, १४ मार्च २०२४

मुंबई : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मौजे वाटोळे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. हे विभागाचे राज्यातील पहिलेच प्रशिक्षण केंद्र असून यामध्ये अद्ययावत अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रशिक्षण केंद्रासाठी ३४८ कोटी रुपयांच्या प्रकल्प आराखड्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे विभागातील अधिकारी, जवान, कर्मचारी यांची क्षमता वृद्धी होईल, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. 

गुरुवारी, १४ मार्च रोजी मुंबईतील पावनगड निवासस्थानी मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत प्रशिक्षण केंद्राबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, प्रशिक्षण केंद्रात सायबर सेल कार्यान्वित होणार आहे. अवैध मद्य विक्री व निर्मिती, अन्य राज्यातून आवक होणारे अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया व गुन्हे नोंद करण्यात येतात. सदर गुन्हे नोंदवणे, त्याचा तपास करून गुन्हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने हा सायबर सेल उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. 

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे, तसेच कायदेविषयक व शारीरिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र नसल्याने विभागाला पोलीस प्रशिक्षण केंद्रावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाच्या स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रासाठी मंत्री शंभूराज देसाई हे पाठपुरावा करत होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या प्रशिक्षण केंद्राबाबत सकारात्मकता दर्शवत सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रशिक्षण केंद्रास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विकासवादी भूमिकेमुळे सातारा जिल्ह्यात या प्रशिक्षण केंद्राच्या रूपाने महत्त्वपूर्ण शासकीय आस्थापना उभारली जात आहे, अशी भावना मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. 

तसेच पाटण तालुक्यातील मौजे वाटोळे येथे होणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राकरिता ३४८ कोटी रुपयांचा खर्च येणार असून ५० एकर जागा लागणार आहे. तसेच ५१ नवीन पदे प्रशिक्षण केंद्रासाठी मंजूर करण्यात आली आहेत. सुरुवातीला दोन वर्षे पोलीस विभागातील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांची प्रतिनियुक्तीवर सेवा घेऊन प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. 

ते पुढे म्हणाले की, राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनास महसूल देणाऱ्या प्रमुख विभागांपैकी एक आहे. या विभागाद्वारे २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुमारे २१ हजार ५५० कोटी रुपये इतका महसूल जमा करण्यात आलेला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता २५ हजार २०० कोटी रुपये इतके महसुली उद्दिष्ट विभागाला देण्यात आले आहे. या उद्दिष्टाची प्रतिपूर्ती करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले. 

............ 
(समाप्त) 
............

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील कामांसाठी 11 कोटी 81 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. मागासवर्गीय वस्तींमधील अभ्यासिका,साकव,स्मशानभूमी,विद्युत विकास,सभामंडप व लघु पाटबंधाऱ्यांची कामे लागणार मार्गी.

 


दौलतनगर दि.13:- पाटण विधानसभा मतदारसंघातील पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत नाविण्यपूर्ण योजना मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका,साकव,जनसुविधा स्मशानभूमी कामे, विद्युत विकास योजनेतील वाढीव वस्त्यांना विद्युतीकरणाची कामे,स्थानिक व डोंगरी विकास निधी तसेच लघु पाट बंधारे विभागांतर्गत वळण बंधारा व पाण्याचे आडवे पाटांचे दुरुस्तीचे कामे अशा विविध विकास कामांसाठी 11 कोटी 81 लक्ष 18 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

           प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की,पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमधील अभ्यासिकांचे कामांना सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनतील नाविण्यपूर्ण योजना मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका बांधणे या योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी मारुलहवेली,सातर,उधवणे,आडूळ गावठाण व बनपूरी या गावांतील अभ्यासिकांची कामे प्रस्तावित केली होती.त्यानुसार या मागासवर्गीय वस्त्यांमधील अभ्यासिकांचे प्रस्ताव हे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सहाय्यक समाज कल्याण आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्यानंतर पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मारुलहवेली,सातर,उधवणे,आडूळ गावठाण व बनपूरी या 05 गावांतील अभ्यासिकांचे कामांसाठी प्रत्येकी 18 लाख या प्रमाणे नाविण्यपूर्ण योजना मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका बांधणे या योजने अंतर्गत 90 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.विशेष घटक साकव योजने अंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांमधील पोहोच रस्त्यांवरील ओढयावर साकव बांधणेच्या कामांमध्ये मोरेवाडी कुठरे येथे लोकरवस्ती रस्त्यावर साकव 49.99 लक्ष, धावडे मातंगवस्ती रस्त्यावर साकव 47.19 लक्ष, मणदुरे बौध्दवस्ती रस्त्यावर साकव 53.39 लक्ष, दिवशी बुद्रुक येथे मागासवर्गीय वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साकव 50 लक्ष  असा एकूण 2 कोटी निधी मंजूर झाला आहे.जनसुविधा योजनेतून स्मशानभूमींचे कामांमध्ये दिवशी खुर्द जंगम समाजासाठी दफनभूमी 4 लक्ष, धनावडेवाडी निगडे,ता.पाटण येथे स्मशानभूमी 4 लक्ष, निगडे येथे स्मशानभूमी 4 लक्ष,निवी येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, पांढरेपाणी येथे स्मशानभूमी व निवारा शेड 4 लक्ष, पाळशी येथे स्मशानभूमी 4 लक्ष, बांबवडे येथे  स्मशानभूमी शेड व वेटींग शेड 4 लक्ष, बोंद्री येथे स्मशानभूमीशेड व वेटींग शेड 4 लक्ष, म्हारवंड येथे स्मशानभूमी 4 लक्ष, सातर गावठण  येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष,आंबेघर तर्फ मरळी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, आटोली पुनर्वसन येथे स्मशानभूमी रस्ता खडीकरण डांबरीकरण 4 लक्ष, गुरेघर स्मशानभूमी व पोहोच रस्ता 4 लक्ष, गोकूळ तर्फ पाटण स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, चाळकेवाडी  बेलाचीआळी ते स्मशानभूमी रस्ता सुधारणा 4 लक्ष, भिकाडी  स्मशानभूमी निवारा शेड व रस्ता सुधारणा 4 लक्ष, शितपवाडी  स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, पाडळोशी स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, सळवे स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, साबळेवाडी  येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत 4 लक्ष, बाहे येथे स्मशानभूमी 4 लक्ष, मारुल तर्फ पाटण बौध्दवस्ती येथे स्मशानभूमी 4 लक्ष, केरळ स्मशानभूमी शेड 4 लक्ष, काठी  स्मशानभूमी निवारा शेड व रस्ता सुधारणा 4 लक्ष, काळगाव  यथे स्मशानभूमी सुधारणा 4 लक्ष, राजवाडा घाणव येथे स्मशानभूमी 4 लक्ष, आंब्रुळे येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, गणेवाडी ठोमसे  येथे स्मशानभूमी शेड 4 लक्ष, घोटील येथे  स्मशानभूमी शेड 4 लक्ष अशी एकूण 1 कोटी 20 लक्ष निधी मंजूर झाला आहे.तर जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत विद्युत विकास योजने अंतर्गत वाढीव वस्त्यांमध्ये पथदिप उर्जीकरण करणे यामध्ये बाचोली 0.88 लक्ष,पाचगणी बाहे 1.69 लक्ष,रामेल शेळकेवस्ती जि.प.शाळा 1.71 लक्ष,पाळशी दत्त आवाड थ्री फेज 1.72 लक्ष,मल्हारपेठ 1.91 लक्ष्ज्ञ,बाहे पाचगणी 2.51 लक्ष,नाणेल 2.64 लक्ष,काळगाव 2.95 लक्ष,जंगलवाडी चाफळ 3.47 लक्ष,सुळेवाडी 4.26 लक्ष,मराठवाडी दिवशी खुर्द 4.33 लक्ष,गोवारे 437 लक्ष,काढोली 4.94 लक्ष,गावडेवाडी 8 लक्ष,टोळेवाडी 2.22 लक्ष या कामांचा समावेश असून यासाठी  49.67 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सन 2023-24 स्थानिक विकास निधीतून गलमेवाडी मधलीआळी ओढयावर मोरी 12 लक्ष, धामणी बौध्दवस्ती लकडेआळी रस्ता 15 लक्ष,कदमवाडी नाटोशी सभामंडप 13 लक्ष,कोळणे गोवारे सभामंडप 8 लक्ष, माणगाव सभामंडप 13 लक्ष्‍ा,मुठ्ठलवाडी चौगुलेवाडी पाटील आवाड आर.सी.सी.गटर 7 लक्ष, किसरुळे पथपद सुधारणा व पेव्हर ब्लॉक 10 लक्ष,सुर्याचीवाडी नाणेगाव बु पेव्हर ब्लॉक 15 लक्ष,पश्चिम सुपने वरचा गायकवाड मळा ते हंबीरराव गायकवाड यांचे घर रस्ता 20 लक्ष, तामिणे रासाई मंदिर सभामंडप 13 लक्ष, केळोली वरची सभामंडप 13 लक्ष, गोरेवाडी मुरुड सभामंडप 13 लक्ष,म्होप्रे बेघरवस्ती सभामंडप 13 लक्ष,माईंगडेवाडी जिंती सभामंडप 13 लक्ष, दुधडेवाडी मरळी सभामंडप 13 लक्ष, मस्करवाडी पाटीलवाडी सभामंडप 13 लक्ष, चव्हाणवाडी धामणी सभामंडप 13 लक्ष, तारळे संत गोरोबा काका कुंभार समाज कुंभारवाडा सभामंडप 13 लक्ष, ढेरुगडेवाडी येराड अंबादेवी मंदिर सभामंडप 13 लक्ष, मरळी गोसावी समाज जिवंत समाधी मठासमोर सभामंडप 13 लक्ष, येरफळे जोतिबा मंदिर सभामंडप 13 लक्ष, साखरी सभामंडप 13 लक्ष, उत्तर तांबवे सभामंडप 13 लक्ष, भोळेवाडी भोळाईदेवी मंदिर सभामंडप 13 लक्ष, सुपने सभामंडप 20 लक्ष, मंद्रुळकोळे पाटीलआवाड दत्त मंदिर सभामंडप 13 लक्ष, पाडळी संजयनगर दलितवस्ती सभामंडप 13 लक्ष, कळंत्रेवाडी कुंभारगाव सभामंडप 13 लक्ष, कुंभारगाव बामणवाडी सभामंडप 13 लक्ष व आबईचीवाडी धनगरवस्ती सभामंडप 13 लक्ष अशा एकूण 04 कोटी 06 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सन 2023-24 डोंगरी विकास निधीतून आरेवाडी स्मशानभूमी रस्ता 6.21 लक्ष, उत्तर तांबवे शाळा दुरुस्ती 2.07 लक्ष, केंजळवाडी निवडे अंगणवाडी इमारत 11.25 लक्ष, बांबवडे अंगणवाडी  इमारत 11.25 लक्ष, शिंदेवाडी नाईकबा वस्ती अंगणवाडी इमारत 11.25 लक्ष, ढेरुगडेवाडी येराड अंगणवाडी इमारत 11.25 लक्ष,आंब्रुळे शाळा दुरुस्ती 3.57 लक्ष, सळवे नळ पाणी पुरवठा योजना विहिर व साठवण टाकीसह दुरुस्ती 20 लक्ष,मणेरी चिंचेचे आवाड साठवण टाकी 10 लक्ष, धावडे सभामंडप 13 लक्ष, सदुवर्पेवाडी सळवे नळ पाणी पुरवठा योजना 15 लक्ष अशा एकूण 114.85 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.लघु पाटबंधारे विभागांतर्गत वळण बंधारा व पाण्याचे पाट दुरुस्तीसाठी सन 2023-24 चे जिल्हा वार्षिक आराखडयातून  मरळी गव्हाणवाडी वळण बंधारा 15 लक्ष, कुठरे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा दुरुस्ती 45 लक्ष, कोकीसरे वळण बंधारा दुरुस्ती 10 लक्ष, सडाबोडकी पाझर तलाव दुरुस्ती 7 लक्ष, वाटोळे वळण बंधारा 17 लक्ष, तोंडोशी वळण बंधारा पाट दुरुस्ती 10 लक्ष, मणदुरे खडकात वळण बंधारा दुरुस्ती 15 लक्ष,कडवे बुद्रुक ग्रामतलाव दुरुस्ती 7 लक्ष, तारळे किडके धरण वळण बंधारा व पाट दुरुस्ती 10 लक्ष, बामणेवाडी भांबे पाट दुरुस्ती 10 लक्ष, काठी पाट दुरुस्ती 10 लक्ष, मराठवाडी दिवशी खुर्द साठवण हौद व पाट 25 लक्ष व डेरवण वळण बंधारा दुरुस्ती 10 लक्ष, बनपेठवाडी शेती पाट दुरुस्ती 10 लक्ष, येराड शांतीनगर पाट दुरुस्ती 5 लक्ष या एकूण 02 कोटी 06 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून पाटण विधानसभा मतदार संघातील डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये ही विकास कामे मार्गी लागणार आहेत.

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 05 कोटींचा निधी मंजूर. पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध धार्मिक व पर्यटन स्थळांचा होणार विकास.



दौलतनगर 14 : पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील श्री निनाईदेवी मंदिर मरळी,जानाई मंदिर निवकणे, नवसरी देवी मंदिर नवसरी, जानाई मंदिर मालोशी, जानाई मंदिर जाळगेवाडी,वाघनाथ मंदिर पाडळोशी, पद्मावती मंदिर वनकुसवडे, निनाईदेवी  मंदिर मंद्रुळहवेली, जनार्धन स्वामी महाराज मठ वसंतगड, विठ्ठल रुक्मिणी  मंदिर तांबवे व श्री दत्त मंदिर मल्हारपेठ या धार्मिक व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळांचा विकास पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील शिफारस केलेल्या  पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

                   प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत पुढे म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध पर्यटन व तिर्थक्षेत्र  स्थळांच्या ठिकाणी आवश्यक अशा मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत संबंधित गावातील ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचेकडे निवेदनाव्दारे विनंती केलेली होती. पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रसिध्द असलेल्या या धार्मिक व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविल्यास या पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांची  गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याने पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील श्री निनाईदेवी मंदिर मरळी,जानाई मंदिर निवकणे, नवसरी देवी मंदिर नवसरी, जानाई मंदिर मालोशी, जानाई मंदिर जाळगेवाडी,वाघनाथ मंदिर पाडळोशी, पद्मावती मंदिर वनकुसवडे, निनाईदेवी  मंदिर मंद्रुळहवेली, जनार्धन स्वामी महाराज मठ वसंतगड, विठ्ठल रुक्मिणी  मंदिर तांबवे व श्री दत्त मंदिर मल्हारपेठ या पर्यटन स्थळांचा विकास होण्यासाठीचा पर्यटन आराखडा मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांचेकडे शिफारस केली होती.त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघातील या पर्यटन विकास आराखडयाला प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 05 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाचे पर्यटन विभागाने पारित केला आहे.मंजूर झालेल्या पर्यटन विकासाच्या कामांमध्ये मरळी येथील निनाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 250 लक्ष, निवकणे जानाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, नवसरी नवसरीदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, मालोशी श्री जानाईदेवी मंदिर परिसर सुशोभिकरण 25 लक्ष, जाळगेवाडी जानाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष,पाडळोशी श्री वाघनाथ मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, वनकुसवडे बागलादेवी पद्मावतीदेवी मंदिर परिसर सुधाणा 25 लक्ष,मंद्रुळहवेली निनाईदेवी मंदिर परिसर संरक्षक भिंत 25 लक्ष, वसंतगड जनार्धन स्वामी महाराज मठ रस्ता सुधारणा 25 लक्ष, तांबवे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुधारणा 25 लक्ष व मल्हारपेठ श्री दत्त मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष अशा एकूण 05कोटी रुपयांचा कामांचा समावेश असून पाटण विधानसभा मतदारसंघातील धार्मिक व पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांनी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तर प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या विकास कामांना तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात लवकरच जिल्हास्तरीय अधिकारी यांची बैठक आयोजित करुन या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने करुन ही कामे लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात संबंधित शासकीय अधिकारी यांना सूचना करण्यात येणार असल्याचे शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.

  

Wednesday 13 March 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून अल्पसंख्यांक विभागांतर्गत 01 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर. पाटण मतदारसंघातील मुस्लिमवस्तींमधील विविध विकास कामे लागणार मार्गी.

 

  

 

दौलतनगर दि.13:- पाटण विधानसभा मतदार संघातील मुस्लिमवस्तीमध्ये आवश्यक असणाऱ्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पाद शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाचे मंत्री ना.अब्दुल सत्तार यांचेकडे विविध विकास कामांची शिफारस करुन सातत्याने पाठपुरावा केला होता.पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या शिफारशीनुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील मुस्लिमवस्ती अंतर्गत असणाऱ्या विकास कामांना सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये रुपये 01 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाने पारीत केला असल्याची माहिती ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

              प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास आलेल्या अल्पसंख्यांक लेाकसमुहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचविण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम राज्य शासनामार्फत कार्यान्वित करण्यात आला असून अल्पसंख्यांक समाज असलेल्या मुस्लिमवस्त्यांमधील विविध विकास कामांना राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून मंजूरी देण्यात येत आहे. यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील मुस्लिमवस्तीमध्ये आवश्यक असणाऱ्या विकास कामांना महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागाकडून तातडीने निधी मंजूर होणेकरीता महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अल्पसंख्यांक विकास विभागाचे मंत्री ना.अब्दुल सत्तार यांचेकडे शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील मुस्लिमवस्ती अंतर्गत असणाऱ्या विकास कामांना सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये रुपये 01 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये मारुल तर्फ पाटण येथे दफनभूमी संरक्षक भिंत 20 लक्ष, कडवे बुद्रुक येथे मुस्लिम समाज दफनभूमी रस्ता सुधारणा व संरक्षक भिंत 20 लक्ष, पाडळी (केसे) सुफी मदिना मश्जिद येथे शादी खाना इमारत 20 लक्ष, जानुगडेवाडी येथील मुस्लीम समाज कब्रस्तान संरक्षक भिंत  20 लक्ष, पेठशिवापूर मुस्लिम समाज रस्ता सुधारणा 20 लक्ष, तारळे मुस्लिम वस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 20 लक्ष, केसे वारुंजी शिव ते मुस्लिम दफनभूमी रस्ता सुधारणा 20 लक्ष, बेलवडे खुर्द कब्रस्थान संरक्षक भिंतीसह परिसर सुधारणा 10 लक्ष या विकास कामांचा समावेश असून अल्पसंख्याक वस्त्यांमधील विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी ना.अब्दुल सत्तार यांचे आभार मानले. तर लवकरच या विकास कामांची निविदा प्रक्रिया करण्यात येणार असून या कामांना तातडीने सुरुवात करण्यात यावी अशा सूचना मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी  प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

Tuesday 12 March 2024

लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयास मान्यता पाटण तालुक्यातील पहिलेच कृषी महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम प्रवेश सुरू होणार

 

मुंबई : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यातून पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास नवीन कृषी महाविद्यालय सुरू करण्यास सोमवारी कृषी विभागाकडून मान्यता देण्यात आली. यामुळे पाटण तालुक्यात पहिल्यांदाच कृषी महाविद्यालय सुरू होणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहेत. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानास या नवीन महाविद्यालयास मान्यता मिळाल्याने आदरांजली वाहिली जात आहे, अशी भावना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे. 


पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सहकार क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. कारखाना संस्थेमार्फत कृषी महाविद्यालय सुरू करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई हे प्रयत्नशील होते. त्याबाबतच्या प्रस्तावास सोमवारी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मान्यता दिल्याने आता लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याकडून कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर नवीन कृषी महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हे महाविद्यालय असणार असून प्रतिवर्षी ६० विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासूनच महाविद्यालय सुरू होणार असून यामुळे पाटण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाची संधी तालुक्यातच उपलब्ध होणार आहे. 


लोकनेते बाळासाहेब देसाई हे १९६२-६३ या काळात राज्याचे कृषी मंत्री असताना त्यांनी कृषी क्षेत्राविषयी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले होते. त्यांच्या स्मृतींना या नवीन कृषी महाविद्यालयामुळे आदरांजली वाहिली जात असल्याची भावना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे. याबाबत ते म्हणाले की, 'कसेल त्याची जमीन' या दृष्टिकोनातून कृषी खात्याचे मंत्री असताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी शेती सुधारणेच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या. शेतीसाठी बडींग योजना, विहीर खोदाई, पाणी उपसण्यासाठी तगाईवर इंजिन देणे, नव्या जातीच्या पिकांचे संशोधन, अन्नधान्ये, कडधान्ये, फळबाग व नगदी पिके वाढवणे, देविराज लांब धाग्याच्या कापसाची योजना इत्यादींमधून त्यांनी शेतकऱ्यांना फायदा करून दिला. कृषी, पशुसंवर्धन पदवीधरांची वेतनश्रेणी वाढवून अभ्यासू व कर्तव्यदक्ष लोक कृषी खात्याकडे वळवण्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते. तसेच त्यांनी कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयाचीही स्थापना केली होती, असे सांगून आता पाटण येथे त्यांच्या नावाने कृषी महाविद्यालय सुरू होत आहे, याचे समाधान असल्याची भावना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली. पाटण तालुक्यात हे पहिलेच कृषी महाविद्यालय ठरणार असून यामुळे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देता आली, याचा आनंद असल्याची भावना व्यक्त करून या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. 


............ 

(समाप्त) 

............

Monday 4 March 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाईं यांचा मंगळवारचा जनता दरबार रविवार दि. 10 मार्च रोजी आयोजित.

 

 

दौलतनगर दि.04:- पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या जागेवर सोडविण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली  मंगळवार दि.05 मार्च,2023 सकाळी 11.00 वा.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या प्रांगणात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.परंतू पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मुंबई येथील मंत्रालयीन कामाकाजामुळे हा जनता दरबार रविवार दि. 10 मार्च रोजी सकाळी 10.00 ते दु.02.00 वा.पर्यंत या वेळेत लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या प्रांगणात आयोजित केला आहे.

           पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली  रविवार दि.10 मार्च,2024 रोजी सकाळी 10.00 ते दु.02.00 वा.पर्यंत या वेळेत पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या प्रांगणात आयोजित जनता दरबाराला आम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आप-आपले प्रलंबित प्रश्न,समस्या तसेच विकासकामांबाबतच्या अडचणींचा तातडीने निपटारा करुन घेणेसाठी आपल्या समस्यांची लेखी निवेदने या जनता दरबारामध्ये सादर करावीत,असे आवाहनही शेवटी प्रसिध्दी पत्रकांत नमूद केले आहे.

Friday 1 March 2024

पालकमंत्री ना.शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि. 05 मार्चला पाटणला जनता दरबार. जनता दरबारास जिल्हास्तरीय अधिकारी राहणार उपस्थित. जनता दरबारामध्ये आम जनतेने समस्यांचे लेखी निवेदन घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन.

 


 

दौलतनगर दि.02:-पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या जागेवर सोडविण्याकरीता पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली  मंगळवार दि.05 मार्च,2023 सकाळी 11.00 वा.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या प्रांगणात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून त्यांचे अध्यक्षतेखाली पहिलाच जनता दरबार होत असून या जनता दरबारामध्ये ना.शंभूराज देसाई हे जनतेच्या समस्या व विकास कामासंदर्भातील अडी-अडचणी जाणून घेणार आहेत.ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखालील जनता दरबारास जिल्हास्तरीय अधिकारी यांचेसह तालुकास्तरीय सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत.आम जनतेने आपल्या समस्यांची लेखी निवेदने घेऊन मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन ना.शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले  आहे.

        पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रथमत: पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार झालेनंतर पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या तालुका व जिल्हास्तरावरील असणाऱ्या प्रलंबित समस्या व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणी या जागेवर सोडवून देणेकरीता सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेवून जनतेच्या जनता दरबार आयोजित करण्याची नविन संकल्पना राबविली होती.या जनता दरबारामध्ये मतदारसंघातील जनतेच्या अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर होत होता.जनतेचे प्रश्न जागेवरच मार्गी लागत असल्यामुळे आम जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पहावयास मिळत होते जनता दरबारास मतदारसंघातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसादही दिला होता. मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी ही संकल्पना अखंडीत राबविली. पाटण मतदारसंघातील कराड तालुक्यातील सुपने मंडलकरीताही त्यांनी स्वतंत्र्य जनता दरबाराचे आयोजन करुन या विभागातील जनतेचे प्रश्न जागेवर मार्गी लावले होते.

