Saturday 12 October 2024

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचा गळीत हंगाम सभासद शेतकरी यांनी यशस्वी करावा.-चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा) लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा 51 वा बॉयलय अग्निप्रदिपन कार्यक्‌रम संपन्न.

 

दौलतनगर दि.12-  लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहिला असून कारखान्याचे विस्तारवाढीचे काम पुर्णत्वाकडे गेले असून कारखान्याचा सन 2024-25 चा गळीत हंगामात कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास देऊन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सभासद शेतकरी यांनी यशस्वी करावा असे आवाहन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई(दादा) यांनी केले.

            ते दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 1 व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,चि.जयराज देसाई,चि.आदित्यराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कारखान्याचे संचालक मा.श्री.सुनिल शिवराम पानस्कर व त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सौ. मंगल सुनिल पानस्कर यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग नलवडे,माजी चेअरमन अशोकराव पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण,ॲङडी.पी.जाधव,ॲङमिलिंद पाटील, सभापती बाळासो पाटील,संचालिका सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर,जालंदर पाटील,संचालकसर्जेराव जाधव,प्रशांत पाटील,शशिकांत निकम,शंकरराव पाटील,बळीराम साळूंखे,लक्ष्मण बोर्गे,सुनील पवार,वाय.के.जाधव,हेमंत पवार, गोरख देसाई,प्रकाशराव जाधव,राजाराम मोहिते,कार्यकारी संचालक सुहास देसाई तसेच कारखान्याचे सर्व संचालक,सभासद,ऊस उत्पादक शेतकरी,अधिकारी,कामगार वर्ग हितचिंतक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

              चेअरमन यशराज देसाई(दादा) म्हणाले की,गेल्या पन्नास वर्षापासून देसाई कारखाना यशस्वीरित्या गाळप करीत आहे. मात्र यावर्षीपासून सर्व शेतकरी सभासद यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 1250 मेट्रिक टनाचा हा कारखाना तीन हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा करण्यात आला आहे.तर आपले लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याने  संपूर्ण एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. असे असतानाही जाणीवपूर्वक बाहेरच्या काऱखान्याला ऊस घालणाऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे असे सांगत ते पुढे म्हणाले की,राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी साखरेचा किमान विक्री दर हा 38 रुपये करावा अशी केंद्र सरकारकडे मागणी केली असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी यासंदर्भात केंद्रीय सहकारी मंत्री ना.अमित शहा यांना भेटून  तालुक्यातील शेतक-यांनी व सभासदांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता देवून गळीत हंगाम य़शस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी प्रयत्न करावेत असे आवाहन चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी शेवटी  केले.

 

 

राहून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास व्यक्त करून कारखान्याच्या शेतकरी सभासदांच्या खात्यावर एफ.आर.पी. ची सर्व रक्कम अदा करून ही संस्था नावारूपाला आणण्यासाठी सभासद शेतकरी यांच्याबरोबर कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग आहे त्यासाठी यावर्षी देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस जाहीर करत असल्याची घोषणा लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई(दादा) यांनी केली.दरम्यान हा निर्णय देसाई कारखान्याच्या सभासद शेतकरी आणि कामगारांना खऱ्या अर्थाने ही दिवाळी भेट ठरली आहे.

 

No comments:

Post a Comment