दौलतनगर दि.02:- पाटण विधानसभा मतदारसंघात प्रतिवर्षी होणाऱ्या अतिवृष्टी व
ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे डोंगरी व दुर्गम भागातील अनेक गावांवर डोंगरकडे
कोसळण्यासारखी धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते. दरडी कोसळण्याचा धोका
असलेल्या दरडप्रवण गावांचे सुरक्षिततेच्यादृष्टीने या गावांमध्ये संरक्षक
भिंत,मोरी व गटर बांधकाम तसेच गुरुत्वाकर्षण
टिकवून ठेवणारी भिंत,पुरवठा आणि फिक्सिंग रॉक फॉल प्रोटेक्शन, ड्रेनेज, सिस्टमची
स्थापना/नूतनीकरण,दुरुस्ती,धूप आणि उतार हालचाल कमी करण्यासाठी उपाय,ड्रेनेज वाहिन्या
खोल करण्याच्या कामांचे प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री
ना.शंभूराज देसाई यांनी केल्यानंतर महसूल व वन विभागाचे आपत्ती व्यवस्थापन,मदत व
पुनर्वसन विभागाकडून या दरडप्रवण गावांच्या उपाय योजनांचे प्रस्ताव सादर करण्यात
येऊन पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून दरड प्रवण गावांमध्ये आपत्ती
सौम्यीकरण अंतर्गत दरड प्रतिबंधक कामे करण्यासाठी 27 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी
मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय पारित झाला असल्याची माहिती पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचे
वतीने प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, पाटण विधानसभा
मतदार संघामध्ये प्रतिवर्षी मोठया प्रमाणांत अतिवृष्टी तसेच ढगफुटीसदृश्य पाऊस होत
असल्याने कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावांच्या
वरच्या बाजूला असलेले डोंगर कडे कोसळण्याची परिस्थिती निर्माण होते. तसेच काही
ठिकाणी गावांवर डोंगराचे कडे कोसळण्याचे प्रकार मागील काही वर्षात होत असल्याने या
गावांतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
निर्माण होऊन वेळ प्रसंगी येथील नागरीक हे प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत
केले जातात.त्यामुळे या दरडप्रवण गावांमध्ये दरडी कोसळण्यास प्रतिबंधक उपाय योजना
करण्याच्या हेतून पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दरड प्रवण गावांतील उपाय
योजनासंबंधी जिल्हा प्रशासनाला प्रत्यक्ष या गावांची पाहणी करुन आवश्यक ते
प्रस्ताव राज्यातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत विविध कामांचे
प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केल्या होत्या.
त्यानुसार या विभागाकडून या दरडप्रवण गावांचे सर्वेक्षण करत उपाय योजनांसह आवश्यक
असलेल्या निधीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. प्रकल्प मुल्यमापन समितीने
शिफारस केलेलया प्रस्तावांना राज्य कार्यकारी समितीने मंजूरी दिल्यानंतर या
प्रसतावास राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे बैठकीत मंजूरी दिली. त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील
दरडप्रवण गावांतील उपाय योजनांतर्गत आपत्ती सौम्यीकरण करण्यासाठी 15 व्या वित्त
आयोगाने राज्यासाठी राज्य आपत्ती सौम्यीकरण निधी अंतर्गत दरड प्रतिबंधक कामे
करण्यासाठी 27 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचा शासन निर्णय नुकताच
पारित झाला असून या कामांमध्ये दिक्षी गाव संरक्षक भिंत 68.31 लक्ष, बागलेवाडी
संरक्षक भिंत व मोरी बांधणे,गटर बांधणे काढणे 82.54 लक्ष, वरंडेवाडी संरक्षक भिंत
व मोरी बांधणे 55.66 लक्ष, धडामवाडी संरक्षक भिंत व मोरी बांधणे,गटर बांधणे काढणे
,दरड काढणे 49.04 लक्ष, जळव संरक्षक भिंत व मोरी बांधणे गटर बांधणे काढणे दरड काढणे
70.86 लक्ष, पाबळवाडी संरक्षक भिंत व मोरी बांधणे गटर बांधणे दरड काढणे 50.56
लक्ष, लुगडेवाडी केरळ संरक्षक भिंत व मोरी बांधणे गटर बांधणे काढणे दरड काढणे
49.55 लक्ष, जोतिबाचीवाडी संरक्षक भिंत
42.24 लक्ष, झाकडे संरक्षक भिंत 42.24 लक्ष, मसुगडेवाडी संरक्षक भिंत 42.24
लक्ष, तामिणे संरक्षक भिंत व मोरी 60.72 लक्ष, पाडळोशी संरक्षक भिंत 52.92 लक्ष,
लेंढोरी धनगरवाडी संरक्षक भिंत 42.24 लक्ष, गुजरवाडी म्हावशी संरक्षक भिंत 42.24
लक्ष, काळगाव संरक्षक भिंत 34.16 लक्ष, मोरगिरी जुने गावठाण संरक्षक भिंत 52.92
लक्ष, आटोली गुरेघर अंतर्गत कोकाणेवाडी संरक्षक भिंत 52.92 लक्ष, बाजे वर सरकून
संरक्षक भिंत 151.80 लक्ष, गोकूळनाला कामगारव बी संरक्षक भिंत 51.87 लक्ष गुरुत्वाकर्षण
टिकवून ठेवणारी भिंत,पुरवठा आणि फिक्सिंग रॉक फॉल प्रोटेक्शन, ड्रेनेज, सिस्टमची
स्थापना/नूतनीकरण,दुरुस्ती,धूप आणि उतार हालचाल कमी करण्यासाठी उपाय,ड्रेनेज वाहिन्या
खोल करण्यांतर्गत किल्ले मोरगिरी 5 कोटी 22 लक्ष 93 हजार, डावरी 2 कोटी 26 लक्ष 01
हजार,महिंद 55.96 लक्ष,बनपूरी 97.65 लक्ष,सळवे 63.02 लक्ष, जितकरवाडी जिंती 50
लक्ष, जोशेवाडी काळगाव 50 लक्ष तर गुरुत्वाकर्षण टिकवून ठेवणारी भिंत,सैल सामग्री काढून
टाकणे,नाला ट्रेचिंग इ. कामांसाठी बांबवडे 35.51 लक्ष,पाडेकरवाडी 39.26 लक्ष,
कळंबे 79.69 लक्ष, घोट 97.59 लक्ष,दुसाळे 35 लक्ष, किसरुळे 73.74 लक्ष, गोकूळ तर्फ
हेळवाक 88.94 लक्ष, म्हारवंड 81.86 लक्ष व
रासाटी 53.81 लक्ष असा 27 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. असा एकूण 27 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी मंजूर
झाला असून लवकरच या कामाची
निविदा प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केल्या असून कामाची निविदा प्रक्रिया
झाल्यानंतर तातडीने या रस्त्याचे काम हाती घेण्याच्या सूचनाही केल्या असल्याचे
शेवटी पत्रकात म्हटलं आहे.
No comments:
Post a Comment