       त्याचप्रमाणे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली  मंगळवार दि.05 मार्च,2023 सकाळी 11.00 वा.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या प्रांगणात आयोजित केलेल्या जनता दरबारास आम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आप-आपले प्रलंबित प्रश्न,समस्या तसेच विकासकामांबाबतच्या अडचणींचा तातडीने निपटारा करुन घेणेसाठी आपल्या समस्यांची लेखी निवेदने या जनता दरबारामध्ये सादर करावीत,असे आवाहनही शेवटी प्रसिध्दी पत्रकांत नमूद केले आहे.

 

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून ग्वाही अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या निर्मितीस मान्यता दिल्याबद्दल सकल मातंग समाजातर्फे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा जाहीर सत्कार मातंग समाजाच्या मागण्यांबाबत पाठपुरावा केल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून कौतुक शनिवार, ०२ मार्च २०२४

 

मुंबई : मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात साहाय्य उपलब्ध व्हावे, तसेच मातंग समाजाच्या विकासाच्या दृष्टीने अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या निर्मितीची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मातंग समाजाकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेली ही मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि या प्रश्नी पाठपुरावा करणारे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा सकल मातंग समाजाच्या वतीने शुक्रवारी जाहीर सत्कार करण्यात आला. मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिली. तसेच मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी याप्रसंगी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे कौतुकही केले. सकल मातंग समाजाच्या वतीने उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पावनगड या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.


मातंग समाजाच्या विकासाच्या दृष्टीने सकल मातंग समाजाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्यात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मातंग समाजाच्या मागण्यांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने शासनाने सकारात्मक पावले उचलली आहेत. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मातंग समाजाच्या मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे. २५ मार्च २०२३ रोजी विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी २० जुलै २०२३ आणि ४ ऑक्टोबर २०२३ रोजी मातंग समाजाच्या शिष्टमंडळासमवेत आढावा बैठका घेतल्या. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अनुसूचित जातीचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करण्याबाबत प्रशासकीय व वैधानिक माहितीचे संकलन व अभ्यास करण्याकरिता १२ ऑक्टोबर २०२३ रोजी शासनस्तरावर शिष्टमंडळ गठीत करण्यात आले. या शिष्टमंडळाकडून कर्नाटक, पंजाब व हरियाणा या राज्यांना भेट देण्यात आलेली आहे. आंध्रप्रदेश, तेलंगना व तमीळनाडू या राज्यांना भेट देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा २०२२ या वर्षापासून एक हजार कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जन्मस्थळ असलेल्या वाटेगाव (ता. वाळवा, जि.सांगली) येथील स्मारकासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली.


नुकत्याच संपन्न झालेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजाच्या कल्याणासाठी 'अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था' (आर्टी) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. या निर्णयामुळे मातंग समाजात आनंदाची भावना असून अनेक वर्षांपासूनच्या मागणीची पूर्तता होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत सकल मातंग समाजाच्या वतीने शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि या मागणीचा पाठपुरावा करणारे उत्पादन शुल्क  मंत्री शंभूराज देसाई यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने सरकार सकारात्मक असून मातंग समाजाच्या इतर मागण्याही मार्गी लावल्या जातील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळी आश्वस्त केले. तसेच मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा करत असल्याबद्दल मंत्री शंभूराज देसाई यांचेही त्यांनी यावेळी कौतुक केले. महायुती सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. जनसामान्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना सरकार राबवत आहे. दिलेला शब्द आम्ही पाळतो. मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावणारे आरक्षण आम्ही दिले आहे. महायुती सरकार सर्वच समाजघटकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यावेळी म्हणाले. तसेच शनिवारी पुणे येथील संगमवाडीमध्ये क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळी केली.


याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यासह दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीचे सदस्य प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, मारुती वाडेकर, राम चव्हाण,  बाबुराव मुखेडकर, शीलाताई लोमटे, सुरेश साळवे, पंडितराव सूर्यवंशी, लहुजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे, राजाभाई सूर्यवंशी, डॉ. अंकुश गोतावळे, नामदेव साठे, अशोक ससाने, दीपक आवारे, कैलास डाखोरे, गुलाब साठे, राजेंद्र अडागळे, रमेश गालफाडे आदी सकल मातंग समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.