Thursday 5 September 2024

पाटण मतदारसंघातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात प्रस्ताव सादर करा. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना. प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थिती बैठक संपन्न.

 

                दौलतनगर,ता.05: पाटण विधानसभा मतदारसंघातील वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशत: बाधित जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांच्या रोख रकमेबाबत,तारळी प्रकल्पात 100 टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पामुळे अंशत: बाधित झालेल्या माथणेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसनाबाबत वरील प्रकल्पांच्या प्रलंबीत कामासंदर्भात संबंधित विभागने तातडीने प्रस्ताव सादर करावेत अशा सुचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे विनंतीवरुन मंत्रालय मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील  यांनी  केल्या.

              मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या उपसिथतीमध्ये मंत्रालय मुंबई या ठिकाणी वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशत: बाधित मौजे जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांचया प्रस्तावाबाबत,तारळी प्रकल्पामध्ये 100 टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्यात वाढ करण्याबाबत  आणि उत्तर मांड धरण मध्यम प्रकल्पामुळे अंशत: बाधित झालेल्या माथणेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसन प्रस्तावाबाबत बैठक झाली.या बैठकीस जलसंपदा व पुनर्वसन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातून अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांचे दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

              मदत व पुनर्वसन मंत्री यांचे दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशत: बाधित जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांच्या रोख रक्कम मिळण्यासाठीचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित असून जिंती व निगडे येथील प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसनाऐवीज रोख मिळावी अशी आग्रही मागणी असल्याने जिंती व निगडे या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या रोख रक्कमेचा प्रस्तावाला मंजूरी देण्यात यावी.तसेच तारळी धरण प्रकल्पात 100 टक्के जमीन गेलेले अनेक प्रकल्पग्रस्त असून पूर्ण जमीन धरणप्रकल्पासाठी संपादित झाल्याने या प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत तारळी धरण प्रकल्पग्रस्तांची सातत्याची मागणी असल्याचे मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी निदर्शनास आणून देत तारळी प्रकल्पग्रस्तांच्या उदरनिर्वाह भत्यामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी द्यावी. तर उत्तर मांड मध्यम प्रकल्पामुळे अंशत: बाधित झालेल्या माथणेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसन करणे गरजेचे असून उत्तर मांड धरण प्रकल्पामध्ये 46 घरे ही पूररेषेत येत असल्याने अद्यापही ही कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास असून या कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने माथणेवाडी येथील 46 कुटुंबांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची माथणेवाडी येथील प्रकल्पग्रस्तांची सातत्याची मागणी असून माथणेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसनासाठी संबंधित विभागाने तातडीने प्रस्तावाला मंजूरी द्यावी, अशा पाटण विधानसभा मतदासंघातील वांग मराठवाडी,तारळी व उत्तर मांड धरण प्रकल्पांतर्गत येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या  प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करुन या प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजूरी द्यावी अशी मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांचेकडे विनंती केली. यावेळी मंत्री ना. अनिल पाटील यांनी सांगीतले की, उत्तर मांड मध्म प्रकल्पामधील अंशत: बाधित झालेल्या माथ्णेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसनासाठी  कृष्णा खोरे विकास महामंडळाने नियामक मंडळामध्ये मान्यता घेऊन प्रस्ताव तातडीने सादर करावा. तसेच वांग मध्यम प्रकल्पांतर्गत अंशत: बाधित मौजे जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या रोख रकमेबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने वित्त,विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायासह पाठवावेत तर तारळी प्रकल्पात जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाहासाठी येणाऱ्या खर्चाबाबतची वस्तुनिष्ठ माहितीसातारा जिल्हाधिकारी कार्यालयाने अभिप्रायासह तातडीने सादर करावी.प्रकल्पग्रस्तांना देय असणारी मदत वेळीच  मिळाली पाहिजे यासाठी अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावना संवेदनशीलपणे जाणून घ्याव्यात व प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित कामे मार्गी लावावीत अशा सूचना मंत्री ना.अनिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.


No comments:

Post a Comment