दौलतनगर दि.26:- गेली सहा ते सात दिवस पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत
असल्याने सर्व नद्या दुधडी भरुन वाहू लागल्या आहेत. सतत पडत असलेल्या मुसळधार
पावसामुळे नद्यावरील पूल हे पुराचे पाण्याखाली जाऊन परिसरातील वाहतूक विस्कळीत होत
आहे. मोरणा विभागातील मोरणा नदीवर असलेल्या गोकूळ तर्फ पाटण, आडदेव ते कुसरुंड रस्त्यावरील पूल तसेच कोयना नदीवरील मुळगाव
पूल या तीन पुलांचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पाहणी दौरा करुन पुरपरिस्थितीची माहिती घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील
गाढे,तहसिलदार अनंत गुरव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय शिंदे,गिरीश सावंत,जिल्हा
परिषद बांधकाम विभाग उपअभियंता चव्हाण यांचेसह आरोग्य विभाग,पोलीस विभागचे संबंधित
अधिकारी
यांचेसह विविध गावातील
सरपंच,उपसरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
गत सहा
ते सात दिवसापासून
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी
असणाऱ्या कोयना धणाच्या पाणीसाठयात
झपाटयाने वाढ होत आहे. पाटण तालुक्यात
सर्वदूर मुसळधार पाऊस पडत
आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये जादा
पावसाची नोंद झाली असून
कोयना धरणात 72 टिएमसी पाणी साठा झालाआहे. गत चार दिवसा
पासून पडत असलेल्या मुसळधार
पावसामुळे तारळी,उत्तर मांड धरण, मोरणा गुरेघर,वांग
मराठवाडी,चिटेघर,महिंद या लहान मोठया धरणांत पाण्यासाठयामध्ये मोठी वाढ झाली असून
तारळी,उत्तर मांड, मोरणा,केरा,वांग या नद्या दुधडी भरून वाहू
लागल्या असून या नद्यांच्या पाणी
पातळीतही वाढ झाली असल्याने
काही गावे काही काळासाठी
संपर्कहिन झाली होती. मोरणा विभागातील गोकूळ तर्फ पाटण येथील पूलावरुन पाणी जात असल्याने
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीची उपाय योजना म्हणून प्रशासनाने या पूलावरील
वाहतूक बंद केली आहे. तर आडदेव ते कुसरुंड या रस्त्यावरील पूलाचा भराव वाहून गेला असल्याने
या मार्गावरीलही वाहतूक सध्या बंद आहे. तसेच कोयना नदीमधून सध्या 32100 हजार क्यूसेक
पाणी सोडल्याने मुळगाव येथील कोयना नदीवरील
पूलाला पाणी लागल्याने याही पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांनी पाटण येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे
उपस्थितीमध्ये पूरपरिस्थितीची आढावा बैठक घेऊन पूरपरिस्थितीबाबतच्या सद्यस्थितीची सर्व
माहिती संबंधित अधिकारी यांचेकडून घेऊन पूरपरिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या
आवश्यक उपाययोजनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना करत या बैठकीनंतर सर्व शासकीय अधिकारी
यांचे समवेत मोरणा विभागातील मोरणा नदीवर असलेल्या गोकूळ
तर्फ पाटण, आडदेव ते कुसरुंड रस्त्यावरील
पूल तसेच कोयना नदीवरील मुळगाव पूल या तीन पुलांचा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई
यांनी पाहणी दौरा करत सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या
पुलांची तसेच रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करुन यावरुन वाहतूक सुरळीत
करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अतिवृष्टीच्या कालावधीत पुलावरुन पाणी वाहत असताना
पोलीस विभागाने सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅरिकेटींग करुन वाहतूक तात्काळ बंद
करण्याबरोबर रात्री संबंधित पुलांवर बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना केल्या. तसेच
महसूल विभागाने पुलावरुन ये-जा करणाऱ्या नागरीकांना
प्रशासनामार्फत योग्य ती खबरदारी घेण्यासंदर्भात गावामध्ये सर्व नागरीकांना माहिती
देण्यात यावी जेणेकरुन कोणतीही अनुचित घटना
घडणार नाही याची प्रशासनाकडून काळजी घेण्यासंदर्भात उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांसमवेत
चर्चा केली.
No comments:
Post a Comment