दौलतनगर दि.04:- पाटण विधानसभा मतदारसंघातील
सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, समस्या जागेवर सोडविण्याकरीता पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार
दि.05 मार्च,2023 सकाळी 11.00 वा.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या प्रांगणात जनता
दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.परंतू पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मुंबई येथील मंत्रालयीन कामाकाजामुळे
हा जनता दरबार रविवार दि. 10 मार्च रोजी सकाळी 10.00 ते दु.02.00 वा.पर्यंत या वेळेत
लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटणच्या प्रांगणात
आयोजित केला आहे.
पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि.10 मार्च,2024 रोजी सकाळी 10.00 ते दु.02.00 वा.पर्यंत
या वेळेत पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती
पाटणच्या प्रांगणात आयोजित जनता दरबाराला आम जनतेने बहुसंख्येने उपस्थित राहून आप-आपले
प्रलंबित प्रश्न,समस्या तसेच विकासकामांबाबतच्या अडचणींचा तातडीने निपटारा करुन घेणेसाठी
आपल्या समस्यांची लेखी निवेदने या जनता दरबारामध्ये सादर करावीत,असे आवाहनही शेवटी
प्रसिध्दी पत्रकांत नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment