दौलतनगर दि.14:- पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध
गावांतील प्रसिध्द असलेली तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत
निधी मंजूर होण्यासाठी पर्यटन मंत्री ना.गिरीशजी महाजन यांचेकडे शिफारशी केल्या होत्या.
तर मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमधील अभ्यासिका व पत्र्याचे सभामंडप
बांधण्याची कामे ही सन 2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये प्रस्तावित केली
होती. त्यानुसार प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील
8 कामांना 3 कोटी तर जिल्हा वार्षिक आराखडयातून नाविण्यपूर्ण योजना (विशेष घटक) मधून मागासवर्गीय वस्त्यांमध्ये
अभ्यासिका व सामाजिक सभागृहांचे कामांना 1 कोटी 40 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने
प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले
आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील प्रसिध्द असलेली
तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य
शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत निधी मंजूर होण्यासाठी पर्यटन
मंत्री ना.गिरीशजी महाजन यांचेकडे शिफारशी केल्या होत्या. तर मतदारसंघातील
मागासवर्गीय वस्त्यांमधील अभ्यासिका व सामाजिक सभागृह बांधण्याची कामे ही सन
2024-25 चे जिल्हा वार्षिक आराखडयामध्ये प्रस्तावित केली होती.तसेच या विकास
कामांना निधी मंजूर होण्यासाठी सातत्याचा पाठपुरावा सुरु होता. त्यानुसार
प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून
यामध्ये दौलतनगर श्री गणेश
मंदिर परिसर सुधारणा 100 लक्ष, मालोशी श्री जानाई मंदिर परिसर सुधारणा 20 लक्ष, मारुल तर्फ पाटण शेळकेवस्ती श्री हनुमान मंदिर
परिसर सुधारणा 20 लक्ष, येराड श्री येडोबा मंदिर परिसरामध्ये यात्री निवासासह सुधारणा 55 लक्ष,
पाबळवाडी तारकेश्वर
मंदिर सुशोभिकरण 25 लक्ष, गव्हाणवाडी निनाईदेवी मंदिर परिसर सुधारणा 25 लक्ष, नाडे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुधारणा
30 लक्ष, आटोली
वाघजाई देवी मंदिर रस्ता सुधारणा 25 लक्ष या 8 कामांना 3 कोटींचा निधी मंजूर झाला
आहे.तर पाटण विधानसभा मतदारसंघातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये अभ्यासिका व सभामंडप
बांधण्याच्या कामांमध्ये बाचोली मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लक्ष,
हेळवाक मागासवर्गीय
वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लक्ष, तारळे बौध्दवस्ती वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लक्ष, गारवडे मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका
18 लक्ष, पापर्डे
खुर्द मागासवर्गीय वस्तीमध्ये अभ्यासिका 18 लक्ष, कुठरे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह 25 लक्ष व हेळवाक
मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृह 25 लक्ष या 7 कामांना 1 कोटी 40 लक्ष
रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment