दौलतनगर दि.08:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत
विषयक कामांसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी सन
2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत कामांचा
समावेश होण्यासाठी शिफारस केली होती. पाटण मतदारसंघातील वीज पुरवठा सुरळीत
होण्याचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाढीव पोल, नवीन रोहित्र, थ्री फेज लाईन,गंजलेले
पोल बदलणे इत्यादी कामांसाठी निधीची आवश्यकता होती.त्यानुसार पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक
कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत
2 कोटी 88 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज
देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे
की, पाटण विधानसभा मतदारसंघातील डोंगरी व दुर्गम भागातील गावांमधील वीज पुरवठा
सुरळीत होण्याचेदृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या वाढीव पोल, नवीन रोहित्र, थ्री फेज
लाईन,गंजलेले पोल बदलणे इत्यादी कामांसाठी निधीची आवश्यकता होती. या कामांना निधी
मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये
शिफारस केली होतीत्यानुसार पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून पाटण
विधानसभा मतदारसंघातील विद्युत विषयक कामांसाठी सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक
आराखडयामध्ये विद्युत विकास योजने अंतर्गत 2 कोटी 88 लक्ष रुपयांचा निधी मंजूर
झाला वाढीववस्ती विद्युतीकरणांतर्गत आंबेघर किसरुळे
1.41 लक्ष, आंब्रग 0.55 लक्ष, आचरेवाडी नं. 2 0.29 लक्ष, इनामवाडी नाटोशी
बौध्दवस्ती 2.25 लक्ष, कडवे खुर्द 2.88 लक्ष,
कडवे बुद्रुक 2.60 लक्ष, कळंत्रेवाडी
कुंभारगाव 0.71 लक्ष, काटकरवाडी मंद्रुळकोळे 1.04 लक्ष, काठी
4.42 लक्ष, काढणे 1.17 लक्ष, कुठरे 1.22 लक्ष, केर 1.89 लक्ष, खळे ते मालदन रस्ता
2.09 लक्ष, खांडेकरवाडी 2.59 लक्ष,
खिलारवाडी सोनाईचीवाडी 2.90 लक्ष, खुडेवाडी
धायटी 1.09, गलमेवाडी
1.04 लक्ष, गारवडे 1.26 लक्ष, गारवडे 0.74 लक्ष, गुरेघर ता.पाटण प्रशांत पवार यांचे घराकडे 1.04 लक्ष, गुरेघर
0.55 लक्ष, घाटेवाडी मालोशी 2.29 लक्ष, चाळकेवाडी 1.17
लक्ष, चोपदारवाडी 3.65 लक्ष, डावरी 1.06 लक्ष, तोंडोशी 3.12 लक्ष, दाढोली 0.78 लक्ष, दिक्षी 0.56 लक्ष, दिवशी बु 01.00
लक्ष, धावडे 1.27 लक्ष, नवजा 0.70 लक्ष, नवजा 1.04 लक्ष, पांढरेपाणी 3.46 लक्ष,
पाडळी 7.71 लक्ष, पाडळोशी
3.44 लक्ष, पापर्डे 2.55 लक्ष, पाळशी 2.64 लक्ष, बनपेठ 3.51 लक्ष, बहुले 2.08 लक्ष, बांबवडे 4.03 लक्ष, बाचोली 2.13 लक्ष, बाटेवाडी 0.80 लक्ष,
बेलवडे खुर्द 7.18 लक्ष, बोडकेवाडी
3.42 लक्ष, भालेकरवाडी डावरी 1.06 लक्ष, भोकरवाडी सावरघर
3.75 लक्ष, भोळेवाडी 3.36 लक्ष,
मंद्रुळकोळे 1.93 लक्ष, मणदुरे
4.17 लक्ष, मत्रेवाडी 1.46 लक्ष,
मरड कुसवडे 1.34 लक्ष, मराठवाडी
1.49 लक्ष, मल्हारपेठ 4.57 लक्ष,
मळा 1.80 लक्ष, मसुगडेवाडी
दाढोली 1.47 लक्ष, महिंद 2.90 लक्ष, महिंद 0.77 लक्ष, माईंगडेवाडी जिंती 1.97 लक्ष, माजगाव
धुमाळवस्ती 2.38 लक्ष, माजगाव 6.69 लक्ष, मानाईनगर 1.19 लक्ष,
मारुलहवेली 3.00 लक्ष, मारुलहवेली
5.93 लक्ष, मालदन,जाधववाडी व पानवळवाडी 5.65 लक्ष, मिरगाव
1.19 लक्ष, मुळगाव 3.58 लक्ष, मोरगिरी 0.55 लक्ष, मोरगिरी 3.03 लक्ष, म्हारवंड 1.95 लक्ष,
येरफळे 1.73 लक्ष, राजवाडा
घाणव 3.90 लक्ष, लेंढोरी 3.84 लक्ष, वन कुसवडे 2.55 लक्ष,
वर्पेवाडी सळवे 2.42 लक्ष, वस्ती
साकुर्डी ता.कराड 4.05 लक्ष, वाडीकोतावडे 0.55 लक्ष,
विठ्ठलवाडी शिरळ 1.76 लक्ष, शिद्रुकवाडी
वरची कोरिवळे 1.72 लक्ष, शिद्रुकवाडी वरची खळे 1.64 लक्ष, शेंडेवाडी
2.42 लक्ष, शेडगेवाडी विहे 2.90 लक्ष, सडानिनाई 0.78
लक्ष, सडावाघापूर 1.93 लक्ष, सणबूर 3.81 लक्ष, सांगवड 6.64 लक्ष, साईकडे 2.42 लक्ष, साजूर ता.कराड 10.59 लक्ष, सोनवडे 4.17
लक्ष, हावळेवाडी 2.18 लक्ष, हुंबरवाडी
1.06 लक्ष, हेळवाक 4.30 लक्ष, सुपने ता.कराड 6.29 लक्ष, शितपवाडी येथे थ्री
फेज लाईन 1.76 लक्ष, शिंदेवाडी येथे सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेस वीज पुरवठा
2.81 लक्ष, लेंढोरी येथे थ्रीफेज लाईन 2.45 लक्ष, म्हारवंड
11 गंजलेले पोल 2.90 लक्ष, मल्हारपेठ येथील उच्चदाब वाहिनी भूमिगत 11.13 लक्ष, भोळेवाडी
म्होप्रे बेलदरे येथे 16 तास वीज पुरवठा जोडणी 20.70 लक्ष, बाचोली
येथे थ्री फेज लाईन 1.73 लक्ष, पेठशिवापूर वाढीव पाच पोल
व विद्युत पथदिवे लाईन पंधरा गाळे तसेच जुन्या झालेल्या विद्युत वाहिनी खराब
झालेने विद्युत वाहिनी बदलणे 4.61 लक्ष, खबालवाडी येथे नवीन रोहित्र 5.82 लक्ष या कामांचा समावेश
आहे. नव्याने मंजूर झालेल्या विज वितरणाच्या कामांमुळे डोंगरी व दुर्गम भागातील
वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार असून या कामांची तातडीने निविदा प्रक्रिया
करुन ही कामे लवकरात लवकर हाती घेण्याबाबत पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी
संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असल्याची माहिती शेवटी पत्रकांत दिली आहे.
No comments:
Post a Comment