दौलतनगर दि.02:-पाटण विधानसभा मतदारसंघातील
सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या जागेवर सोडविण्याकरीता पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार
दि.05 मार्च,2023 सकाळी 11.00 वा.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या प्रांगणात जनता
दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून त्यांचे
अध्यक्षतेखाली पहिलाच जनता दरबार
होत असून या जनता
दरबारामध्ये ना.शंभूराज देसाई हे जनतेच्या समस्या व विकास कामासंदर्भातील अडी-अडचणी
जाणून घेणार आहेत.ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखालील जनता दरबारास जिल्हास्तरीय अधिकारी
यांचेसह तालुकास्तरीय सर्व शासकीय यंत्रणांचे खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत.आम
जनतेने आपल्या समस्यांची लेखी निवेदने घेऊन मोठया संख्येने उपस्थित रहावे,असे
आवाहन ना.शंभूराज देसाई यांच्या कार्यालयाकडून प्रसिध्दी पत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रथमत: पाटण विधानसभा
मतदारसंघाचे आमदार झालेनंतर पाटण विधानसभा मतदारसंघातील आम जनतेच्या तालुका व जिल्हास्तरावरील
असणाऱ्या प्रलंबित समस्या व विकास कामांसंदर्भातील अडी-अडचणी
या जागेवर सोडवून देणेकरीता सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेवून जनतेच्या जनता
दरबार आयोजित करण्याची नविन संकल्पना राबविली होती.या जनता दरबारामध्ये
मतदारसंघातील जनतेच्या अडी-अडचणींचा निपटारा जागेवरच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर होत होता.जनतेचे
प्रश्न जागेवरच मार्गी लागत असल्यामुळे आम जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पहावयास
मिळत होते
व जनता दरबारास मतदारसंघातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसादही
दिला होता. मतदारसंघाचे
आमदार म्हणून त्यांनी ही संकल्पना
अखंडीत राबविली. पाटण
मतदारसंघातील कराड तालुक्यातील सुपने मंडलकरीताही त्यांनी स्वतंत्र्य जनता
दरबाराचे आयोजन करुन या विभागातील जनतेचे प्रश्न जागेवर मार्गी लावले होते.
त्याचप्रमाणे पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार
दि.05 मार्च,2023 सकाळी 11.00 वा.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या प्रांगणात
आयोजित केलेल्या जनता दरबारास आम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आप-आपले
प्रलंबित प्रश्न,समस्या तसेच विकासकामांबाबतच्या अडचणींचा तातडीने निपटारा करुन घेणेसाठी
आपल्या समस्यांची लेखी निवेदने या जनता दरबारामध्ये सादर करावीत,असे आवाहनही शेवटी
प्रसिध्दी पत्रकांत नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment